logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हा वार्षिक योजनेच्या विकास कामांचे प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामांचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. तसेच प्रत्येक कामाचे यूआयडी क्रमांकासह प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी कार्यवाही गतिमान करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले. यामध्ये शाळा वर्गखोली बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम तसेच दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण, तीर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती विकास, जलसंधारण, शाळा क्रीडांगण विकास यासह विविध कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचे अंदाजपत्रक यूआयडी क्रमांकासह तयार करून प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत. तसेच दायित्वाच्या कामांचे प्रस्तावही तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. अमृत वृक्ष योजनेत हिंगोली जिल्ह्याचे उद्दिष्ट 11 लाख जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेली वृक्ष लागवड तसेच आगामी काळात करावयाच्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा त्यांनी विभागनिहाय आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्यासाठी यापूर्वी 7 लाख 98 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. अमृत वृक्ष योजनेंतर्गत हे उद्दिष्ट वाढवून 11 लाख करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 48 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. उर्वरित उद्दिष्टानुसार संबंधित विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्ष लागवड पूर्ण करावी तसेच लागवड केलेल्या वृक्षांची माहिती ‘अमृत वृक्ष’ ॲपवर अद्ययावत करावी. वृक्ष लागवड मोहिमेत हिंगोली जिल्ह्याला आघाडीवर आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

21 hrs ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
21 hrs ago
83c3962d-8af5-4e85-aaab-743998cde5e3

जिल्हा वार्षिक योजनेच्या विकास कामांचे प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामांचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. तसेच प्रत्येक कामाचे यूआयडी क्रमांकासह प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी कार्यवाही गतिमान करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले. यामध्ये शाळा वर्गखोली बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम तसेच दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण, तीर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती विकास, जलसंधारण, शाळा क्रीडांगण विकास यासह विविध कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचे अंदाजपत्रक यूआयडी क्रमांकासह तयार करून प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत. तसेच दायित्वाच्या कामांचे प्रस्तावही तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. अमृत वृक्ष योजनेत हिंगोली जिल्ह्याचे उद्दिष्ट 11 लाख जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेली वृक्ष लागवड तसेच आगामी काळात करावयाच्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा त्यांनी विभागनिहाय आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्यासाठी यापूर्वी 7 लाख 98 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. अमृत वृक्ष योजनेंतर्गत हे उद्दिष्ट वाढवून 11 लाख करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 48 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. उर्वरित उद्दिष्टानुसार संबंधित विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्ष लागवड पूर्ण करावी तसेच लागवड केलेल्या वृक्षांची माहिती ‘अमृत वृक्ष’ ॲपवर अद्ययावत करावी. वृक्ष लागवड मोहिमेत हिंगोली जिल्ह्याला आघाडीवर आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे.  हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    1
    महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 min ago
  • पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    1
    पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! 
पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा!
#Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    1
    उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन 
उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • उमरखेड आगाराला मोठी भेट! पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या. नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रवाशांच्या अपेक्षा काय? दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात. वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी. सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. "नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    3
    उमरखेड आगाराला मोठी भेट!

पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन

महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा
उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या.
नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रवाशांच्या अपेक्षा काय?
दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.
वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी.
सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा
सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
"नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    1
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
    2
    पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना 
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर  नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली  वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.