logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नक्षलवाद गोळीने नाही, तर आदिवासींना जल-जंगल-जमिनीचे हक्क दिल्यानेच संपेल!”: खासदार डॉ. नामदेव किरसान “गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राने १० हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे.” गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत नियम १९३ अन्वये ‘नक्षलवाद’ विषयावरील चर्चेत सहभागी होत आपल्या मतदारसंघातील आदिवासी बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना त्यांनी ठामपणे मांडले की, नक्षलवाद ही केवळ कायदा व सुव्यवस्थेची समस्या नसून सामाजिक आणि आर्थिक अन्यायातून निर्माण झालेली समस्या आहे. त्यामुळे केवळ बंदुकीच्या गोळीने नव्हे, तर आदिवासींना त्यांच्या जल, जंगल आणि जमिनीचे हक्क मिळवून देऊनच ही समस्या कायमची संपवता येईल. खासदार डॉ. किरसान म्हणाले की, नक्षलवादी आणि पोलीस यांच्यातील संघर्षात नेहमी सामान्य आदिवासीच भरडला जातो. अनेक वेळा संशयाच्या आधारावर निरपराध आदिवासींना अटक केली जाते आणि त्यांना वर्षानुवर्षे तुरुंगात राहावे लागते. आदिवासींना ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून वापरणे तात्काळ थांबवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या लोहखनिज खाणींमुळे (उदा. सुरजागड) पर्यावरणीय व सामाजिक परिणाम गंभीर होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. खाणींमुळे जलस्रोत दूषित होत असून आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून बेदखल केले जात आहे, हे अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. नक्षलवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील महिलांना ‘विशेष पोलीस अधिकारी’ (SPO) म्हणून देण्यात आलेल्या तात्पुरत्या नोकऱ्या बंद केल्या जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या महिलांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. तसेच सुरजागड खाण प्रकल्पांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आदिवासी तरुणांसाठी ट्रक योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ८० तरुणांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करूनही त्यांना ना ट्रक मिळाले, ना पैसे परत मिळाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, पिढ्यानपिढ्या शेती करत असलेल्या आदिवासींना वनविभागाकडून होत असलेल्या त्रासाबाबतही त्यांनी आवाज उठवला. रस्ते व घरांच्या बांधकामात अडथळे निर्माण करून आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनीवरून बेदखल केले जात असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गडचिरोली हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आकांक्षी जिल्हा असल्याने, येथील पायाभूत सुविधा, रस्ते, शिक्षण व आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने थेट १० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर करावे, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली.

1 hr ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
c35dde6f-7606-4ac5-982b-19eb14149c82

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    1
    छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण
जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by Suresh k langde
    1
    Post by Suresh k langde
    user_Suresh k langde
    Suresh k langde
    कळमेश्वर, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    1
    कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    1
    उमरेड ( राजु जांभुळे )
भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए #Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews
    1
    सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए
#Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    45 min ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    53 min ago
  • नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    1
    नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.