दिल्लीतील जल महोत्सव मेगा कार्यक्रमासाठी खैरीचे सरपंच पुरुषोत्तम रूकमोडे यांना निमंत्रण दिल्लीतील ‘जल महोत्सव’ मेगा कार्यक्रमासाठी खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांना निमंत्रण 100 टक्के पाणीपट्टी वसुलीद्वारे आर्थिक शाश्वतता साधणाऱ्या गावांच्या श्रेणीत वलमाझरीची निवड साकोली : 10 मार्च 2026 भंडारा जिल्ह्यातील वलमाझरी ग्रामपंचायतीने 100 टक्के पाणीपट्टी वसुलीचा आदर्श घालून दिल्याची दखल राज्य व केंद्र शासनाने घेतली आहे. त्यामुळे दिल्ली येथील विज्ञान भवनात 11 मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय ‘जल महोत्सव’ मेगा कार्यक्रमासाठी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रीय जल जीवन मिशनच्या माध्यमातून 8 ते 22 मार्च 2026 या कालावधीत देशभरात “जल महोत्सव” पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने 11 मार्च रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात भारताचे राष्ट्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत जल महोत्सव अंतर्गत मेगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशभरातील आदर्श कामगिरी करणाऱ्या गावांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून विविध सहा वर्गवारींमध्ये नामनिर्देशन मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी करून राज्यातून एकूण 12 नामनिर्देशनांची निवड करण्यात आली आणि ती राष्ट्रीय जल जीवन मिशन, पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली येथे पाठविण्यात आली. या प्रक्रियेत भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत खैरी अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी गावाची “100 टक्के वापरकर्ता शुल्क (पाणीपट्टी) वसुलीद्वारे आर्थिक शाश्वतता साधणारे गावे” या वर्गवारीमध्ये निवड करण्यात आली. त्यामुळे या गावाचे सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांना दिल्ली येथे होणाऱ्या जल महोत्सवाच्या मेगा कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांच्या नेतृत्वाखाली वलमाझरी गावात नळ पाणीपुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाला घरपोच नळाद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो. ही योजना शाश्वत पद्धतीने चालू राहावी यासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत पाणीपट्टी वसुलीवर विशेष भर दिला. ग्रामपंचायतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना पाणीपट्टी भरण्यास प्रोत्साहित केले. या उपक्रमांच्या माध्यमातून 2021 पासून गावात 100 टक्के पाणीपट्टी वसुली होत असून, या निधीतूनच पाणीपुरवठा योजनेचा देखभाल व दुरुस्ती खर्च भागविला जात आहे. नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी ग्रामपंचायतीने काही आकर्षक उपक्रमही राबविले. यामध्ये हैदराबादसारख्या ठिकाणी विमानाद्वारे पर्यटन सहल, नागझिरा अभयारण्यात पर्यटनाची व्यवस्था, आरओ पाण्याची सुविधा तसेच इतर विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे गावकऱ्यांमध्ये पाणीपट्टी भरण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायतीला मोठे सहकार्य मिळत आहे. गावाच्या या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य शासन तसेच केंद्र शासनाने घेतली आहे. त्यामुळे वलमाझरी गावाला जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील आदर्श गाव म्हणून ओळख मिळाली आहे. दरम्यान, राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांनी दिल्ली येथे उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे निर्देश दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मिलिंदकुमार साळवे, प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन) श्री. माणिक चव्हाण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री हितेश खोब्रागडे यांनी गावाने केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने वलमाझरी गावाच्या पाणी व्यवस्थापनाच्या यशस्वी मॉडेलला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार असून, इतर गावांसाठीही हे उदाहरण प्रेरणादायी ठरणार आहे

- 8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटना साकोली च्या वतीने जागतिक महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त साकोली पोलिस स्टेशन हाल येथे कार्यक्रम पार पडले त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.इद्रायणी ताई कापगते महिला समुपदेशीका व सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख पाहुणे= मा.ॲडव्होकेट बघेले मॅडम फौजदारी न्यायालय साकोली मा माहेश्वरी ताई नेवारे माजी जि .प. सदस्या एकोडी प्रभाग मा.इनवाते मॅडम पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली बोरकर सर पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली स्वाती शहारे मॅडम तालुका समुह संघटक उपजिल्हा रुग्णालयात साकोली चौधरी मॅडम उपजिल्हा रुग्णालय कनिष्ठ अभियंता साकोली पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्नी. देवराम चांदेवार व उपाध्यक्ष सौ स्मिता खेडीकर हे होते कार्यक्रमाचे संचालन सौ.जयशिला बारसागडे पोलिस पाटील वटेश्वर स्वागत गीत सौ तिलोत्तमा कठाने ,सौ सुनंदा फंदे सौ वंदना मानापुरे ,सौ जयश्री रामटेके पोलिस पाटील प्रास्ताविक सौ दिक्षा उके पो. पाटील परसटोला आभार सौ ममता डडेमल पोलिस पाटील गडकुंभली कार्यक्रमाची सांगता चहा नाश्ता व राष्ट्रगीताने झाली4
