महापौर सय्यद इकबाल यांची खंडोबा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; सुविधांवर प्रश्नचिन्ह परभणी (प्रतिनिधी) – शहरातील खंडोबा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नूतन महापौर सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख यांनी बुधवारी (दि. १) दुपारी अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्रातील अस्वच्छता, अपुरा औषध साठा आणि मूलभूत सुविधांच्या अभावावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. पाहणीदरम्यान केंद्रात सर्वत्र धूळ, अस्वच्छता तसेच आवश्यक साहित्याचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. यावर तातडीने उपाययोजना करून आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही महापौरांनी दिली. तसेच नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा देण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना केल्या. महापौरांनी औषध साठ्याची पाहणी करून उपलब्ध औषधांची माहिती घेतली. ज्या औषधांचा तुटवडा आहे, ती तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उपमहापौर गणेश देशमुख यांनीही मेडिसीन विभागात जाऊन स्वच्छता राखणे आणि आवश्यक औषधे वेळेवर मागवणे याबाबत सूचना केल्या. या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही व्यक्ती बसत असल्याच्या तक्रारीवरून महापौरांनी नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांना केंद्रातील सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले. दर आठवड्याला आरोग्य केंद्रांची पाहणी करून कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या. शहरातील सर्व २९ आरोग्य केंद्रांची पाहणी करून आढावा घेण्यात येणार असून, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, नळ कनेक्शन आणि खिडक्यांची दुरुस्ती आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. गरीब व गरजू नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक बबलू घागरमाळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, सहायक आयुक्त गजानन जाधव, डॉ. सबिहा फरद, शालिनीताई खिल्लारे तसेच मनपा माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, रमेश चव्हाण, उमेश जाधव, स्वच्छता निरीक्षक मोहम्मद शादाब आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- धावत्या ऑटोने घेतला पेट परभणीच्या वसमत रोडवरील घटना...1
- परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक1
- समृद्धी महामार्ग भीषण अपघात हृदयद्रावक व्हिडिओ - मृतांची संख्या आठवर... जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, जखमींपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता ८ झाली असल्याची माहिती सूत्रांनी रात्री उशिरा दिली.1
- Post by Balaji Vedpathak1
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली1
- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- विठाबाई नारायणगावकर तमाशा महिला कलावंताना जबर मारहाण.घारगाव पोलिस स्टेशनला कलावंत आक्रमक.1
- भाजपा स्थापना दिवस व SIR मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक भाजप संघटनमंत्री संजय कौडगे यांचे मार्गदर्शन1