logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भारतीय जनता पार्टीच्या हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हिंगोली शहरात व्यापक जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रविवारी भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांनी शहरातील विविध भागांचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 'विश्वास, विकास आणि जनकल्याण' या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या दौऱ्यात शिवाजीराव मुटकुळे यांनी शहरातील नामांकित उद्योजक, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रांतील प्रभावी व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजना, ऐतिहासिक विकासकामे आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची माहिती नागरिकांना दिली. अभियानांतर्गत हिंगोलीतील ज्येष्ठ व्यापारी रमेशचंद्र बगडिया, ॲड. पी. के. शिरसाठ, डॉ. किशन लखमावार, डॉ. संजय नाकाडे, अभियंता अशोक अग्रवाल, डॉ. अखिल अग्रवाल, मयुर कयाल, नरेश अग्रवाल आणि ॲड. इंगळे यांच्या निवासस्थानी भेटी देण्यात आल्या. यावेळी स्थानिक समस्या, व्यापारी आणि व्यावसायिकांचे प्रश्न तसेच शहराच्या विकासा संदर्भातील विविध सूचना व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. भारतीय जनता पार्टी जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे सकारात्मक निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा विश्वास युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांनी व्यक्त केला. जनतेचा विश्वास आणि लोकसहभाग यातूनच हिंगोलीच्या विकासाचा मार्ग अधिक मजबूत होत असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, ॲड. अमोल जाधव, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, कार्याध्यक्ष पवन उपाध्ये आणि वैजनाथ शिंदे उपस्थित होते.

2 hrs ago
user_लोकराष्ट्र न्यूज
लोकराष्ट्र न्यूज
हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
2 hrs ago
81275ce5-d7b6-417f-af4c-886614f5f338

भारतीय जनता पार्टीच्या हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हिंगोली शहरात व्यापक जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रविवारी भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांनी शहरातील विविध भागांचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 'विश्वास, विकास आणि जनकल्याण' या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या दौऱ्यात शिवाजीराव मुटकुळे यांनी शहरातील नामांकित उद्योजक, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रांतील प्रभावी व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजना, ऐतिहासिक विकासकामे आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची माहिती नागरिकांना दिली. अभियानांतर्गत हिंगोलीतील ज्येष्ठ व्यापारी रमेशचंद्र बगडिया, ॲड. पी. के. शिरसाठ, डॉ.

ec300d4b-eacb-45bf-941a-96e0cf74dcd0

किशन लखमावार, डॉ. संजय नाकाडे, अभियंता अशोक अग्रवाल, डॉ. अखिल अग्रवाल, मयुर कयाल, नरेश अग्रवाल आणि ॲड. इंगळे यांच्या निवासस्थानी भेटी देण्यात आल्या. यावेळी स्थानिक समस्या, व्यापारी आणि व्यावसायिकांचे प्रश्न तसेच शहराच्या विकासा संदर्भातील विविध सूचना व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. भारतीय जनता पार्टी जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे सकारात्मक निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा विश्वास युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांनी व्यक्त केला. जनतेचा विश्वास आणि लोकसहभाग यातूनच हिंगोलीच्या विकासाचा मार्ग अधिक मजबूत होत असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, ॲड. अमोल जाधव, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, कार्याध्यक्ष पवन उपाध्ये आणि वैजनाथ शिंदे उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खासदार नागेश आष्टीकर अखेर जनतेसमोर आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
    1
    खासदार नागेश आष्टीकर अखेर जनतेसमोर आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
    user_लोकराष्ट्र न्यूज
    लोकराष्ट्र न्यूज
    हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
    1
    हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या दराटीच्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. वन विभागाला हे यश मिळाले असून, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर माकडाला पकडण्यात आले.
    1
    गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या दराटीच्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. वन विभागाला हे यश मिळाले असून, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर माकडाला पकडण्यात आले.
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • परभणी जिल्ह्यात एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) मोठी कारवाई करत १५ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीदरम्यान, एटीएसने काही युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
    1
    परभणी जिल्ह्यात एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) मोठी कारवाई करत १५ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीदरम्यान, एटीएसने काही युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली. शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे. या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.
    4
    विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली.

शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे.

या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.
    user_गजानन कडुजी राऊत
    गजानन कडुजी राऊत
    Graphic designer मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • माळेगाव येथे संध्याकाळी ठीक ५:०० वाजता जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुटले. या कारणामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. ही माळेगाव येथील सत्य घटना आहे.
    2
    माळेगाव येथे संध्याकाळी ठीक ५:०० वाजता जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुटले. या कारणामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. ही माळेगाव येथील सत्य घटना आहे.
    user_बालाजी बंडू तालीमकर
    बालाजी बंडू तालीमकर
    Farmer Nanded, Maharashtra•
    5 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.