सुट्टीचा आनंद ठरला जीवघेणा; नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू सुट्टीचा आनंद ठरला जीवघेणा; नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू.. सुट्टीच्या दिवशी पोहण्याचा मोह दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव जिल्ह्यातील यमकमनमर्डी परिसरात घडली आहे. घटप्रभा नदीत बुडून कृष्णा खानापुरी (वय १४) आणि प्रज्वल गोकार (वय १४) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुक्केरी तालुक्यातील दादबानहट्टी येथील हे दोन्ही विद्यार्थी शिक्षणासाठी यमकमनमर्डी येथील आरसी प्लॉट परिसरात राहत होते. शाळेला सुट्टी असल्याने मंगळवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास पाच मित्रांचा गट घटप्रभा नदीकाठी पोहण्यासाठी गेला होता. सुरुवातीला सर्वजण आनंदाने पोहत होते. मात्र नदीतील पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने कृष्णा आणि प्रज्वल हे दोघे अचानक पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले व बुडाले. ही घटना पाहून घाबरलेल्या इतर तीन मुलांनी तातडीने गावात धाव घेत ग्रामस्थांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच यमकमनमर्डी पोलिस ठाण्याचे पथक व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी वाय. जी. कोलकार यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम राबविण्यात आली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. या शोधमोहीमेत स्थानिक नागरिकांनीही मोठे सहकार्य केले. हेमंत बाळेकुंद्री, अशोक पाटील, बसवराज बंबरगी, यल्लाप्पा पाटील आणि रफिक बडेभाई यांनी बचावकार्यादरम्यान प्रशासनाला मोलाची मदत केली. मृत झालेले दोन्ही विद्यार्थी इयत्ता सातवीत शिक्षण घेत होते. या घटनेत इतर तीन विद्यार्थी सुदैवाने बचावले आहेत. यमकमनमर्डी पोलिस ठाण्याचे सीपीआय जावेद मुशापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर नदी परिसरात मोठी गर्दी झाली होती. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

- जालन्यात SIR मॅपिंगला वेग: शनिवार-रविवारी विशेष शिबिरे; 55% प्रक्रिया पूर्ण.---. दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी SIR मॅपिंगला गती...1
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.1
- मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे1