पुणे महानगरपालिकेत मंत्रा बिल्डर कडून अधिकाऱ्यांना महागड्या वस्तू वाटप.. पुणे:पुणे महानगरपालिकेतील (PMC) विशिष्ट अधिकाऱ्यांना खूश करून स्वतःचे व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी 'मंत्रा बिल्डर्स' (Mantra Properties) या विकासकाने अधिकाऱ्यांना महागड्या भेटवस्तूंचे (गिफ्ट्स) आमिष दाखवल्याचा आरोप संजय कोणे यांनी केला आहे. या संदर्भात मंत्रा बिल्डर्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. टेंडर प्रक्रिया सोयीस्कर करणे, नियमबाह्य परवानग्या मिळवणे आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या निवडक अधिकाऱ्यांना या आकर्षक भेटवस्तू वाटल्या जात असल्याचा गंभीर आरोप कोणे यांनी केला आहे. महापालिका आवारात आणि अधिकाऱ्यांच्या दालनाजवळ 'Mantra' ब्रँडिंग असलेल्या आकर्षक पिशव्या आणि डिझायनर गिफ्ट बॉक्सचा मोठा साठा आढळून आला. या बॉक्सवर कंपनीचे नाव व धार्मिक श्लोक मुद्रित असून, आतमध्ये पूजा साहित्य, घंटी, डिझायनर मोदक बॉक्स व इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. सणांचे औचित्य साधून अधिकाऱ्यांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला खाजगी व्यावसायिकाकडून भेटवस्तू स्वीकारण्यास सक्त मनाई आहे. या नियमाचे उघड उल्लंघन होत असल्याने संजय कोणे यांनी, 'मंत्रा बिल्डर्स'वर कडक कायदेशीर कारवाई करणे, भेटवस्तू स्वीकारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"1
- गोल्डन कार’चा रुबाब पडला महागात; पोलिसांची कारवाई.....! पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅनच्या ‘गोल्डन कार’वर पोलिसांची कारवाई..! हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून वाहन नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच कारवाईदरम्यान एका गोल्डमॅनची गोल्डन कार पोलिसांच्या नजरेस पडली.कारच्या काचांवर काळी फिल्म आणि HSRP नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबर प्लेट आढळून आली. पोलिसांनी तात्काळ काळी फिल्म हटवली आणि नियमभंगाप्रकरणी कारवाई केली.नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम आहे... #PimpriChinchwad #Hinjewadi #TrafficPolice #PoliceAction #GoldenCar #Goldman #CarAction #BlackFilm #FancyNumberPlate #HSRP #TrafficRules #VehicleRules #PimpriChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #TheNayakNews1
- फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव1
- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- "शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला..!"1