अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसासह वीजांच्या कडकडाटामुळे मोठे नुकसान..,. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसासह वीजांच्या कडकडाटामुळे मोठे नुकसान होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अकोट तालुक्यातील कावसा येथे शेतात वीज कोसळून आठ मेंढ्या दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे मेंढीपालक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.अकोट तालुक्यातील कावसा येथील भटकर यांच्या शेतात ही घटना घडली. चितलवाडी येथील मेंढीपालक सखाराम झिटे यांनी आपल्या मेंढ्या चारण्यासाठी शेतात आणल्या होत्या. याच दरम्यान अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि जोरदार वीज कोसळली.या विजेच्या तडाख्यात सखाराम झिटे यांच्या तब्बल आठ मेंढ्या जागीच दगावल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मेंढीपालकाला मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, काल अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. बाबुळगाव जवळ वीज झाडावर कोसळल्याने सुमारे चार झाडे जळाल्याची माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसासह सतत होत असलेल्या विजेच्या घटनांमुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसासह वीजांच्या कडकडाटामुळे मोठे नुकसान..,. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसासह वीजांच्या कडकडाटामुळे मोठे नुकसान होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अकोट तालुक्यातील कावसा येथे शेतात वीज कोसळून आठ मेंढ्या दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे मेंढीपालक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.अकोट तालुक्यातील कावसा येथील भटकर यांच्या शेतात ही घटना घडली. चितलवाडी येथील मेंढीपालक सखाराम झिटे यांनी आपल्या मेंढ्या चारण्यासाठी शेतात आणल्या होत्या. याच दरम्यान अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि जोरदार वीज कोसळली.या
विजेच्या तडाख्यात सखाराम झिटे यांच्या तब्बल आठ मेंढ्या जागीच दगावल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मेंढीपालकाला मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, काल अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. बाबुळगाव जवळ वीज झाडावर कोसळल्याने सुमारे चार झाडे जळाल्याची माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसासह सतत होत असलेल्या विजेच्या घटनांमुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
- खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी1
- *खामगाव तालुक्यात रेती माफियांनी पुन्हा एकदा आपली मुजोरी दाखवून दिली आहे. अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या थेट तहसीलदारांच्याच अंगावर वाहन घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेखामगाव-नांदुरा रोडवरील पारखेड शिवारात ही घटना घडली. तहसीलदार सुनील पाटील हे आपल्या खाजगी वाहनाने या परिसरात गस्तीवर असताना, त्यांना रेतीची अवैध वाहतूक करणारे एक वाहन (क्रमांक MH 30 BD 7374) दिसून आले.जेव्हा तहसीलदारांनी या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला, तेव्हा चालकाने गाडी थांबवण्याऐवजी ती थेट तहसीलदारांच्या अंगावर घालून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तहसीलदार पाटील यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळलाया माफियाला सोडायचे नाही या जिद्दीने तहसीलदारांनी एखाद्या चित्रपटात शोभावा असा सिनेस्टाईल पाठलाग केला. काही अंतरावरच त्यांनी या वाहनाला घेराव घालून पकडले. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पारखेड परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. मी स्वतः खाजगी वाहनाने पाठलाग केला असता एका हायवा चालकाने मला चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. हायवेवरून त्याने युटर्न घेऊन धोकादायक पद्धतीने वाहन चालवले. आम्ही या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि फौजदारी कलमान्वये कारवाई प्रस्तावित केली आहे."1
- बुलढाणा शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; 'जिओ और जीने दो'च्या संदेशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन1
- खामगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलांचे अपहरण व जीवे मारायची धमकी...1
- खामगाव: अयोध्येतील श्रीराम नवमीचा उत्सव यंदा अकोला आणि खामगाव येथील भाविकांच्या योगदानाने अधिकच गोड झाला. अकोल्यातील प्रसिद्ध उद्योजक व खामगावचे नामांकित वकील ॲड. उदयसिंह आपटे यांचे बहीण-जावई सुधीरराव अभ्यंकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने अयोध्येत तब्बल साडेतीन लाख राजगिरा लाडूंचे भव्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात २२ मार्च रोजी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात आरती करून झाली. लाडूंनी भरलेले दोन मोठे ट्रक अयोध्येकडे रवाना करण्यात आले. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या ट्रकला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. अयोध्या येथे पोहोचल्यानंतर अभ्यंकर परिवार आणि त्रिशक्ती ग्रुपचे सचिव सत्येंद्रसिंह ठाकूर यांनी या महाप्रसादाच्या वाटपाची धुरा सांभाळली. रामनवमीच्या पर्वावर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत अखंडपणे लाखो भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विवेक बिडवई हेदेखील आपल्या पत्नीसह उपस्थित होते.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- भोंदु बाबा व नागरिक , भोंदु बाबांना आरती म्हणता येत नाही.. भोंदु महाराज खेड तालुक्यातील घटना ...1