मनपा करणार थकबाकीदारांची हरॅशमेंट वेळेवर कर भरणार्यांना मनपाने सुविधा न पुरविल्यास बोंबा माराव्यात का? मनपा जाहीर करणार थकबाकीदारांची नावेमालमत्ता कर वसुलीसाठी आक्रमक मोहीम टॅक्स भरलेले 54,123 मालमत्ताधारकांचे कर संकलन विभागाने मानले आभार लातूर//मनोकामना : आर्थिक वर्ष 2025-26 संपण्यास अवघे 3 दिवस बाकी असतानाही काही थकबाकीदार मालमत्ताधारक टॅक्स भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मालमत्ताधारकांसाठी विविध सुट योजना देण्यात आले होती. त्यानंतर तीन वेळेस 100% शास्ती सुट योजना देखील लागु केली. त्यानंतर दोन वेळेस 80% शास्ती सुट व पुन्हा 70% शास्ती सुट लागु करून तीन वेळेस मुदतवाढ सुधा देण्यात आली. शेवटची संधी म्हणुन 50% शास्ती सुट सध्या देण्यात येते. यादरम्यान तब्बल 54 हजार हून अधिक मालमत्ताधारकांनी 70 कोटीचा कर भरणा केला. परंतु तब्बल 10 वेळा विविध सुट योजना लागु करूनही काही थकबाकीदार मालमत्ताधारक टॅक्स भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. महापालिकेच्या कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार जप्ती कारवाई मागील 2 महिना पासून सुरू केली आहे. कर वसुलीसाठी आत्तापर्यंत जप्ती मोहीम,नळ तोडण्यात येत आहेत. त्यानंतरही काही थकबाकीदार टॅक्स भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने अश्या मालमत्ताधारकां विरुद्ध धडक कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त मानसी मीना यांनी कर संकलन विभागास दिले. त्यानुसार आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस (31 मार्च) पर्यंत टॅक्स भरणा करणार नाहीत असे थकबाकीदार यांची नावे 2 एप्रिल पासून वर्तमानपत्रात व चौकाचौकात बॅनर वर जाहीर केले जाणार आहेत. यामधे पहिल्या टप्यात 75 हजार वरील थकबाकीदार यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत . यामध्ये निवासी तसेच,दुकानदार,व्यावसायिक,बांधकाम व्यावसायिक,हॉटेलचालक,उद्योजक,बँक,पतसंस्था,मोकळ्या जमिनींचे मालक,विविध संस्था आदी थकबाकीदार मालमत्ताधारकांची नावे असतील.आता प्रत्येक झोनमधील मोठे थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने. त्यामुळे थकबाकीदारांनी आपले नाव जाहीर होणे टाळण्यासाठी सध्या सुरू असलेले 50% शास्ती सुट योजनेचा लाभ घेऊन टॅक्स भरावे व थकबाकीदार ऐवजी करदाते म्हणुन प्रसिद्ध व्हावे असे आवाहन केले आहे.दरम्यान,थकित बिल भरण्यासाठी नागरिकांना मदत होण्यासाठी ऑनलाईन सुविधा व अधिकचे कॅश काऊंटर वाढविले आहेत व सुट्टीच्या दिवशी सुध्दा सुरू ठेवले आहेत. मालमत्ता धारकांनी महानगरपालिकेचा कर वेळेवर भरणा करावा. हे जसे महानगरपालिकेला महत्त्वाचे वाटते तसे नागरिकांना वेळेवर आणि चांगल्या सुविधा पुरविण्याचे काम महानगरपालिकेचे नाही काय? जर थकीत मालमत्ता धारका ंकडून कर भरणा नाही झाल्यास त्यांची नावे दोन एप्रिल नंतर चौका चौकात आणि वर्तमानपत्रातून जाहीर केले जाणार आहेत. म्हणजे महानगरपालिकेची कर वसुलीसाठी दंडेलशाहीचा हा प्रकार आहे.परंतु ज्यांनी कर भरणा केला आहे. त्यांना सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य आहे. परंतु आत्तापर्यंत तरी महानगरपालिकेने आपले कर्तव्य पार पाडले आहे असे दिसून येत नाही. जर महानगरपालिका थकबाकीदारांची हरेशमेंट करणार असेल तर वेळेवर कर भरणा करणार्या कडून महानगरपालिकेची हरासमेंट करण्यासाठी महानगरपालिके समोर बोंबा मारायचा का? महानगरपालिका थकीत करदात्याची वसुली न झाल्यास हरॅसमेंट नंतर ती रक्कम सोडून देणार का?न्यायालय जर एखाद्या आरोपीला एखाद्या प्रकरणातील रक्कम भरणा होत नसेल तर अतिरिक्त शिक्षा सुनावते. त्याप्रमाणे थकबाकीदारांनी हरॅशमेंट हीच अतिरिक्त शिक्षा समजून थकीत रक्कम महानगरपालिकेला माफ करायला भाग पाडावे.आणि महान्रगर पालिकेला कायदेशीर मार्ग हाती असताना हरॅशमेंट करण्याचा अधिकार कोणी दिला.

- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1