Shuru
Apke Nagar Ki App…
जालना जिल्ह्यातील आणवा ते शिवना रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मार्गावर रस्त्यातच तळे साचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Machchindra dandge
जालना जिल्ह्यातील आणवा ते शिवना रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मार्गावर रस्त्यातच तळे साचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून अधिक बळकट करण्यासाठी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहकार विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या संस्थांमार्फत नागरिकांना सीएससी (Common Service Centre) सेवा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली असून, सीएससी केंद्र चालविण्यास उत्सुक नसलेल्या व निष्क्रिय असलेल्या संस्था तात्काळ सक्रिय करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सहकारी संस्थांनी पूरक व्यवसाय हाती घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यादृष्टीने बैठकीत प्रोत्साहन देण्यात आले. विकेंद्रीत धान्य साठवणूक योजनेअंतर्गत गोदाम उभारणीसाठी जालना जिल्ह्यातील दहा संस्थांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, संबंधित संस्थांना शासनाची जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा उपनिबंधक विष्णु रोडगे यांनी योजनेबाबत माहिती दिली. या बैठकीस पशुसंवर्धन विभाग, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दुग्ध सहकारी संस्था, कृषी विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग तसेच जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक उपस्थित होते. जिल्हाधिकारी मित्तल यांनी सर्व संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करून पुढील बैठकीत प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.1
- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या CJP आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रसंगी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना सर्वांनी पूर्ण शांतता व संयम राखून लोकशाही मार्गानेच आपला हा लढा पुढे सुरू ठेवावा, असे आवाहन केले.1
- मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली. त्यांच्या आगमनाने आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. जंतर-मंतरवर पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच परवा आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. "क्षत्रिय मराठे आम्ही शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर महाराष्ट्रातील मराठा समाज दिल्लीच्या छातीवर येऊन बसेल. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे," असे ते म्हणाले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमुळे जंतर-मंतरवरील या आंदोलनाला नवे बळ मिळाले असून, त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.2
- अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे आणि एससी समाजाला २० टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा गांधीचमन, शनिमंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत आणि अंबड चौफुली मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रिमझिम पाऊस सुरू असतानाही जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीतील नागरिक व महिला या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आणि यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय राज्यांवर ऐच्छिक ठेवला आहे. मात्र, राज्यभरात उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चे सुरू असतानाही सरकारने जनतेच्या भावनेचा आदर केला नाही, तर आंबेडकरी जनता सरकारचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रात जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकार घेत असेल, तर त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल आणि सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला दिला. दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवत या प्रकरणी जबाबदार मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही आनंदराज आंबेडकर यांनी केली.1
- औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील डोंगर गाव शिव येथील महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते.1
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. शहरातील एक ट्रक गॅरेज फोडून अज्ञात चोरट्याने 48 हजार रुपयांचे सामान चोरून नेले आहे.1
- दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईच्या विरोधात जालन्यात काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. या घटनांचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी जालन्यात काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेत निदर्शने करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि राहुल गांधी यांच्यावरील या कारवाईमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून जालन्यात याविरोधात जोरदार आवाज उठवला जात आहे.1