'लाडकी बहीण योजने'च्या नावाखाली महिलानी फसवणूक करणाऱ्या भामट्याला अरक... बीडः जिल्ह्यातील अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक गंडा घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जालन्यातून शिताफीने अटक केली आहे. गोरक्षनाथ नवनाथ पन्हाळकर (वय ३५, रा. नाळवंडी, ता. पाटोदा) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने समाज कल्याण विभागाचा बनावट अधिकारी असल्याचे सांगून महिलांची फसवणूक केली होती. याप्रकरणी कविता विठ्तल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आरोपी गोरक्षनाथ हा ८८५७९८५००८ या मोबाईल क्रमांकावरून महिलांशी संपर्क साधत असे. 'तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत शिलाई मशीन, पिठाची गिरणी आणि भांड्यांचे कीट मोफत मिळणार आहे' असे आमिष तो महिलांना दाखवत असे. या साहित्याच्या वाहतुकीचा खर्च म्हणून तो प्रत्येक महिलेकडून क्यूआर कोडद्वारे २२५० रुपये उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा प्रकार लक्षात येताच पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, कारण आरोपी वारंवार सिमकार्ड बदलत होता आणि आपला मोबाईल फोन वारंवार बंद करत होता. मात्र, तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक औटे आणि त्यांच्या पथकाने अतिशय बारकाईने तपास करून आरोपीचे लोकेशन शोधून काढले. अखेर ९ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी जालना शहरात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीची रवानगी बीड येथील जिल्हा कारागृहात केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक औटे, योगेश बहिरवाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा समावेश होता. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही भूलथापांना किंवा अमिषाला बळी पडू नये आणि संशयास्पद फोन कॉल आल्यास तत्काळ अंमळनेर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- लातूर - MIDC, मध्ये अतुल. मेटलच्या साईडला असलेल्या अल्म्युनियम भांडे बनविणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला आग...अग्निशमन दल पोहचले1
- सामाजिक बांधिलकी जपत आश्वजीत अनिल गायकवाड यांच्या सेवाकुंड संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेकडो लिटर ताक आणि पाणी बॉटल्स चे वाटप करण्यात आले1
- Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...1
- महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद1
- मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था। इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।1
- Post by अशोक दगडू वाघमारे1