ॲड.पी आर मुंडरगी स्मृती महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ* *बुद्धिबळ सर्वांगीण विकासासाठी उपयोगी - निलोत्पल* * कोल्हापूर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट :- ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या ॲड. पी आर मुंडरगी स्मृती एचटूई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य महिला निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, परभणी, धाराशिव, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली व स्थानिक कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत बहात्तर बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यापैकी 44 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी ॲड. विवेक शुक्ल ( सरकारी वकील), राजवाडा पोलीस स्टेशनचे प्रमुख किरण लोंढे, ब्राह्मण सभा मंगलधामचे अध्यक्ष डॉ.दीपक आंबर्डेकर,सचिव श्रीकांत लिमये, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे,चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले,सचिव मनिष मारुलकर, उपाध्यक्ष धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे,अनिश गांधी, स्पर्धांच्या मुख्य आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर व उपमुख्य पंच आरती मोदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना निलोत्पल म्हणाले की, मला बुद्धिबळाची आवड असून व्यावसायिक खेळाडू नसलो तरी हौशी खेळाडू म्हणून स्पर्धा खेळून आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळाले आहे.मला जीवनात वेळोवेळी बुद्धिबळाचा फायदा झाला असून बुद्धिबळ हे व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वांसाठी खूप उपयोगाचे आहे. 29 ऑगस्टपर्यंत तीन दिवसात चालणाऱ्या या स्पर्धां स्विस लीग पद्धतीने क्लासिकल बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत. या स्पर्धेतून चार जणांची निवड तेलंगणा येथे 18 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात करण्यात येणार आहे. आज झालेल्या पहिल्या फेरीनंतर अग्रमानांकित पुण्याच्या निहिरा कौल सह, भूमिका वागळे छत्रपती संभाजीनगर, कीर्ती पटेल मुंबई, दिशा पाटील कोल्हापूर, श्रेया हिप्परगी सांगली, ईश्वरी जगदाळे सांगली, सई पाटील पुणे, वृत्तिका गमे नागपूर, सानिया तडवी जळगाव, श्रुती काळे छत्रपती संभाजीनगर, श्रावणी उंडाळे पुणे, शर्वरी कबनूरकर कोल्हापूर, सान्वी गोरे सोलापूर या मानांकितासह एकूण 35 जण संयुक्तपणे एक गुणाने आघाडीवर आहेत.

- अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता . कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला . या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला . या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .4
- हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! हिमनद्या वितळल्याने तयार झालेले काही हिमनदीय तलाव नैसर्गिक माती-बर्फ-दगडांच्या बांधांनी अडवलेले असतात. हा बांध तुटला की प्रचंड वेगाने पाणी, चिखल, दगड आणि बर्फाचा लोंढा दरीत खाली धावतो. यालाच म्हणतात GLOF - Glacial Lake Outburst Flood. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वेगाने वितळत असताना हिमालयातील अशा तलावांचा धोका का वाढतोय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला GLOF बद्दल आधी माहिती होती का? कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर शेअर करा. GLOF | Glacial Lake Outburst Flood | GLOF meaning | GLOF explained in Marathi | Glacial Lake | Himalayan Glaciers | Himalayan Flood | हिमालयातील पूर | हिमनदी | हिमनदी वितळणे | ग्लेशियल लेक | ग्लोबल वॉर्मिंग | Climate Change | हिमालयातील संकट |1
- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; ३० हून अधिक मंडळांचा सहभाग, सामाजिक सलोख्याचा संदेश1
- लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.4
- इन्स्टाग्राम रीलसाठी पिस्तूलचा धाक; बाबुर्डी येथील तरुणावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; सुपा पोलिसांची तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई सुपा, बारामती | इन्स्टाग्रामवर रील बनवताना पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर पोस्ट करणाऱ्या तरुणावर सुपा पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. सुपा पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी "prem_jagtap_0295" या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी, ता. बारामती येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या व्हिडिओवर “आलीशान युवा प्रतिष्ठान” असा मजकूर तसेच “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा स्वरूपाचा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना स्पष्ट इशारा दिला आहे—रीलच्या माध्यमातून शस्त्रांचे प्रदर्शन करून किंवा दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा संदेश सुपा पोलिसांनी दिला आहे. AP CRIME NEWS LIVE — जनहितासाठी निर्भीड बातमी, लोकजागृतीसाठी सदैव पुढे.1
- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1