मुंबई-पुणे या मिसिंग लिंक रोडला "हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग" असे नाव द्यावे म्हणून शेवगाव-पाथर्डीतील सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना साकडे मुंबई-पुणे या मिसिंग लिंक रोडला "हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग" असे नाव द्यावे म्हणून शेवगाव-पाथर्डीतील सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना साकडे ( अहिल्यानगर जिल्हा) मुंबई-पुणे या मिसींग लिंक रोडला हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग असे नाव द्यावे म्हणून अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील सकल धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवून साकडे घातले आहे.सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सदरचा रस्ता हा सद्य स्थितीत मुंबई पुणे मिसिंग लिंक रोड या नावाने ओळखला जातो.परंतु त्या रस्त्याच्या संदर्भात एक ऐतिहासिक व प्रेरणादायी घटना सांगितली जाते की शिंग्रोबा धनगर हे एक धाडसी व देशभक्तीने भारावलेले व्यक्तीमत्व होते.इंग्रजांच्या काळात त्यांनी प्रथम इंग्रजांना हा रस्ता दाखवला होता.त्या बदल्यात इंग्रजांनी त्याला बक्षीस विचारले असता त्यांनी सांगितले की मला माझ्या साठी काहीही नको परंतु मला "माझ्या देशासाठी स्वातंत्र्य हवे आहे"अशी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून ही मागणी त्यावेळी शिंग्रोबानी केली होती.त्यांच्या या निर्भीड व देशभक्तीनी भारावलेल्या भुमिकेमुळे इंग्रजांनी शिंग्रोबा धनगर यांच्या वर त्याच ठिकाणी निर्दयीपणे गोळ्या झाडून त्यांना ठार केले होते.अशा प्रकारे देशासाठी ज्या घाटात शिंग्रोबा धनगर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या घाटातील रस्त्याला "शिंग्रोबा धनगर मार्ग" असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.शिंग्रोबा धनगर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व भावी पिढीला त्यांच्या देशभक्तीची जाणिव व्हावी यासाठी या मिसिंग लिंक रोड रस्त्याला "हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग"असे नाव देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी मागणी संपूर्ण राज्यभर जोर धरू लागली आहे.काही ठिकाणी तर उपोषणही सुरू झाली आहेत. शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने या निवेदनावर शेवगाव नगर परिषदेचे भाजपचे स्विकृत नगरसेवक गणेशराव कोरडे, प्राध्यापक विनायक नजन सर,पैलवान छगनराव पानसरे सर,गोपिचंद सोरमारे, सोमनाथ सावळेराम मतकर,बंडू हिराजी मतकर, केशवराव माधवराव फलके, विशाल गिरगुणे, रामेश्वर कोल्हे यांच्या सह्या आहेत.या निवेदनाची प्रत तहसीलदार साहेब यांच्या वतीने शेवगावचे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे साहेब यांनी स्विकारली आहे. या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, आणि वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्या आहेत.या निर्णया संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई-पुणे या मिसिंग लिंक रोडला "हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग" असे नाव द्यावे म्हणून शेवगाव-पाथर्डीतील सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना साकडे मुंबई-पुणे या मिसिंग लिंक रोडला "हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग" असे नाव द्यावे म्हणून शेवगाव-पाथर्डीतील सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना साकडे ( अहिल्यानगर जिल्हा) मुंबई-पुणे या मिसींग लिंक रोडला हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग असे नाव द्यावे म्हणून अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील सकल धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवून साकडे घातले आहे.सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सदरचा रस्ता हा सद्य स्थितीत मुंबई पुणे मिसिंग लिंक रोड या नावाने ओळखला जातो.परंतु त्या रस्त्याच्या संदर्भात एक ऐतिहासिक व प्रेरणादायी घटना सांगितली जाते की शिंग्रोबा धनगर हे एक धाडसी व देशभक्तीने भारावलेले व्यक्तीमत्व होते.इंग्रजांच्या काळात त्यांनी प्रथम इंग्रजांना हा रस्ता दाखवला होता.त्या बदल्यात इंग्रजांनी त्याला बक्षीस विचारले असता त्यांनी सांगितले की मला माझ्या साठी काहीही नको परंतु मला "माझ्या देशासाठी स्वातंत्र्य हवे आहे"अशी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून ही मागणी त्यावेळी शिंग्रोबानी केली होती.त्यांच्या या निर्भीड व देशभक्तीनी भारावलेल्या भुमिकेमुळे इंग्रजांनी शिंग्रोबा धनगर यांच्या वर त्याच ठिकाणी निर्दयीपणे गोळ्या
झाडून त्यांना ठार केले होते.अशा प्रकारे देशासाठी ज्या घाटात शिंग्रोबा धनगर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या घाटातील रस्त्याला "शिंग्रोबा धनगर मार्ग" असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.शिंग्रोबा धनगर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व भावी पिढीला त्यांच्या देशभक्तीची जाणिव व्हावी यासाठी या मिसिंग लिंक रोड रस्त्याला "हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग"असे नाव देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी मागणी संपूर्ण राज्यभर जोर धरू लागली आहे.काही ठिकाणी तर उपोषणही सुरू झाली आहेत. शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने या निवेदनावर शेवगाव नगर परिषदेचे भाजपचे स्विकृत नगरसेवक गणेशराव कोरडे, प्राध्यापक विनायक नजन सर,पैलवान छगनराव पानसरे सर,गोपिचंद सोरमारे, सोमनाथ सावळेराम मतकर,बंडू हिराजी मतकर, केशवराव माधवराव फलके, विशाल गिरगुणे, रामेश्वर कोल्हे यांच्या सह्या आहेत.या निवेदनाची प्रत तहसीलदार साहेब यांच्या वतीने शेवगावचे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे साहेब यांनी स्विकारली आहे. या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, आणि वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्या आहेत.या निर्णया संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
- "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.1
- राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कडक कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्या संदर्भात राजकीय स्तरावर बदलाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1