logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सांगली जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलातर्फे सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना जिलेबी वाटपही करण्यात आले. याप्रसंगी बोलताना राजेश नाईक यांनी आजच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाची गाथा सांगण्याची गरज व्यक्त केली. नाईक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीचे वर्णन करताना सांगितले की, पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि प्रशासन कौशल्याने सन १७६७ ते १७९५ या काळात सक्षमपणे राजकारभार सांभाळला. प्रजेच्या कल्याणाला त्यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. धर्माच्या रक्षणासाठी आणि तहानलेल्यांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी अनेक मंदिरे, घाट आणि धर्मशाळांची निर्मिती केली, तसेच विविध योजना राबवल्या. इतकेच नाही तर, त्यांनी चाळीस हजार महिलांचे सैन्य तयार करून भारतीय जीवनात आपले कर्तृत्व आणि नेतृत्वाचा ठसा उमटवला, असेही नाईक यांनी नमूद केले. कार्यक्रमात समन्वयक अमित पारेकर आणि डॉ. प्रमोद इनामदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर शेवटी ओबीसी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गजानन मिरजे यांनी आभार मानले. या अभिवादन कार्यक्रमाला प्रदेश सेवा दलाचे संघटक पैगंबर शेख, नामदेव पठाडे, विठ्ठलराव काळे, रामसिंग परदेशी, कांचन खंदारे, समीना मुल्ला, रूपाली पिटके, शाकीर करीम, दीपक ताटे, उस्मान मगदूम, महेश भंडारे, प्रकाश माने, सुनील मांडके, शरण सरोदे आणि गणेश वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 hrs ago
user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
2 hrs ago
8bcef4f1-343a-43e4-b72c-1c1a27f1d48e

सांगली जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलातर्फे सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना जिलेबी वाटपही करण्यात आले. याप्रसंगी बोलताना राजेश नाईक यांनी आजच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाची गाथा सांगण्याची गरज व्यक्त केली. नाईक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीचे वर्णन करताना सांगितले की, पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि प्रशासन कौशल्याने सन १७६७ ते १७९५ या काळात सक्षमपणे राजकारभार सांभाळला. प्रजेच्या कल्याणाला त्यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. धर्माच्या रक्षणासाठी आणि तहानलेल्यांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी अनेक मंदिरे, घाट आणि धर्मशाळांची

0807479c-4679-403a-8700-f2a2a05821c1

निर्मिती केली, तसेच विविध योजना राबवल्या. इतकेच नाही तर, त्यांनी चाळीस हजार महिलांचे सैन्य तयार करून भारतीय जीवनात आपले कर्तृत्व आणि नेतृत्वाचा ठसा उमटवला, असेही नाईक यांनी नमूद केले. कार्यक्रमात समन्वयक अमित पारेकर आणि डॉ. प्रमोद इनामदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर शेवटी ओबीसी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गजानन मिरजे यांनी आभार मानले. या अभिवादन कार्यक्रमाला प्रदेश सेवा दलाचे संघटक पैगंबर शेख, नामदेव पठाडे, विठ्ठलराव काळे, रामसिंग परदेशी, कांचन खंदारे, समीना मुल्ला, रूपाली पिटके, शाकीर करीम, दीपक ताटे, उस्मान मगदूम, महेश भंडारे, प्रकाश माने, सुनील मांडके, शरण सरोदे आणि गणेश वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    1
    Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी जोरदार टीका केली आहे. काशीद यांनी म्हटले आहे की, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली, तेव्हा लक्ष्मण हाके यांनी शेतातील ढेकळात उपोषण करणार असल्याचे सांगितले आणि आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर, ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी हाके यांना आव्हान दिले आहे की, त्यांनी एक दिवस ढेकळात उपोषण करून दाखवावे.
    1
    ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी जोरदार टीका केली आहे. काशीद यांनी म्हटले आहे की, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली, तेव्हा लक्ष्मण हाके यांनी शेतातील ढेकळात उपोषण करणार असल्याचे सांगितले आणि आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर, ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी हाके यांना आव्हान दिले आहे की, त्यांनी एक दिवस ढेकळात उपोषण करून दाखवावे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory Miraj, Sangli•
    9 hrs ago
  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाने मराठा समाजाला एससी-एसटी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, अशी भूमिका पूर्वीपासूनच घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत, कुणबी नोंदी असलेल्या सर्वांना आरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केली. मराठा समाजातील गरीब घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी अधोरेखित केले. मात्र, सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणणे न्यायालयात टिकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील यांच्याशी तातडीने बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आवाहन केले. यासोबतच, ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी असे सांगत, मराठा-ओबीसी समन्वयासाठी राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास समिती स्थापन करण्याची तयारीही आठवले यांनी दर्शवली. दरम्यान, आठवले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. यासाठी त्यांनी विधान परिषदेची एक जागा आणि किमान दोन महामंडळांच्या अध्यक्षपदांची मागणी केली. याव्यतिरिक्त, बुद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून समाजात शांतता आणि समन्वयाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, "आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवे" असा संदेशही त्यांनी दिला.
    1
    केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाने मराठा समाजाला एससी-एसटी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, अशी भूमिका पूर्वीपासूनच घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत, कुणबी नोंदी असलेल्या सर्वांना आरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केली.

