दिनांक २०.०६.२०२६ रोजी वर्धा शहर पोलिसांनी बेकायदेशीरपणे मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ बाळगणाऱ्या शेख अमीर शेख हमीद (रा. आनंदनगर, वर्धा) याला अटक केली. रात्रीच्या गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ईदगाह मैदान, वर्धा येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या अंगझडतीमध्ये ३.८७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ, रोख १९०० रुपये आणि दोन अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण ५१,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने कबूल केले की, हा एमडी अमली पदार्थ रोशन सहारे (रा. आनंदनगर, वर्धा) याचा असून तो त्याच्या सांगण्यावरून विक्री करत होता. एनडीपीएस कायद्यातील तरतुदीनुसार, पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना मिळालेल्या माहितीवर प्रभारी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्या सूचनेनुसार पंच, मापारी, फॉरेन्सिक पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह ही कारवाई करण्यात आली. या कारवाईला पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशीव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शन लाभले, तर पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांच्यासह गजेंद्र धर्मे, प्रशांत वंजारी, महेद्र पाटील, अभिजीत वाघमारे, नितीन ईटकरे, श्रावण पवार, वैभव जाधव, रंजीत भुरसे आणि अमोल साळवन यांनी ही कामगिरी केली. या यशामुळे शहर परिसरात बेकायदेशीर मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यास पोलिसांना यश मिळाले. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही वेगवेगळ्या कलमांखाली अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
दिनांक २०.०६.२०२६ रोजी वर्धा शहर पोलिसांनी बेकायदेशीरपणे मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ बाळगणाऱ्या शेख अमीर शेख हमीद (रा. आनंदनगर, वर्धा) याला अटक केली. रात्रीच्या गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ईदगाह मैदान, वर्धा येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या अंगझडतीमध्ये ३.८७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ, रोख १९०० रुपये आणि दोन अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण ५१,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने कबूल केले की, हा एमडी अमली पदार्थ रोशन सहारे (रा. आनंदनगर, वर्धा) याचा असून तो त्याच्या सांगण्यावरून विक्री करत होता. एनडीपीएस कायद्यातील तरतुदीनुसार, पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना मिळालेल्या माहितीवर प्रभारी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्या सूचनेनुसार पंच, मापारी, फॉरेन्सिक पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह ही कारवाई करण्यात आली. या कारवाईला पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशीव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शन लाभले, तर पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांच्यासह गजेंद्र धर्मे, प्रशांत वंजारी, महेद्र पाटील, अभिजीत वाघमारे, नितीन ईटकरे, श्रावण पवार, वैभव जाधव, रंजीत भुरसे आणि अमोल साळवन यांनी ही कामगिरी केली. या यशामुळे शहर परिसरात बेकायदेशीर मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यास पोलिसांना यश मिळाले. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही वेगवेगळ्या कलमांखाली अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
- बंधन बँकेच्या बचत गट वसुली कर्मचाऱ्याकडून पैशांनी भरलेली बॅग लुटून ₹४८ हजार ७५० रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी जलद तपास करत एका आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी आणि चोरीच्या रकमेपैकी ₹३० हजार ५०० रोख असा एकूण ₹१ लाख ५० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक रामदास मांडवगणे (वय २४, रा. धामणगाव जुना) हे बंधन बँकेचे वसुली कर्मचारी असून, ९ जून रोजी आनंदवाडी, भारसवाडा परिसरातून भीष्णूर येथे वसुलीसाठी जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत या बालकाने इतर आरोपींची नावे उघड केली, त्यानंतर पोलिसांनी गौरव संजय डोळस (वय २३, रा. आनंदवाडी) याला अटक केली. आरोपींकडून एमएच-२७ बीएन-९१४५ आणि एमएच-४० एएच-७१७३ क्रमांकाच्या दोन दुचाकींसह चोरीच्या रकमेपैकी ₹३०,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र जयसिंगपुरे, निखिल काळे, अतुल अडसड आणि पोलीस कॉन्स्टेबल अंकुश वडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.1
- MIDC परिसरातील 13 थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्तीनामा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.1
- एआयएमआयएम (AIMIM) नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, "तू थकून जाशील, पण हिंदुस्तानचा मुसलमान थकणार नाही." ओवैसींच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे समर्थक याला मुस्लिम समुदायाच्या धैर्याची आणि हक्कांची भावना व्यक्त करणारा आवाज म्हणून पाहत आहेत, तर विरोधक याला निव्वळ राजकीय वक्तव्य संबोधत आहेत. या विधानामुळे सोशल मीडियावरही जोरदार वादविवाद सुरू झाले आहेत.1
- भंडारा येथे नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांसाठी आयोजित चार दिवसीय प्रशिक्षण सुरू आहे. आज, २१ जून रोजी या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस होता. या प्रशिक्षणादरम्यान कलाशिक्षण विषयांतर्गत रंगमंच घटकाच्या सादरीकरणात सीमा उताणे यांनी वाचिक अभिनय सादर केला.1
- नागपूर क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तथ्ये समोर आली आहेत. खेळाडू, कोच आणि पालक वर्गाने एकत्र येत क्रीडा विभागातील या मनमानी प्रशासनाचे सत्य माध्यमांसमोर उघड केले आहे.1
