संविधानाची जाण – राष्ट्रनिर्मितीचा संकल्प : काठोडा तांडा येथे १११ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथील जि.प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त “संविधानाची जाण – राष्ट्रनिर्मिती” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने करण्यात आले. स्पर्धेत एकूण १११ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संविधानाविषयीची आपली जिज्ञासा व जागरूकता दाखवून दिली. प्रथम क्र. कु.साक्षी रामदास पवार,द्वितीय क्र. प्रणव पंडित पवार व तृतीय क्रमांक कु. राठोड आराध्या संजय या प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी चे माजी जिल्हाध्यक्ष (हिंगोली) अनिल कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “भारतीय संविधान हा देशाचा आत्मा असून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर उभा असलेला आपल्या लोकशाहीचा मजबूत पाया आहे. संविधानाचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याची शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे.” कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. क्यातमवार, श्री मुंढे सर,श्री वेणीकर, श्री मुळे सर,, रावले मॅडम,श्री सुरवसे सर, कऱ्हाळे सर श्री महामुनी सर श्री रणवीर सर, सरपंच अंबादास राठोड, उपसरपंच साहेबराव चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोवर्धन जाधव,पोलीस पाटील राठोड, हनीफ पठाण, यशवंत कांबळे, यश राठोड, जयदीप राठोड यांच्यासह ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन शाळा प्रशासन व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले...
संविधानाची जाण – राष्ट्रनिर्मितीचा संकल्प : काठोडा तांडा येथे १११ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथील जि.प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त “संविधानाची जाण – राष्ट्रनिर्मिती” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने करण्यात आले. स्पर्धेत एकूण १११ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संविधानाविषयीची आपली जिज्ञासा व जागरूकता दाखवून दिली. प्रथम क्र. कु.साक्षी रामदास पवार,द्वितीय क्र. प्रणव पंडित पवार व तृतीय क्रमांक कु. राठोड आराध्या संजय या प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी चे माजी जिल्हाध्यक्ष (हिंगोली) अनिल कांबळे यांनी मार्गदर्शन
करताना सांगितले, “भारतीय संविधान हा देशाचा आत्मा असून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर उभा असलेला आपल्या लोकशाहीचा मजबूत पाया आहे. संविधानाचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याची शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे.” कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. क्यातमवार, श्री मुंढे सर,श्री वेणीकर, श्री मुळे सर,, रावले मॅडम,श्री सुरवसे सर, कऱ्हाळे सर श्री महामुनी सर श्री रणवीर सर, सरपंच अंबादास राठोड, उपसरपंच साहेबराव चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोवर्धन जाधव,पोलीस पाटील राठोड, हनीफ पठाण, यशवंत कांबळे, यश राठोड, जयदीप राठोड यांच्यासह ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन शाळा प्रशासन व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले...
- *जन्म मृत्यू प्रमाणपत्रा साठी अडवणूक करू नका जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या कडक सूचना*2
- *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे4
- 🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏 #सिरपल्ली #हिमायतनगर #शेतकरीसंकट #आगघटना #ग्रामीणवार्ता #शासनमदत #FarmerDistress #मदतीचीगरज #NNLDigitalMedia1
- Post by Today One Live1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Mohammad Rafikh1
- छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती; संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती निमित्त रक्तदान शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले रक्तदान हे जीवनदान रक्तदान प्रतिज्ञा वाढवणे जरुरी असून गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे असे प्रतिपादन तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केले. शिवसेना (शिंदे) गट व शिवमुद्रा प्रतिष्ठान मंठा तालुका वतीने येथील प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स येथे दिनांक १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ वी जयंती निमित्ताने आणि संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना बोराडे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते कारण ते एखाद्याला नवीन जीवन देऊ शकते एका वेळेच्या रक्तदानातून तीन जणांचे प्राण वाचू शकतात.१८ ते ६५ व्ययोगटातील निरोगी व्यक्तीने दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते ज्यामुळे रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तदान हे सुरक्षित असून यातून कोणतेही कायमस्वरूपी नुकसान होत नाही या उलट रक्तदानातून मानवता निर्माण होते असे बोराडे म्हणाले. यावेळी आदर्श ब्लड सेंटरच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले एकुण 96 रक्त दात्यांनी रक्तदान केले.यावेळी रामराव वरकड, योगेश पाटील अवचार,भगवान गायकवाड,दिपक गायकवाड, एडवोकेट राजेश खरात, डॉक्टर संतोष पवार, अक्षय दीप वाघमारे, भीमराव वाघ, दिलीपराव हिवाळे, दत्तात्रय बोराडे, अमोल विरकर, बाळासाहेब देशमुख, माऊली वायाळ, शैलेश मोरे, रतन कळणे, पप्पू बोराडे, गोपीनाथ डेंगळे, विलास बनसोडे, पांडुरंग बोराडे, नाना बोराडे, नाथा दिवटे, विनोद खरात, पिराजी पवळे, सतीश वायाळ, राम वरकुटे, रवी डहाळे, पवन मगर, अलीम कुरेशी, पवन वाघमारे, लिंबाजी बोराडे, भगवान बोराडे, दत्ता खरात, विष्णूपंत मोरे, भरत नरोटे, राम नरोटे उपस्थित होते..1
- Post by Today One Live1