logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान पुलाची शिरोलीत धारकऱ्यांचे सामूहिक मुंडन, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण पुलाची शिरोली / प्रतिनिधी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुलाची शिरोली शाखेच्या वतीने १८ फेब्रुवारीपासून फाल्गुन अमावास्येपर्यंतचा कालावधी ‘बलिदान मास’ म्हणून पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या या उपक्रमाची सुरुवात आज बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता ५० धारकऱ्यांच्या सामूहिक मुंडनाने करण्यात आली.शिव प्रतिष्ठानच्या वतीने दररोज ज्यांना मुंडन करावयाचे आहे त्यांनी आपल्या पातळीवर मुंडन करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बलिदान मासादरम्यान दररोज सायंकाळी प्रत्येक चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर श्रद्धांजली अर्पण करूनच वारकऱ्यांनी अन्नग्रहण करावे, असेही सांगण्यात आले आहे.या कालावधीत गोड पदार्थ, मांसाहार, एकवेळचे अन्न त्याग, गादीवर न झोपणे, टीव्ही न पाहणे, पायातील चप्पल न वापरणे तसेच शुभकार्यांना उपस्थित न राहणे अशा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून संयम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा जपावी, असे सांगितले.इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराजांना पकडून त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला. धर्मांतराचा दबाव आणि क्रूर अत्याचार सहन करूनही त्यांनी स्वधर्माचा त्याग केला नाही. अखेरीस ११ मार्च १६८९ रोजी त्यांना वीरमरण आले. त्यांच्या अद्वितीय त्यागामुळे त्यांना ‘धर्मवीर’ ही उपाधी प्राप्त झाली.संभाजी महाराजांचे शौर्य, विद्वत्ता आणि कर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असून, बलिदान मास हा स्वराज्य, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणारा पर्व ठरावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

2 hrs ago
user_आमची मराठी.com
आमची मराठी.com
शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
3c63d315-a3aa-4fea-87f3-b6e0304f9c60

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कोल्हापूरातील शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रस्ते व वाहनतळ विकासकामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. निविदेपूर्वी काम पूर्ण व मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड केल्याचा दावा करत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून सखोल चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
    1
    कोल्हापूरातील शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रस्ते व वाहनतळ विकासकामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. निविदेपूर्वी काम पूर्ण व मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड केल्याचा दावा करत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून सखोल चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *सांगली–मिरज रोडवर २० वर्षांनंतर अतिक्रमणावर बुलडोझर; पृथ्वीराज पवारांचा इशारा – “अन्याय सहन करणार नाही!”* ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001
    1
    *सांगली–मिरज रोडवर २० वर्षांनंतर अतिक्रमणावर बुलडोझर; पृथ्वीराज पवारांचा इशारा – “अन्याय सहन करणार नाही!”*
==================
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    1 day ago
  • सांगोला तालुका सूतगिरणी समोर MH10AW6517 या सीएनजी टाटा गाडीला अचानक आग लागली गाडीमध्ये कोणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सांगोला येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तत्काळ आग विझवण्यात आली.
    1
    सांगोला तालुका सूतगिरणी समोर MH10AW6517 या सीएनजी टाटा गाडीला अचानक आग लागली गाडीमध्ये कोणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सांगोला येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तत्काळ आग विझवण्यात आली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सातारा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये अघोरी नृत्य रद्द करावे -हमीद दाभोळकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
    1
    सातारा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये अघोरी नृत्य रद्द करावे -हमीद दाभोळकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    46 min ago
  • इन्सुली भिसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सावंतवाडी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा प्रकार आज सकाळी घडला. तो आठ ते नऊ वर्षाचा आहे. कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला दाजीपुर येथील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी चे वन अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.
    1
    इन्सुली भिसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सावंतवाडी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा प्रकार आज सकाळी घडला. तो आठ ते नऊ वर्षाचा आहे. कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला  दाजीपुर येथील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी चे वन अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    1
    भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    1
    BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. 
#AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.