खामगाव शहरात पुन्हा धडकणार पालिकेचा 'जेसीबी'; अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले खामगाव: शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली असून, पुन्हा एकदा मोठी 'अतिक्रमण हटाव मोहीम' राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला, तरी अनेक छोटे व्यावसायिक आणि टपरीधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नगर परिषदेचे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मोहन अहिर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिमेची सुरुवात भुसावळ चौक येथून होणार आहे. कारवाईचा मार्ग भुसावळ चौक ते जगदंबा चौक मोहन चौक ते टॉवर चौक,टॉवर चौक ते शेगाव नाका,टिळक पुतळा ते विक्रमसी बाळापूर नाला (हॉटेल अजय पर्यंत) निश्चित करण्यात आला आहे.यापूर्वीही शहरात अशाच प्रकारे अतिक्रमण मोहीम राबवून रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात आले होते. "शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे," असे आवाहन मोहन अहिर यांनी केले आहे. ज्या व्यावसायिकांनी रस्त्यावर किंवा नालीवर अतिक्रमणे केली आहेत, त्यांनी ती स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा नगर परिषदेमार्फत जेसीबीच्या साहाय्याने ती हटवण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. मागील वेळी जेव्हा जेसीबी चालवण्यात आला होता, तेव्हा अनेक छोटे-मोठे व्यावसायिक बेरोजगार झाले होते. हातावर पोट असलेल्या कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. याही वेळी तीच परिस्थिती ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. एकीकडे शहर सौंदर्यीकरण आणि रस्ते रुंदीकरण होत असताना, दुसरीकडे गरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि मोहिमेदरम्यान होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी आपली अतिक्रमणे त्वरित हटवून घ्यावीत. असे आवाहन अतिक्रमण निर्मूलन पथकाचे मोहन अहिर यांनी केले आहे.

- खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या सोयीसाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आला आहे. या अद्ययावत कक्षाचे रीतसर उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या मातांना आता सुरक्षित आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. महिलांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांना सन्मानजनक वातावरण मिळावे, या उद्देशाने या 'हिरकणी कक्षा'ची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाची रचना करताना विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मातांना विश्रांती घेण्यासाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली असून, सोबत येणाऱ्या लहान मुलांचे मन रमावे यासाठी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शहर पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे नियंत्रण आणि जनसेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह शहरातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.1
- स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.1
- या प्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकाबाबत लेखी तक्रार दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बातमी : मिळालेल्या माहितीनुसार, जनुना येथील रहिवासी मंगेश प्रकाश कांबळे यांना ९ मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तक्रारीनुसार, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रुग्णाला अकोला येथे नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र त्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका चालकाने अकोला येथे नेण्यासाठी पैशांची मागणी केली. नातेवाईकांनी काही रक्कम तातडीने देऊन उर्वरित रक्कम अकोला येथे देण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र पैसे तात्काळ न मिळाल्याने रुग्णवाहिका पुन्हा खामगाव येथील रुग्णालयात परत आणण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर सुमारे एका तासाने मंगेश कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, मयताचे भाऊ सुनील कांबळे यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत खामगाव शहर पोलीस ठाणे आणि सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे.1
- एकता नगर वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे नगरपंचायत बाशिटाकळीमधील कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे1
- आई सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन माहिला साठी शिक्षण खुले माहिला व पाहिली शिक्षिका महाराष्ट्र राज्य तसेच देशातील माहिला समान मिळवून देणा-यार आई सावित्री अभिवादन1
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- Post by Sharad Dayedar1
- रोहणा : येथील जि.प. हायस्कूल शाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात 'जागतिक महिला दिन' आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक मध्ये मुख्याध्यापिका सौ. पुष्पा कोळी यांनी आपले विचार व्यक्त केले स्त्री ही केवळ घराची नाही तर समाजाचीही शक्ती आहे. आजच्या वैज्ञानिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे.अशा काही रोहणा पंचक्रोशीतील कर्तुत्वान महिलांचा या शाळेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने "जागतिक महीला दिनी" महिलांचा साडी ,चोळी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गिताने महिलांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमाला गावच्या प्रथम नागरिक सरपंच सविता ताई गव्हाळे , दिवठाणा सरपंच सौ.हेलोडेताई, वर्णा सरपंच सौ.संगीताताई राणा, निमकोहळा सरपंच सौ. राठोडताई,कोंन्टी सरपंच सौ. इंगळेताई, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी यांचे साडी,चोळी व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका सौ.पुष्पा कोळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच. शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या माता पालक संघअध्यक्षा अर्चनाताई टाले आणि शाळेच्या गेटसाठी भरीव निधी देणाऱ्या सौ. लिलाबाई लक्ष्मण आमले यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच एन,एम, एम,एस परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल ७ विद्यार्थी व त्यांच्या आईंचा साडीचोळी देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद सर्वश्री- राणे, निकस, जाधव, सावळे,चव्हाण, धुरंधर,खेळकर, हिवराळे, कळमकर,गर्गे,सौ. तेलगोटे मॅडम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पवार शिक्षक यांनी तर आभार प्रदर्शन दीपक शेजुळसर यांनी केले.4