- महागाव तालुक्यातील व पुसद विधानसभा मतदारसंघातील वाकान कोणदरी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था अतिशय दैनीय झाली असून या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कोणदरी येथील राहुल भिकाजी राठोड यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे. सन-२४-२५ मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकान व कोणदरी पोखरी ते माळहिवरा मार्गे जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दोन्हीपुलाची दुरावस्था झाली असून केंव्हा पुल कोसळून अपघात होईल याचा काही नेम सांगता येणार नाही. त्यामुळे पावसाळा लागन्या पुर्वी या दोन्ही पुलाचे बांधकाम न झाल्यास ते वाहुन जान्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही पुलाच्या बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील दिली होती. मात्र अद्यापही या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्याने दोन्ही ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर आहे.2
- कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.1
- मीना ढवळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सादर केलेली एकांकिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केली एकांकिका. नागपुर: आज 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने मीना ढवळे यांनी केलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केलेली एकांकिका.1
- महा बीड़ी झंडा महोत्सव 10 मार्च से 16 मार्च तक चलने वाला है, और इन 7 दिनों तक #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #bihar #Aurai #AkashPriyadarshi #mela1
- Post by Pitam Parjapati4
- वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद हिंगणघाटः वर्धा वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.1
- "जीते जी रक्तदान और मरने के बाद नेत्रदान" - डॉ. हेमकृष्ण कापगते साकोलीत नेत्र व आरोग्य शिबीरात २०५ जणांची तपासणी • १०० जणांची शस्त्रक्रियेला निवड • १२५ चष्मे वाटप • साकोली : "जीते जी रक्तदान और मरने के बाद नेत्रदान" याप्रमाणे प्रत्येक जणांनी हे कार्य राबविले तर जखमी रूग्णांना रक्त मिळून जीवनदान आणि नेत्रहीनांना दृष्टी मिळेल" असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी केले. ते ( मंगळ. १० मार्च ) ला जागतिक महिला दिनानिमित्त तसेच स्व. आत्माराम पटले व स्व. मुरलीधर गजापुरे यांच्या स्मरणार्थ आणि महात्मे नेत्र पेढी नागपूर, भंडारा जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान, श्याम बहुउद्देशीय शिक्षण संस्था साकोली, जिजामाता पतसंस्था साकोली व डॉ. हेडगेवार सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "डोळ्यांची तपासणी व आरोग्य शिबीर" उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शिबीरात २०५ जणांची तपासणी, १०० जणांची शस्त्रक्रियेला निवड तर १२५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबीराला अतिथी शरद गुप्ता, नगराध्यक्ष देवश्री कापगते, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, प्रशांत गुप्ता, किशोर गुप्ता, मालती लांजेवार, संस्था सचिव ॲड. मनिष कापगते, देवनाथ रहांगडाले, रंजना मस्के आदी उपस्थित होते. शिबिरात महात्मे नेत्र पेढी नागपूरचे डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ. विश्वजीत निकम, अथर्व भोंदले, ऐश्वर्या कडवे, आस्था बन्सोड, रितू सेलोटे या चमूने नेत्र आरोग्य सेवा दिली. येथे एकुण १०० जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रियासाठी नागपूरला निवड करण्यात आली. त्यासाठी पहिली ५० जणांची चमू १६ मार्चला व दुसरी ५० जणांची चमू १८ मार्चला नागपूरला रवाना होणार आहेत. या शिबिरात एकुण २०५ जणांनी नोंदणी करून आरोग्य शिबीराचा लाभ घेतला आणि १२५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. शिबिरात संचालन ॲड. मनिष कापगते यांनी केले. याप्रसंगी स्व. शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार, शकुंतला कापगते, विवेक कापगते, मोरेश्वर गहाणे, प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख आशिष चेडगे, राजू कापगते, युवराज गहाणे, अंगराज समरीत, अस्मिता पुरामकर, मधूकर नगरकर, भागवत लांजेवार, आशिष सैलोकर, सुमन शेंडे आदींनी स्वागत तथा आयोजनात विशेष सहकार्य केले.4