मराठा समाजातील गरीब घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी अधोरेखित केले. मात्र, सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणणे न्यायालयात टिकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील यांच्याशी तातडीने बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आवाहन केले. यासोबतच, ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी असे सांगत, मराठा-ओबीसी समन्वयासाठी राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास समिती स्थापन करण्याची तयारीही आठवले यांनी दर्शवली.

दरम्यान, आठवले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. यासाठी त्यांनी विधान परिषदेची एक जागा आणि किमान दोन महामंडळांच्या अध्यक्षपदांची मागणी केली. याव्यतिरिक्त, बुद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून समाजात शांतता आणि समन्वयाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, "आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवे" असा संदेशही त्यांनी दिला.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • राजस्थानमध्ये सध्या भीषण वाळूच्या वादळाचा कहर सुरू आहे, ज्यामुळे अनेक शहरे पूर्णपणे अंधारात बुडाली आहेत.
    1
    राजस्थानमध्ये सध्या भीषण वाळूच्या वादळाचा कहर सुरू आहे, ज्यामुळे अनेक शहरे पूर्णपणे अंधारात बुडाली आहेत.
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    17 hrs ago
  • आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी त्यांच्या जन्मगाव चोंडी येथे जाऊन विनम्र अभिवादन केले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यावेळी कृषिमंत्री श्री दत्तात्र्य भरणे, श्री अक्षय शिंदे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु. संध्या सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायनिष्ठा आणि समाजहिताच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव करत, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा समाजाला कायम प्रेरणा देत राहील, अशी भावना व्यक्त केली.
    1
    आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी त्यांच्या जन्मगाव चोंडी येथे जाऊन विनम्र अभिवादन केले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.

यावेळी कृषिमंत्री श्री दत्तात्र्य भरणे, श्री अक्षय शिंदे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु. संध्या सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायनिष्ठा आणि समाजहिताच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव करत, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा समाजाला कायम प्रेरणा देत राहील, अशी भावना व्यक्त केली.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कोकोमध्ये क्लासी वाइब्सचा अनुभव येतो. त्यात शांत स्वभाव असून, अथांग प्रेम दिसून येते.
    2
    कोकोमध्ये क्लासी वाइब्सचा अनुभव येतो. त्यात शांत स्वभाव असून, अथांग प्रेम दिसून येते.
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • इचलकरंजीतील बहुचर्चित आयपीएल सट्टा रॅकेट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला, ज्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या आयपीएल सट्टा प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळाल्याचे श्रेय अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या दमदार युक्तिवादाला दिले जात आहे.
    1
    इचलकरंजीतील बहुचर्चित आयपीएल सट्टा रॅकेट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला, ज्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या आयपीएल सट्टा प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळाल्याचे श्रेय अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या दमदार युक्तिवादाला दिले जात आहे.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.