धनगर पिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी जालना.(रामकिसन अवधूत) प्रतिनिधी : अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी १० वाजता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याचे स्मरण केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली असून, त्यांच्या विचारांचा आजही समाजाला मार्गदर्शक ठरणारा वारसा आहे, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले. या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. महेश लंगोटे, आरोग्य निरीक्षक आर. एम. ताकट, श्री. सी. ए. वाढे, नवले साहेब, अंजली ताई खरात, ज्ञानेश्वर बहुले, संदिप जावळे, पी. व्ही. गंगाधरे, कातखेडे सिस्टर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाच्या विचारांना अभिवादन करत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

- सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!1
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा2
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.1
- जालन्यात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; रतन लांडगे यांच्या हस्ते अभिवादन, पोलीस बँडने वाढवली शान! जालन्यात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; रतन लांडगे यांच्या हस्ते अभिवादन, पोलीस बँडने वाढवली शान!1
- जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.3
- भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा1
- एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1