रेल्वे रुळांवरून दुचाकीसह मार्ग ओलांडू नका – तो जीवघेणा ठरू शकतो! रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांचे नागरिकांना आवाहन** रेल्वे रुळांवरून दुचाकीसह मार्ग ओलांडू नका – तो जीवघेणा ठरू शकतो! रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांचे नागरिकांना आवाहन** परळी वैजनाथ, दि. ________ रेल्वे सुरक्षा दल (RPF), परळी वैजनाथ यांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही परिस्थितीत मोटारसायकल, स्कूटर किंवा इतर कोणतेही वाहन घेऊन रेल्वे रुळ अनधिकृतपणे ओलांडू नयेत. वेळ वाचविण्याच्या उद्देशाने अनेक नागरिक रेल्वे रुळांवरून दुचाकी घेऊन शॉर्टकटचा वापर करतात. मात्र, ही कृती अत्यंत धोकादायक असून जीवितास गंभीर धोका निर्माण करणारी आहे. वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाडीचा वेग आणि अंतराचा अचूक अंदाज येत नसल्यामुळे क्षणात गंभीर अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. रेल्वे रुळ अनधिकृतपणे ओलांडणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी केवळ अधिकृत रेल्वे फाटक (Level Crossing Gate), रोड ओव्हर ब्रिज (ROB), रोड अंडर ब्रिज (RUB) किंवा पादचाऱ्यांसाठी उपलब्ध अधिकृत मार्गांचाच वापर करावा. काही क्षणांचा वेळ वाचविण्याचा प्रयत्न आयुष्यभराची हानी ठरू शकतो. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा नियमांचे पालन करा आणि इतरांनाही त्याबाबत जागरूक करा. "आपली सुरक्षितता आपल्या हातात – नियम पाळा, जीव वाचवा." – रेल्वे सुरक्षा दल (RPF), परळी वैजनाथ

- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली. साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली.1