धरणगाव येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्तिभावात संपन्न धरणगाव येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 14 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन समस्त तेली समाज व पंच मंडळ तसेच तेली युवक मित्र मंडळ, तेलाठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सप्ताहाच्या प्रारंभी भव्य कलश मिरवणूक काढण्यात येऊन अखंड हरिनाम कीर्तनास प्रारंभ करण्यात आला. या सप्ताहात नामवंत कीर्तनकार ह.भ.प. पंकज महाराज एकतासकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज तांदळवाडीकर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी कीर्तन सेवा सादर केली. त्यांच्या कीर्तनातून संताजी महाराजांचे विचार, वारकरी संप्रदायाची परंपरा, सामाजिक समता, भक्ती व सदाचाराचे महत्व प्रभावीपणे मांडण्यात आले. दि. 17 डिसेंबर रोजी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे काल्याचे कीर्तन ह.भ.प. शांताराम महाराज शेंदुर्णीकर यांनी सादर केले. त्यांच्या ओजस्वी व भावपूर्ण कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. काल्याच्या कीर्तनातून भक्तीचा आनंद, एकात्मता व संत परंपरेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी हरिपाठ, व रात्री कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. धरणगाव परिसरासह तालुका व जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला. सप्ताहाच्या समारोपप्रसंगी संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती, पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळ, समस्त तेली समाज व पंच मंडळ, तेली युवक मित्र मंडळ, महिला मंडळ तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. अखेरीस आयोजकांनी सर्व कीर्तनकार, भाविक, देणगीदार व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
धरणगाव येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्तिभावात संपन्न धरणगाव येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 14 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन समस्त तेली समाज व पंच मंडळ तसेच तेली युवक मित्र मंडळ, तेलाठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सप्ताहाच्या प्रारंभी भव्य कलश मिरवणूक काढण्यात येऊन अखंड हरिनाम कीर्तनास प्रारंभ करण्यात आला. या सप्ताहात नामवंत कीर्तनकार ह.भ.प. पंकज महाराज एकतासकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज तांदळवाडीकर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी कीर्तन सेवा सादर केली. त्यांच्या कीर्तनातून संताजी महाराजांचे विचार, वारकरी संप्रदायाची परंपरा, सामाजिक समता, भक्ती व सदाचाराचे महत्व प्रभावीपणे मांडण्यात आले. दि. 17 डिसेंबर रोजी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याच्या
कीर्तनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे काल्याचे कीर्तन ह.भ.प. शांताराम महाराज शेंदुर्णीकर यांनी सादर केले. त्यांच्या ओजस्वी व भावपूर्ण कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. काल्याच्या कीर्तनातून भक्तीचा आनंद, एकात्मता व संत परंपरेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी हरिपाठ, व रात्री कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. धरणगाव परिसरासह तालुका व जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला. सप्ताहाच्या समारोपप्रसंगी संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती, पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळ, समस्त तेली समाज व पंच मंडळ, तेली युवक मित्र मंडळ, महिला मंडळ तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. अखेरीस आयोजकांनी सर्व कीर्तनकार, भाविक, देणगीदार व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
- Ayyub Shaikh ने Aimim Party पर दिया बड़ा बयान1
- नमस्कार..!! मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७. आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील. प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!! कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका. मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार.. धन्यवाद. लवकरच भेटू.. मो. 9970037775. #मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६ #नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west1
- पेठन मौलाना चिश्ती दरगाह कमेटी और वक्त बोर्ड के अधिकारी, वक्त की सैकड़ो एकड़ जमीन को अनलीगल तरीके से बेंच रहै थे,,,दोषियों पर अब होगी बड़ी कार्रवाई,,, सुदर्शन न्यूज़ की खबर के बाद एक्शन मोड में है, महाराष्ट्र वक्त बोर्ड मंडल के अध्यक्ष समीर काजी,,,1
- Post by Vijay Kidve1
- राजुर टेंभुर्णी रोडवर पिकप पलटी होऊनभीषण अपघातात एक जण ठार सात जण गंभीर जखमी1
- Post by Shahrukh Khan2
- धुळे शिरपूर जळालेल्या कार मध्ये आढळला मानवी सांगडा2
- *🛑याही निवडणुकीत महाशक्तींचा पराभव होणार-- विजय वहाडणे.* *👉विजय वहाडणे यांची पत्रकार परिषद संपन्न1