नांदेड येथे सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय (MoSPI), भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत MahaSTRIDE प्रकल्पांतर्गत महत्त्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ करण्यात आला आहे. यात नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) यांचा समावेश आहे, जे जून २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबवले जाणार आहेत. या सर्वेक्षणांच्या कामाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या हस्ते माहितीपत्रकाच्या विमोचनाने झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आणि सांख्यिकी अधिकारी श्रीमती प्रज्ञा पांढरे तसेच अन्वेषक व पर्यवेक्षक उपस्थित होते. केंद्र शासनाच्या धर्तीवर अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन या सर्वेक्षणात सहभागी होत आहे. या सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी शासनाच्या विविध योजना आणि धोरणे तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. PLFS सर्वेक्षणाद्वारे रोजगार-बेरोजगारी, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार आणि असंघटित रोजगाराविषयी अद्ययावत व विश्वासार्ह माहिती मिळेल. तर, ASUSE सर्वेक्षणातून उत्पादन, व्यापार आणि सेवा (बांधकाम वगळून) क्षेत्रातील असंघटित उद्यमांची संख्या, रोजगाराचे प्रकार, कार्यरत कामगारांची संख्या, प्रति कामगार व प्रति उद्यम स्थूल मूल्यवृद्धी (GVA), उत्पादकता आणि वेतन यांसारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक निर्देशकांची माहिती प्राप्त होणार आहे. या माहितीच्या आधारे राज्य व जिल्हा उत्पन्नाचा अंदाज बांधणे तसेच शासनाच्या नियोजन व धोरणनिर्मितीस मदत होणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले. या सर्वेक्षणासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाने Ipsos Research Private Limited या संस्थेची नियुक्ती केली असून, त्यांचे अन्वेषक व पर्यवेक्षक निवडक नमुना पद्धतीने निवडलेल्या कुटुंबे आणि उद्योगांना भेट देऊन मुलाखतीद्वारे माहिती संकलित करतील. संकलित केलेली वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे आणि जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने सांख्यिकी अधिकारी श्रीमती प्रज्ञा पांढरे यांनी नागरिकांना सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य व परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

- नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील माणुसपुरी गावातील मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या गंभीर स्थितीमुळे येणाऱ्या काळात प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.1
- एका शिक्षकाच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत, त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणात नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार अंबादास दानवे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. नातेवाईक आणि आमदार दोघेही न्यायाच्या मागणीसाठी ठाम आहेत.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- परभणी जिल्ह्यात रेतीच्या तीव्र टंचाईमुळे अनेक घरकुलांची कामे थांबली आहेत. पाथरी, मानवत आणि सोनपेठ तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची घरे रेतीअभावी अर्धवट स्थितीत आहेत. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.1
- हिंगोलीमध्ये टाटा पॉवर सोलर प्रकल्पासाठी कथित विनापरवाना वृक्षतोड झाल्याचा आरोप करत, याविरोधात कारवाईच्या मागणीसाठी सुनील माने यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ही वृक्षतोड अनधिकृत असल्याचा दावा करत, माने यांनी प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या उपोषणाद्वारे पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला असून, संबंधित वृक्षतोडीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे. हिंगोलीतील या कथित अनधिकृत वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, सुनील माने यांच्या आंदोलनामुळे या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.1
- पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी ऑटो चालकांसाठी सक्त सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, सर्व ऑटो चालकांना त्यांची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे आणि विहित ड्रेस कोडचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असेही पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी स्पष्ट केले आहे, ज्यामुळे ऑटो चालकांनी सावधानता बाळगावी.1
- लोहा कंधार येथे 23 रोजी बौद्ध बांधवांकडून 'यलगार जन आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, बुद्ध संघटना आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.1
- शिवकुमार काळे यांच्या माहितीनुसार, नांदेडच्या बाफना रोड परिसरातील कविता हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका इलेक्ट्रिक AC दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग अत्यंत भयंकर स्थितीत असून, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही आणि या घटनेसंबंधीची अधिक माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अजून कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध झाली नसल्याचे दिसून येत आहे.1