राज्यस्तरीय कला शिक्षक सन्मान सोहळ्यात ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा गौरव परभणी जिल्ह्याच्या कलाक्षेत्राचा मान उंचावला परभणी (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राज्यस्तरीय कला शिक्षक सन्मान” सोहळा दि. २८ व २९ मार्च रोजी सातारा येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील कलाध्यापक ज्ञानेश्वर सूर्यभान कौसाईतकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात कौसाईतकर यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये कला विषयाची आवड निर्माण करून विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी महामंडळाचे राज्याध्यक्ष नरेंद्र बारई, राज्य सरचिटणीस दिगंबर बेंडाळे, राज्य सल्लागार व माजी राज्याध्यक्ष पी. आर. पाटील, सातारा जिल्हा कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख तसेच माजी शिक्षण सहसंचालक मकरंद गोंधळी यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यभरातील कला शिक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात मंचावरील मान्यवरांनी कला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना कौसाईतकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर कौसाईतकर यांनी हा सन्मान आपल्या कार्याची पावती असल्याचे सांगितले. पुढील काळात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला काळे सर, मुलगीर सर, सिरसकर सर तसेच परभणी जिल्ह्यातील मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. राज्यस्तरीय पातळीवर झालेल्या या सन्मानामुळे परभणी जिल्ह्याच्या कलाक्षेत्राचा मान अधिक उंचावला आहे.

- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- Post by Mohammad Rafikh1