जळगाव : अखेर गिरणा धरण १०० टक्के भरले. नदीपात्रात बुधवारी सकाळी 'इतके' पाणी सोडले पाणलोट क्षेत्रातील पावसानंतर गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलसाठा १०० टक्के झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता एक वक्राद्वार दरवाजा ३० सेंटीमीटरने उघडण्यात आल्यानंतर गिरणा प्रकल्पातून १,२३८ क्युसेक अर्थात ३५.०३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु झाला. पाण्याची आवक वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात बदल करण्यात येणार असल्याची माहिती चाळीसगाव पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिली आहे. गिरणा मुख्य प्रकल्पाची पूर्ण जलाशय पातळी ३९८.०७ मीटर इतकी आहे. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता गिरणा प्रकल्पातील सद्य जलपातळी ही ३९८.०७ मीटर इतकी नोंदविण्यात आली. त्यामुळे गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. प्रकल्पातील एकूण साठा ६०८.४५ दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी ५२३.५५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. एकूण जलसाठ्याची टक्केवारी १०० टक्के इतकी झाली आहे. २.०५२ दशलक्ष घनमीटर आवक गिरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून गेल्या २४ तासांत ७२.५० दशलक्ष घनफूट म्हणजेच २.०५२ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. धरण परिसरात आजच्या दिवशी पावसाची नोंद शून्य मिलीमीटर झाली असली, तरी आतापर्यंत एकूण ४७६ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. धरण पूर्ण भरलेले असल्याने पाण्याच्या आवकेवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. गिरणा प्रकल्पातून सध्या सांडव्यावरून १,२३८ क्युसेक अर्थात ३५.०३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासाठी प्रकल्पातील एक रेडियल दरवाजा ३० सेंटीमीटरने उघडण्यात आला आहे. नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कालवा व सिंचन विसर्ग बंद प्रकल्पातून पीएलबीसी कालव्याद्वारे सध्या कोणताही विसर्ग सुरू नसून कालवा बंद आहे. तसेच सिंचनासाठीही विसर्ग शून्य आहे. धरणातील अतिरिक्त पाण्याचा निचरा सांडव्याद्वारे गिरणा नदीपात्रात करण्यात येत आहे. गिरणा प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग परिस्थितीनुसार कमी अथवा वाढविण्यात येईल, असे पाटबंधारे उपविभाग, चाळीसगावच्या उपविभागीय अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे धरणातील आवक आणि जलपातळीवर प्रशासनाकडून नियमित देखरेख ठेवली जात आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा गिरणा धरणातून नदीपात्रात १,२३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गात वाढ किंवा घट केली जाऊ शकते. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने नागरिकांनी नदीत उतरू नये तसेच पोहणे, मासेमारी किंवा इतर कारणांसाठी नदीकाठावर गर्दी करू नये. नदीलगतच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांनीही काळजी घ्यावी. लहान मुले व गुरेढोरे नदीपात्रापासून दूर ठेवावीत. पाण्याच्या विसर्गात अचानक वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

- धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे1
- चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...1
- जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमनावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण नप्ते, तर उपाध्यक्षपदी संदीप आप्पा काळे यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. गणेशोत्सव काळात दररोज सकाळी व सायंकाळी आरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीच्या वेळी गावातील मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहून भक्तिभावाने गणरायाची आरती करतात. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी होत असून, संपूर्ण उत्सव काळात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सावळदबारा परिसर भक्तिमय झाला आहे. मंडळाच्या उपक्रमांना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शांतता व सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.1
- नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.1
- धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरातील अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, टायफॉइड आणि सर्दी-तापासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव वाढला होता, ज्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी आजारी पडत होते. या गंभीर समस्येची दखल घेत, शाळेतील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री जुनेद पठाण साहेब यांनी सुल्तानिया संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे शाळेतच शिबीर घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल घेतल्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात शेकडो विद्यार्थ्यांची कसून आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले, तसेच आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन श्री इमरान आजमी साहेब आणि अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री नदीम खान गुलशेर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात डॉक्टर निशा धवन, डॉक्टर बदर सूर्यवंशी आणि आशा वर्कर नफिसा दीदी यांनी अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची तपासणी करत उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली. या संपूर्ण प्रक्रियेत आणि शिबिराच्या नियोजनात श्री जुनेद पठाण साहेब यांच्यासह श्री हुसेन पिंजारी साहेब, श्री अयाज अहमद अयाज आणि अमजद पठाण साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. वाढत्या साथीच्या आजारांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी जागेवरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे धुळे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.1
- प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!1
- बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS1
- जळगांव पाचोरा में पत्रकार पर हमले का आरोप | निष्पक्ष जांच की मांग1