logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुरोगामी विचारांचा वारसा अन् संशोधकाची प्रज्ञा; डॉ. रमेश पारवे यांचा इतिहास विभागप्रमुख पदापर्यंतचा अलौकिक प्रवास; दयानंद कला महाविद्यालयातर्फे सेवापूर्ती निमित्त गौरव! लातूर: येथील दयानंद कला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश पारवे यांचा ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर भावपूर्ण निरोप समारंभ पार पडला. ३० एप्रिल २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने डॉ. रमेश पारवे, त्यांच्या पत्नी सौ. शांता पारवे व चिरंजीव शशिकांत पारवे यांचा यथोचित सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी, IQAC समन्वयक डॉ. संतोष पाटील, स्वरातीम विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.डी.एन.मोरे पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. रमेश पारवे यांचा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी राहिलेला आहे. अगदी दगड ओढण्याच्या कामापासून कष्ट करत त्यांनी महाराष्ट्रातील नामांकित दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख पदापर्यंत मजल मारली. आपल्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अध्यापन आणि संशोधनाशी कधीही तडजोड केली नाही. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि प्रभावी वक्ते म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याची छाप पाडली आहे. आपल्या निरोपपर भाषणात डॉ. रमेश पारवे भावूक झाले. "नोकरी लागताच वडिलांचे छत्र हरवले, पण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलत सामाजिक चळवळीतही स्वतःला झोकून दिले," अशा शब्दांत त्यांनी आपला जीवनपट उलगडला. त्यांच्या या प्रवासात त्यांनी नाती जपण्याला आणि कष्टाला सर्वोच्च स्थान दिले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड म्हणाले की, "दयानंद महाविद्यालयाचा शैक्षणिक व पुरोगामी विचारांचा वारसा आहे आणि डॉ. रमेश पारवे यांनी हा वारसा खऱ्या अर्थाने समृद्ध केला आहे. आंबेडकरी विचारांचे बीज समाजात पेरण्याचे आणि चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी आपल्या लेखणीतून आणि वाणीतून केले. संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाकडून तरुणांनी जिद्द आणि चिकाटी शिकली पाहिजे." याप्रसंगी प्रा. अमोल शिंदे, डॉ. बालाजी घुटे, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. स्वप्नील जाधव, प्रा. विलास कोमटवाड आणि उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांनीही डॉ. रमेश पारवे यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा. राजू मोरे यांनी मानले.

7 hrs ago
user_सुमन नागनाथ अलमलकर
सुमन नागनाथ अलमलकर
Latur, Maharashtra•
7 hrs ago
0db73878-d256-47f0-8ef1-6c638a6ade84

More news from Maharashtra and nearby areas
  • *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    1
    *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    1
    अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. �
Hindustan Times
ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत.
येथे महिलांना:
🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा
💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी
📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा
👉 मुख्य उद्देश:
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे.
📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ
सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे:
ओळख (Identity) + विकास केंद्र
समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन
✔️ थोडक्यात
अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते
वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात
पण मुख्य हेतू एकच —
👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    1
    लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी.
निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. 
लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे
ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि
लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.
बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे
व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या
विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    28 min ago
  • साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    1
    साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    1
    लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.