* कोल्हापूर डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष बी.आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यंदाही महाविद्यालयात १०० टक्के प्रवेश पूर्ण झाला आहे. यावेळी सर्वाधिक गुणांसह प्रवेश घेणाऱ्या गायत्री देशपांडे हिचा कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, वास्तुशास्त्र हे केवळ इमारतींच्या रचनेपुरते मर्यादित नसून समाजाच्या गरजा, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि मानवी जीवनशैली यांचा विचार करणारे व्यापक क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत सर्जनशीलता, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करून भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला तयार करावे. वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातील बदलत्या संधी, व्यावसायिक कौशल्ये आणि वास्तुविशारद म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती त्यानी दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करावीत असे आवाहन त्यानी केले. प्राचार्य डॉ. संजय एस. पवार म्हणाले, महाविद्यालयाला मिळालेले १०० टक्के प्रवेशाचे यश हे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यार्थी आणि पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कौशल्यांना नवी दिशा द्यावी. स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे विभागप्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक उपक्रम, विभागातील सुविधा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती दिली. त्यानंतर नव्या विद्यार्थ्यांना स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील विविध विभाग, प्रयोगशाळा व शैक्षणिक सुविधांची प्रत्यक्ष भेटीतून माहिती देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय एस. पवार, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रवेश विभागप्रमुख आर. जी. बेन्नी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रवेश समन्वयक प्रा. तिलोत्तमा पाडळे आणि प्रा. मनजीत जाधव यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कोल्हापूर -गुणवत्ता यादीतील प्रथम विद्यार्थिनी गायत्री देशपांडे हिचा सत्कार करताना डाॅ. ए. के. गुप्ता. समवेत डॉ. संजय एस. पवार, डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. इंद्रजीत जाधव, प्रा. आर. जी. बेन्नी

- *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* प्रतिनिधी स्वाती हडकर *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* *रत्नागिरी, दि. १७ (जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि आदरयुक्त वागणुकीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.* पुण्याहून रत्नागिरीत आलेल्या अॅडव्होकेट तहसीन इनामदार या गरोदर मातेने या अभियानादरम्यान मिळालेल्या अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तपासणीसाठी केंद्रावर आल्यानंतर येथील डॉक्टर, कर्मचारी आणि उपस्थितांकडून अत्यंत आदराची व आपुलकीची वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "मी सध्या सातव्या-आठव्या महिन्यात असून पुण्यावरून आल्यानंतरचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. केंद्रावर प्रवेश केल्यापासून तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्व डॉक्टर्स आणि सपोर्टिंग टीमने अतिशय सहकार्य केले. पुण्यातही मला सहसा न मिळालेला सन्मान आणि काळजी येथे पाहायला मिळाली. पुढील काही महिन्यांसाठी आवश्यक असणारी सर्व आरोग्य सेवा व सहकार्य येथून उत्तम प्रकारे मिळेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो." १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ‘सेवा संकल्प अभियाना’तून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जात असून, प्रशासनाच्या या उपक्रमामुळे दुर्गम व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.1
- दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते1
- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- डोळ्यात अंजन घालून बघण्यासारखा खूप अप्रतिम व्हिडिओ कृतज्ञता सदगुरुराया, तुम्ही आम्हाला देव पाहण्याची आणि तो अनुभवण्याची दृष्टी दिली1
- खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेडच्या वतीने भरणे येथील काळकाई मंदिर हॉलमध्ये बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्हा संघटक तथा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनिष विलास पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा तसेच आगामी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. खेड तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. बैठकीस रत्नागिरी जिल्हा सचिव सचिन राजाराम गायकवाड, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष मंगेश सिताराम चाळके, बहुतुक सेना तालुका अध्यक्ष शशिकांत (पप्पू) आंबे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.3
- बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार1