logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.जफर अहेमद खान यांचे अकाली निधन,...!   छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), - पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.जफर अहेमद खान यांचे सोमवारी उशिरा रात्री दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उशीरा रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला होता. डॉ.जफर अहेमद खान हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांचे वय 55 वर्षे होते. या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढली होती. संजयनगर वार्डातून ते एकदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावर असताना शहराच्या विकासात अमूल्य योगदान दिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द होती. शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा त्यांचे योगदान आहे. कर्नाटक व राजस्थान राज्याचे प्रभारी म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले. काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक सेल व विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी शहरात धडकली यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. उद्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात त्यांचा दफनविधी कार्यक्रम होईल अशी माहिती काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दिली आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

4 hrs ago
user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
4 hrs ago
a641fbd8-45e4-475d-b3d1-6d5238cffff6

काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.जफर अहेमद खान यांचे अकाली निधन,...!   छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), - पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.जफर अहेमद खान यांचे सोमवारी उशिरा रात्री दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उशीरा रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला होता. डॉ.जफर अहेमद खान हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांचे वय 55 वर्षे होते. या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढली होती. संजयनगर वार्डातून ते एकदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावर असताना शहराच्या विकासात अमूल्य योगदान दिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द होती. शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा त्यांचे योगदान आहे. कर्नाटक व राजस्थान राज्याचे प्रभारी म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले. काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक सेल व विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी शहरात धडकली यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. उद्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात त्यांचा दफनविधी कार्यक्रम होईल अशी माहिती काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दिली आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

More news from Aurangabad and nearby areas
  • सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    1
    सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। 
बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    user_Akhtar maliq
    Akhtar maliq
    Gangapur, Aurangabad•
    22 hrs ago
  • सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    1
    सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    1
    आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Changdev Barge
    1
    Post by Changdev Barge
    user_Changdev Barge
    Changdev Barge
    राहाता, अहमदनगर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ​येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत. ​नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे. ​सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला
    1
    ​येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत.
​नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे.
​सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • 👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    1
    👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • चांदा व अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत चांदा (ता. नेवासा) व अहिल्यानगर शहर परिसरातून एकूण 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे सोनई व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे : 1) सोनई पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 138/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत 2015) व प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांनुसार कारवाई करत सुमारे 90,000/- रुपये किमतीची 6 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. आरोपी: आसिफ आतीक कुरेशी (फरार) लियाकत इस्माईल कुरेशी (फरार) उबेद कुरेशी (फरार) (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) 2) कोतवाली पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 259/2026 अन्वये 1,02,000/- रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी: सुफियान आयाज कुरेशी (फरार), रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर एकूण कारवाई: 2 गुन्हे दाखल 11 गोवंशीय जनावरे मुक्त 1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल (सर्व फरार) ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
    1
    चांदा व अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत चांदा (ता. नेवासा) व अहिल्यानगर शहर परिसरातून एकूण 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे.
पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे सोनई व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :
1) सोनई पोलीस स्टेशन हद्द
गु.र. नं. 138/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत 2015) व प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांनुसार कारवाई करत सुमारे 90,000/- रुपये किमतीची 6 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली.
आरोपी:
आसिफ आतीक कुरेशी (फरार)
लियाकत इस्माईल कुरेशी (फरार)
उबेद कुरेशी (फरार)
(सर्व रा. चांदा, ता. नेवासा)
2) कोतवाली पोलीस स्टेशन हद्द
गु.र. नं. 259/2026 अन्वये 1,02,000/- रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपी:
सुफियान आयाज कुरेशी (फरार), रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर
एकूण कारवाई:
2 गुन्हे दाखल
11 गोवंशीय जनावरे मुक्त
1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल (सर्व फरार)
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला
    1
    सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.