- वणी पोलिसांनी शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 19.27 ग्रॅम एम.डी. पावडर आणि मोबाईल फोनसह एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका वेकोली कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, वणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गणेशपूर रोड परिसरात छापा टाकण्यात आला. या छाप्यात कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (28, रा. तेलीफैल, वणी) याच्या झडतीत 1 लाख 34 हजार 890 रुपये किमतीची 19.27 ग्रॅम एम.डी. पावडर आणि 15 हजार रुपयांचा मोबाईल फोन आढळून आला. चौकशीत मेश्रामने ही एम.डी. पावडर प्रज्योत उर्फ कॉकरोच महेश उपरे याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार, दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकारातील यापूर्वी नोंद असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे, ज्यात प्रज्योत महेश उपरे (27), अविनाश विजय पाटील (42) आणि रविंद्र धनराज गुप्ता (34) यांचा समावेश आहे. यामुळे या एम.डी. रॅकेटमधील अटक आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली आहे. अमली पदार्थांच्या या साखळीचा संपूर्ण तपास सुरू असून, पोलीस या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साजिद सय्यद, सुयोग महापुरे तसेच वणी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.1
- नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील प्रभाग क्रमांक १२ मध्ये नागरिकांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद वाचनालयाचे लोकार्पण २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीरभाऊ मेघे यांच्या शुभहस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी तत्कालीन नगर परिषद मुख्याधिकारी भारत नंदनवार, प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक नितीन काळे, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, तरुण आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. आमदार समीरभाऊ मेघे यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत वाचन संस्कृती ही समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचे म्हटले. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कमी झाले नसून, विद्यार्थी आणि तरुणांनी नियमित अभ्यास व वाचनाची सवय लावून ज्ञानसंपन्न व जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनालये केवळ पुस्तकांचे संग्रहालय नसून, ती व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जागृतीची केंद्रे असल्याचेही त्यांनी नमूद केले. वंदे भारतचे प्रतिनिधी सतीश भालेराव यांनी संपर्क साधल्यावर, तत्कालीन मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी नागरिकांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नगर परिषदेच्या प्रयत्नांची माहिती दिली. या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि विविध विषयांवरील संदर्भ साहित्याचा लाभ सहज मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक नितीन काळे यांनी हे वाचनालय म्हणजे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाल्याचे सांगितले. याच्या निर्मितीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत त्यांनी विद्यार्थी आणि नागरिकांना वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले. वाचनालयाचे ग्रंथपाल सूरज पाठे यांनी वाचनालयाची सविस्तर माहिती दिली. येथे विविध विषयांवरील पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भ साहित्य उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळावे यासाठी सर्व आवश्यक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वाचनालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे म्हटले. विशेषतः ग्रामीण आणि उपनगरीय भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास सुविधा मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एसएससी आणि नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुभाष गेडाम, राकेश राऊत आणि आकाश मेश्राम यांनीही वाचनालयाला विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरवले, ज्यामुळे त्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला नवी दिशा मिळेल. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद वाचनालय वानाडोंगरी परिसरात ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जागृतीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.1
- वर्ध्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) एका देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. दिनांक २०/०६/२०२६ रोजी झालेल्या या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा परिसरातील कृष्णाई कोर्ट बिल्डिंगमधील एका फ्लॅटवर करण्यात आली. AHTC, वर्धा येथे गोपनीय माहिती मिळाली होती की, सावंगी (मेघे), वर्धा येथील मुस्कान उर्फ शबनम नावाची महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील व परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करत होती. ती या मुलींना कृष्णाई कोर्ट बिल्डिंग, सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा येथील फ्लॅटवर बोलावून ग्राहकांसोबत संपर्क साधून देहव्यापार करून घेत होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री विनोद चौधरी यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांना दिली. त्यांच्या सूचना व निर्देशानुसार, अत्यंत गोपनीयतेने बनावट ग्राहक (पंटर) तयार करण्यात आला. बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर, AHTC, वर्धा पथकाने कृष्णाई कोर्ट बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १३ वर धाड टाकली. या धाडीत राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार (वय २१, रा. तुकाराम वॉर्ड, रामनगर, वर्धा) नावाचा आरोपी आढळून आला. फ्लॅटची झडती घेतली असता, एका खोलीत बनावट ग्राहक आणि एक पीडित महिला देहव्यापार करत असताना मिळून आले. पीडित महिलेने चौकशीत सांगितले की ती बाहेरच्या राज्यातील असून, मुस्कान उर्फ शबनमने तिला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी बोलावले होते. आरोपी मुस्कानने ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी आणि जागेची देखरेख करण्यासाठी राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार यास ठेवल्याचे दिसून आले. आरोपींच्या ताब्यातून तीन अँड्रॉइड मोबाईल, ८,०००/- रुपये रोख रक्कम आणि देहव्यापारासाठी लागणारे साहित्य असा एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन, वर्धा येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४३(२) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला महिला सुधार गृह, वर्धा येथे दाखल करण्यात आले असून, महिला आरोपी मुस्कान उर्फ शबनम हिचा शोध सुरू आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार दिवाकर परिमळ, अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख (सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा) यांनी यशस्वीपणे पार पाडली.1