logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

“महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजसेवेचा संदेश – खर्ची येथे उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न” खर्ची (ता. एरंडोल) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खर्ची येथे आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. हे शिबिर Indian Red Cross Society यांच्या माध्यमातून, *गांधी रिसर्च फौंडेशन जळगाव* व *समाजकार्य विभाग, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नानाभाऊ महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी गावात अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे सांगितले तसेच गरजू रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नलिन महाजन यांनी मनोगत व्यक्त करत रक्तदानाचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी महापुरुषांच्या जयंती निमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. योगेश माळी (समाजकार्य विभाग) यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत सुर्यवंशी (गांधी रिसर्च फौंडेशन) यांनी व्यक्त केले. या प्रसंगी उत्तम माळी, विकास पाटील मा. सरपंच, रवंजेखू, नामदेव माळी मा. सरपंच, रवंजेबू, भूरा महाजन, प्रदीप देशमुख, जनार्धन कोळी, महेश पाटील (ग्राम अधिकारी), नयना मराठे अंगणवाडी सेविका, संगीता सोनवणे आशावर्कर, नितीन शिरसाळे, मधुकर विश्वे, कन्हैया मराठे, कपिल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक गजानन बोरसे, रोहित पाडवी, तसेच अतुल पाटील रोशन महाजन, रमेश मराठे,पवन शेळके, गजानन अहिरे, सागर ठाकूर पन्नालाल महाजन, हर्षल महाजन, मुकेश करसकार, मुकुंदा माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरात एकूण *१९ रक्तदात्यांनी* उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून समाजसेवेचा संदेश देत मानवतेची खरी जपणूक करण्यात आली.

3 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
3 hrs ago
77866913-733f-465f-908d-5bb6c9ea0e17

“महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजसेवेचा संदेश – खर्ची येथे उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न” खर्ची (ता. एरंडोल) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खर्ची येथे आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. हे शिबिर Indian Red Cross Society यांच्या माध्यमातून, *गांधी रिसर्च फौंडेशन जळगाव* व *समाजकार्य विभाग, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नानाभाऊ महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी गावात अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे सांगितले तसेच गरजू रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नलिन महाजन यांनी मनोगत व्यक्त करत रक्तदानाचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी महापुरुषांच्या जयंती निमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही

d5ef069c-d54e-40f8-94db-89086e9cd0bb

खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. योगेश माळी (समाजकार्य विभाग) यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत सुर्यवंशी (गांधी रिसर्च फौंडेशन) यांनी व्यक्त केले. या प्रसंगी उत्तम माळी, विकास पाटील मा. सरपंच, रवंजेखू, नामदेव माळी मा. सरपंच, रवंजेबू, भूरा महाजन, प्रदीप देशमुख, जनार्धन कोळी, महेश पाटील (ग्राम अधिकारी), नयना मराठे अंगणवाडी सेविका, संगीता सोनवणे आशावर्कर, नितीन शिरसाळे, मधुकर विश्वे, कन्हैया मराठे, कपिल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक गजानन बोरसे, रोहित पाडवी, तसेच अतुल पाटील रोशन महाजन, रमेश मराठे,पवन शेळके, गजानन अहिरे, सागर ठाकूर पन्नालाल महाजन, हर्षल महाजन, मुकेश करसकार, मुकुंदा माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरात एकूण *१९ रक्तदात्यांनी* उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून समाजसेवेचा संदेश देत मानवतेची खरी जपणूक करण्यात आली.

View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.