नाशिकच्या सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. ११) पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात डीबीएल (DBL) कंपनीच्या वॅन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका कार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात पहाटे सुमारे १:५० वाजता मुंबई कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक ५४१:०१ येथे घडला. महामार्गाच्या कडेला ब्रेकडाऊन झालेली एमएच ०४ एचएक्स २९५३ क्रमांकाची इर्टिगा कार उभी होती, ज्याच्या मदतीसाठी गोंदे टोल येथील डीबीएल कंपनीची एमएच १५ जेसी ३८१५ क्रमांकाची वॅन तिथे थांबली होती. डीबीएल वॅनचे चालक मुन्नालाल प्रजापती (वय ५०) हे ब्रेकडाऊन झालेल्या कार चालकाची विचारपूस करण्यासाठी खाली उतरले होते. याच दरम्यान, पाठीमागून आलेल्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मुन्नालाल प्रजापती यांच्या अंगावरून अज्ञात वाहनाचे चाक गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इर्टिगा कारचे चालक मनमोहन पोखरकर (वय ४०) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे शिर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी क्यूआरव्ही (QRV) पथक, गोंदे ॲम्ब्युलन्सचे डॉ. मुंढे व त्यांचे पथक, तसेच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वावी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी नितीन ढेपले घटनास्थळी उपस्थित असून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वावी पोलीस करत आहेत.
नाशिकच्या सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. ११) पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात डीबीएल (DBL) कंपनीच्या वॅन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका कार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात पहाटे सुमारे १:५० वाजता मुंबई कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक ५४१:०१ येथे घडला. महामार्गाच्या कडेला ब्रेकडाऊन झालेली एमएच ०४
एचएक्स २९५३ क्रमांकाची इर्टिगा कार उभी होती, ज्याच्या मदतीसाठी गोंदे टोल येथील डीबीएल कंपनीची एमएच १५ जेसी ३८१५ क्रमांकाची वॅन तिथे थांबली होती. डीबीएल वॅनचे चालक मुन्नालाल प्रजापती (वय ५०) हे ब्रेकडाऊन झालेल्या कार चालकाची विचारपूस करण्यासाठी खाली उतरले होते. याच दरम्यान, पाठीमागून आलेल्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना
जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मुन्नालाल प्रजापती यांच्या अंगावरून अज्ञात वाहनाचे चाक गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इर्टिगा कारचे चालक मनमोहन पोखरकर (वय ४०) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे शिर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती
मिळताच शिर्डी क्यूआरव्ही (QRV) पथक, गोंदे ॲम्ब्युलन्सचे डॉ. मुंढे व त्यांचे पथक, तसेच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वावी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी नितीन ढेपले घटनास्थळी उपस्थित असून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वावी पोलीस करत आहेत.
- नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।1
- नाशिकच्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड (वय ३७) यांना ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कारवाई थांबवून त्यांचे वाहन सोडण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.1
- बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून प्रशांत तुळशीराम वाडीले नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर नाशिक येथे आणण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाल्याप्रमाणे, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण गैरव्यवहारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. तपासादरम्यान समोर आले आहे की, प्रशांत वाडीले याने धुळे जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा वापर करून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस हवालदार कराड, गिते, पोलीस अंमलदार येवले तसेच अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस अंमलदार पचलोरे व महाले यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून वाडीले याला अटक केली. आरोपीला धुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल यांचे पथक करत आहे.1
- नाशिकच्या दत्तनगर भागात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे अखेर स्थानिकांचा संयम सुटला आहे. पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन नगरसेवक नितीन दातीर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. या वेळी नागरिकांनी तीव्र निदर्शने करत कार्यालयाला घेराव घातला आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली. प्रदर्शनकर्त्या नागरिकांच्या मते, या पाणीसमस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणत्याही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या या दुर्लक्षाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता या गंभीर जलसंकटावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील शिंदेवस्ती परिसरात आज सकाळी एका हृदयद्रावक दुर्घटनेत ५२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. दरेगाव येथील रहिवासी असलेल्या इंदुबाई संतोष देवरे या आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात माहेरी आल्या होत्या. नात शिक्षणासाठी तिथेच त्यांच्या भावाकडे राहत असून, वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इंदुबाई कालच राजदेरवाडीला पोहोचल्या होत्या. आज सकाळी इंदुबाई नेहमीच्या नित्यक्रमासाठी आणि प्रातःविधीसाठी घराबाहेर पडल्या असताना हा अनर्थ घडला. शिंदेवस्ती जवळील डोंगराचा भाग अचानक खचल्याने त्यावरून एक मोठा दगड थेट त्यांच्या अंगावर कोसळला. वजनी दगडाखाली दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कालपर्यंत आनंदाचे वातावरण असलेल्या घरात एका क्षणात शोककळा पसरली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे दरेगाव आणि राजदेरवाडी दोन्ही गावांवर शोकवदना पसरली असून परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवड पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.2
- विधानसभेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रस्तावांवर चर्चा करताना आमदार देवयानी फरांदे यांनी सखोल अभ्यासाच्या आधारे विविध महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी विद्यार्थ्यांचे हित, शिक्षणाचा दर्जा, गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि बदलत्या काळानुसार आवश्यक सुधारणांबाबत आपली ठोस भूमिका सभागृहात मांडली. यावेळी देवयानी फरांदे यांनी उच्च शिक्षण अधिक सक्षम, रोजगाराभिमुख आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थीकेंद्रित धोरणांवर विशेष भर दिला.1
- नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील सामाजिक कार्यकर्ते पुष्पक कानडे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परिसरातील गरजूंना आधार देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.1