नागपुरात गणेश पाटील यांच्या कार्यालयात अभिनेता सुनील चौरसियांची भेट नागपुरात गणेश पाटील यांच्या कार्यालयात अभिनेता सुनील चौरसियांची भेट दोन मोठ्या चित्रपट प्रोजेक्ट्सची घोषणा नागपूर हिंगणा प्रतिनिधी नागपूर/ हिंगणा : शहराच्या कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पाटील ग्रुपच्या वतीने लवकरच दोन मोठे चित्रपट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार असून, त्यामध्ये हिंदी चित्रपट “कुंती राघव” तसेच मराठी चित्रपट “कस्तुरी” यांचा समावेश आहे. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच मुंबई आणि नागपुरात सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती निर्माता व कलाकार गणेश पाटील यांनी त्यांच्या नव्या कार्यालयात आयोजित विशेष बैठकीदरम्यान दिली. हे कार्यालय २०२ कृष्ण कुंज रेसिडेन्सी, वासुदेव नगर मेट्रो स्टेशनजवळ सुरू करण्यात आले आहे. गणेश पाटील यांनी सांगितले की, या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून नागपूरसह विदर्भातील प्रतिभावान कलाकार, तंत्रज्ञ आणि नवोदित युवकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागपुरात वाढत असलेल्या फिल्म इंडस्ट्रीच्या संधी लक्षात घेता हे प्रोजेक्ट शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मुंबईसारख्या मोठ्या फिल्म सिटीसोबत नागपुरात शूटिंग होत असल्याने स्थानिक कलाकारांना थेट मोठ्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. या विशेष प्रसंगी हिंदी चित्रपट “पाठशाळा” आणि गाजलेल्या मराठी चित्रपट “सोबत” मधील प्रतिभावान कलाकार सुनील चौरसिया विशेष उपस्थित होते. सुनील चौरसिया यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आणि दमदार भूमिकांमुळे कला क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते अनेक वर्षांपासून रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात सक्रिय असून युवा कलाकारांना प्रेरणा देत आहेत. त्यांच्या अनुभव आणि मार्गदर्शनामुळे नागपुरातील नवोदित कलाकारांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन ढाकुलकर हेही उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी गणेश पाटील यांना नव्या प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा देत चित्रपटांच्या यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, गणेश पाटील यापूर्वी “तू तिथे असावे” या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आले होते. या चित्रपटात त्यांनी नागपूर शहरातील अनेक स्थानिक कलाकारांना संधी देत अभिनय क्षेत्रात नवी ओळख निर्माण करून दिली होती. त्यामुळे नागपुरातील अनेक युवा कलाकार आज त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत. चित्रपट निर्मितीसोबतच गणेश पाटील हे संगीत क्षेत्रातही सक्रिय असून, त्यांच्या अनेक गाण्यांचे अल्बम प्रदर्शित झाले आहेत. विशेष म्हणजे, या गाण्यांना त्यांनी स्वतःचा आवाज दिला आहे. कला क्षेत्रातील त्यांची जिद्द आणि नवोदित कलाकारांना पुढे आणण्याची भूमिका यामुळे ते सतत चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले असून, शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गजानन ढाकुलकर यांनीही त्यांचे अभिनंदन करत नागपूरच्या कलाकारांना पुढे आणण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आता सर्वांच्या नजरा “कुंती राघव” आणि “कस्तुरी” या आगामी चित्रपटांकडे लागल्या असून, या चित्रपटांमुळे नागपूरच्या चित्रपट क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- हिंगण्यातील जाहिरातीची मुंडन झालेली फ्रेम सांगतेय वा-याचा वेग हिंगण्यातील जाहिरातीची मुंडन झालेली फ्रेम सांगतेय वा-याचा वेग नागपूर/हिंगणा प्रतिनिधी हिंगणा: (दि १११) : शहरात काल अचानक आलेल्या सोसाट्याच्या वा-याने हिंगणा-रायपूर मार्गावरील असलेल्या नायरा पेट्रोल पंप नजिक इमारतीवर लावलेल्या जाहिरात फलकाचे क्षणार्धत मुंडन झाल्याचे चित्र पहायला भेटले. सोसाट्याचा वारा हा किती वेगाने वाहात होता यांचा अंदाज या फ्रेम वरून नक्कीच घेता येईल.1
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.1
- नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.1
- अभिनेता किरण माने यांनी आपल्या रक्तात 'शिव-भीम विचारांची धग आणि रग' भिनल्याचे मोठे विधान केले. कोल्हापुरातील त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर, त्यांनी आपल्या विरोधकांना डिवचत हे कॉम्बिनेशन 'लै खतरनाक' असल्याचे म्हटले. त्यांची तडफड हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.1