मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शोधवार्ता व उत्कृष्ट वार्ता या दोन गटातील पुरस्कारासाठी प्रवेशिका उदगीर तालुका पत्रकार पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुका पत्रकार संघाच्या वतीने सोळा वर्षापासून मराठवाडा विभागीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. उत्कृष्ट वार्ता व शोधवार्ता या दोन गटात आयोजित स्पर्धेत दैनिकाच्या प्रतिनिधींनी एक डिसेंबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दैनिकात नावासह प्रकाशित झालेले किंवा नाव नसल्यास संपादकाचे शिफारस पत्र आणि प्रकाशित साहित्याची मूळ प्रत व त्याची तीन साक्षांकित प्रति, वार्ताहरचे दोन पासपोर्ट फोटो सोबत जोडावेत तसेच पॉकेटावर कोणत्या गटासाठी प्रवेशिका पाठवत आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २५ डिसेंबर २०२४ पर्यंत उदगीर तालुका पत्रकार संघ, द्वारा दैनिक यशवंत विभागिय कार्यालय, नगर परिषद व्यापारी संकुल, ई बिल्डिंग पहिला मजला, उदगीर जिल्हा लातूर (पिन कोड ४१ ३५ १७) या पत्त्यावर पाठवावे. या अगोदर पुरस्कार प्राप्त झालेल्या पत्रकारांनी परत प्रवेशिका पाठवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट वार्ता गटात प्रथम पुरस्कार जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ अर्जुन मुद्दा यांच्यावतीने रोख पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे स्वरूप आहे. द्वितीय पुरस्कार स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्या वतीने तीन हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, तर तृतीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कै. अनंत आपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ पत्रकार प्रशांत अपसिंगेकर यांच्या वतीने दोन हजार रुपये, स्मृतीचीन्ह व प्रमाणपत्र तसेच शोध वार्ता गटात प्रथम पारितोषिक कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ अर्जुन मुद्दा यांच्या वतीने रोख पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक वृत्तपत्र विद्याविभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्यावतीने तीन हजार रुपये, प्रमाणपत्र, तृतीय पारितोषक कै. व्यंकटराव कलप्पा मोगले यांच्या स्मरणार्थ पत्रकार राजू मोगले यांच्या वतीने रोख दोन हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील वर्षाचे व २०२४ वर्षामधील पारितोषक वितरण १२जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ऊत्कृष्ठ वार्ता व शोधवार्ता गटातील स्पर्धेसाठी मराठवाड्यातील पत्रकारानी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष राम मोतीपवळे, कार्याध्यक्ष एल.पी. उगीले, व स्पर्धेचे संयोजक प्रा. प्रविण जाहूरे, व्यंकट नेत्रगावकर यांनी केले आहे.

- लातूर सीताफळ मोहोत्सव, 3 डिसेंबर 2024, स्थळ - क्रीडा संकुल लातूर,1
- देवणी : आ.संभाजीराव पाटील निलंगेकराना राज्याचे मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री करण्याची मागणी1
- नवीन कार्यक्रम खंडोबा यात्रा निमित जि .लातूर टाकळगाव येथे 💃 भन्नाट वाघ्या मुरळीचा कार्यक्रम 😍1
- लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ यांना पुष्पगुच्छ देत विधीज्ञ दीन उत्साहात साजरा1
- latur soyabean bajar bhav! aajche! soybaban bajar bhav todoy! लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव1
- #inspirational_waves #beed mumbai1
- #लातूर #आष्टविनायक मंदिर LATUR1
- समुद्रात बुडून रशियन अभिनेत्रीचा मृत्यू1
- Latur News : लातूर मध्ये भरला अनोखा सीताफळ महोत्सव, विविध रंगी सिताफळांची लातूरकरांना भुरळ1