भगवान महावीर जयंती निमित्त पाटोद्यात भव्य रक्तदान शिबीर संपन्न --- पाटोदा (प्रतिनिधी ) भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाटोदा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने युवक-युवतींनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी भगवान महावीर यांच्या अहिंसा, करुणा व सेवाभावाच्या शिकवणीचा जागर केला. “जीव दया हीच खरी सेवा” या संदेशाला अनुसरून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य विभागाच्या सहकार्याने उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी रक्तदान करणाऱ्या युवकांनी ही उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदानानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून पाटोदा शहरात सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. आयोजकांनी भविष्यात ही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
भगवान महावीर जयंती निमित्त पाटोद्यात भव्य रक्तदान शिबीर संपन्न --- पाटोदा (प्रतिनिधी ) भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाटोदा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने युवक-युवतींनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी भगवान महावीर यांच्या अहिंसा, करुणा व सेवाभावाच्या शिकवणीचा जागर केला. “जीव दया हीच खरी सेवा” या संदेशाला अनुसरून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य विभागाच्या सहकार्याने उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी रक्तदान करणाऱ्या युवकांनी ही उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदानानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून पाटोदा शहरात सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. आयोजकांनी भविष्यात ही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----1
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.1
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- Post by AapTak Hindi News Channel1