logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जगप्रसिद्ध Ajanta Caves येथे मधमाशांचा हल्ला; देशी-विदेशी सुमारे 100 हून अधिक पर्यटक जखमी लेणी परिसरातील बस पार्किंगजवळ घटना; काही पर्यटकांना खाजगी दवाखान्यात तर काहींना ग्रामीण रुग्णालयात उपचार प्रतिनिधी सोयगाव.. दिलीप मोरे.. जगप्रसिद्ध Ajanta Caves परिसरात मंगळवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास अचानक मधमाशांच्या थव्याने पर्यटकांवर हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. लेणी परिसरातील बस पार्किंगजवळ ही घटना घडली. मधमाशांच्या चाव्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिक नागरिक असे मिळून अंदाजे १०० ते १२० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या दरम्यान लेणी पाहून बाहेर येणारे तसेच लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक बस पार्किंग परिसरात थांबले असताना अचानक मधमाशांचा थवा आला. काही क्षणातच मधमाशांनी अनेकांना चावा घेतल्याने पर्यटकांमध्ये घबराट पसरली. यामध्ये परदेशी पर्यटक सुमारे दहा, श्रीलंकेतील पर्यटकांच्या गटातील सुमारे ऐंशी जण, तसेच Jabalpur येथील दहा पर्यटक आणि फर्दापूर परिसरातील काही स्थानिक नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत सात वर्षांच्या एका मुलीच्या चेहऱ्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने तिचा चेहरा सुजल्याची माहिती मिळाली आहे. तिच्या आईलाही हातावर मधमाशांनी चावा घेतला आहे. दरम्यान, बस पार्किंगमध्ये आलेल्या काही पर्यटकांच्या बस तातडीने परत वळवून बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमी झालेल्या काही पर्यटकांनी स्वतःच्या वाहनातून खाजगी दवाखान्यांकडे धाव घेतली, तर काहींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमुळे काही काळ लेणी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

on 13 March
user_DILIP DESHMUKH
DILIP DESHMUKH
Farmer Soegaon, Aurangabad•
on 13 March
dd94b273-e3da-418b-a41f-64979df3e418

जगप्रसिद्ध Ajanta Caves येथे मधमाशांचा हल्ला; देशी-विदेशी सुमारे 100 हून अधिक पर्यटक जखमी लेणी परिसरातील बस पार्किंगजवळ घटना; काही पर्यटकांना खाजगी दवाखान्यात तर काहींना ग्रामीण रुग्णालयात उपचार प्रतिनिधी सोयगाव.. दिलीप मोरे.. जगप्रसिद्ध Ajanta Caves परिसरात मंगळवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास अचानक मधमाशांच्या थव्याने पर्यटकांवर हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. लेणी परिसरातील बस पार्किंगजवळ ही घटना घडली. मधमाशांच्या चाव्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिक नागरिक असे मिळून अंदाजे १०० ते १२० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या दरम्यान लेणी पाहून बाहेर येणारे तसेच लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक बस पार्किंग परिसरात थांबले असताना अचानक मधमाशांचा थवा आला. काही क्षणातच मधमाशांनी अनेकांना चावा घेतल्याने पर्यटकांमध्ये घबराट पसरली. यामध्ये परदेशी पर्यटक सुमारे दहा, श्रीलंकेतील पर्यटकांच्या गटातील सुमारे ऐंशी जण, तसेच Jabalpur येथील दहा पर्यटक आणि फर्दापूर परिसरातील काही स्थानिक नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत सात वर्षांच्या एका मुलीच्या चेहऱ्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने तिचा चेहरा सुजल्याची माहिती मिळाली आहे. तिच्या आईलाही हातावर मधमाशांनी चावा घेतला आहे. दरम्यान, बस पार्किंगमध्ये आलेल्या काही पर्यटकांच्या बस तातडीने परत वळवून बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमी झालेल्या काही पर्यटकांनी स्वतःच्या वाहनातून खाजगी दवाखान्यांकडे धाव घेतली, तर काहींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमुळे काही काळ लेणी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालना आरटीओ कार्यालयाशेजारी भीषण आग; गायरान जळून खाक जालना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या शेजारील परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गायरान जमिनीवरील सुकलेल्या गवताने क्षणात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गायरान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुकलेल्या गवतामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
    1
    जालना आरटीओ कार्यालयाशेजारी भीषण आग; गायरान जळून खाक 
जालना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या शेजारील परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गायरान जमिनीवरील सुकलेल्या गवताने क्षणात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले.
आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गायरान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुकलेल्या गवतामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत जल्लोष; आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खांद्यावर घेत नृत्य, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली. या मिरवणुकीत पाचोरा-भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात रंग भरला. विशेष म्हणजे ढोल-ताशांच्या गजरात व गाण्यांच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्यावरही त्यांनी आनंदाने डान्स करत जल्लोषात भर टाकली. त्यांचे सुपुत्र, नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते यांनी देखील मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी युवकांमध्ये विशेष ऊर्जा दिसून आली असून, संपूर्ण परिसर आंबेडकरमय झाल्याचे चित्र होते. जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. एकूणच, यंदाची आंबेडकर जयंती पाचोरा-भडगाव तालुक्यात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
    1
    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत जल्लोष; आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खांद्यावर घेत नृत्य, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट
पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) :
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली.
या मिरवणुकीत पाचोरा-भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात रंग भरला. विशेष म्हणजे ढोल-ताशांच्या गजरात व गाण्यांच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्यावरही त्यांनी आनंदाने डान्स करत जल्लोषात भर टाकली.
त्यांचे सुपुत्र, नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते यांनी देखील मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी युवकांमध्ये विशेष ऊर्जा दिसून आली असून, संपूर्ण परिसर आंबेडकरमय झाल्याचे चित्र होते.
जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
एकूणच, यंदाची आंबेडकर जयंती पाचोरा-भडगाव तालुक्यात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    22 hrs ago
  • बोरगांव बाजार येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...
    2
    बोरगांव बाजार येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...
    user_Swal Jansamannyaca ...
    Swal Jansamannyaca ...
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • भोकरदनमध्ये जयंती उत्सव 2026मोठ्या उत्सहात साजरा, जयंती मिरवणुकीत वृद्धसह, तरुण तरुणीनी धरला तालावर ठेका
    1
    भोकरदनमध्ये जयंती उत्सव 2026मोठ्या उत्सहात साजरा, जयंती मिरवणुकीत वृद्धसह, तरुण तरुणीनी धरला तालावर ठेका
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    8 hrs ago
  • धरणगाव (प्रतिनिधी) – मौजे वंजारी ता. धरणगाव येथील शेतकरी श्री. पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या गट क्रमांक 39/2 मधील शेतात आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत सुमारे 80 आर क्षेत्रातील उभे मका पीक पूर्णतः जळून खाक झाले असून 100 टक्के नुकसान झाले आहे. घटनेनंतर तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तलाठी इफ्तार देशमुख यांनी पाहणी करून अहवाल तयार केला. यावेळी एमएसईबीचे स्थानिक कर्मचारी तसेच गावातील नागरिक तुषार यशवंत चौधरी, ताराचंद अशोक महाजन, नामदेव पांडुरंग पाटील, शंकर भगवान पाटील व शांताराम जगन्नाथ महाजन उपस्थित होते. दरम्यान, अशा प्रकारच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येते.शासनाने त्वरित काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
    1
    धरणगाव (प्रतिनिधी) – मौजे वंजारी ता. धरणगाव येथील शेतकरी श्री. पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या गट क्रमांक 39/2 मधील शेतात आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या आगीत सुमारे 80 आर क्षेत्रातील उभे मका पीक पूर्णतः जळून खाक झाले असून 100 टक्के नुकसान झाले आहे. घटनेनंतर तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तलाठी इफ्तार देशमुख यांनी पाहणी करून अहवाल तयार केला.
यावेळी एमएसईबीचे स्थानिक कर्मचारी तसेच गावातील नागरिक तुषार यशवंत चौधरी, ताराचंद अशोक महाजन, नामदेव पांडुरंग पाटील, शंकर भगवान पाटील व शांताराम जगन्नाथ महाजन उपस्थित होते.
दरम्यान, अशा प्रकारच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येते.शासनाने त्वरित काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    1
    घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    user_Aai Lonche
    Aai Lonche
    Salesperson Aurangabad, Maharashtra•
    14 hrs ago
  • Post by Amol Gawai
    3
    Post by Amol Gawai
    user_Amol Gawai
    Amol Gawai
    Farmer चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • कोचिंग सेंटरपासून ब्लॅकमेलपर्यंत? अमरावती प्रकरण गाजतंय 🚨 अमरावती येथे समोर आलेल्या एका गंभीर प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही मुलींना कोचिंग सेंटरच्या माध्यमातून टार्गेट करून त्यानंतर ब्लॅकमेल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह काही अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याची चर्चा असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित मुलींचे व्हिडिओ आणि फोटो तयार करून त्यांचा गैरवापर केल्याचे आरोप समोर येत आहेत. या माध्यमातून पैसे उकळणे आणि दबाव टाकण्याचे प्रकार घडल्याचेही बोलले जात आहे. सुमारे 180 पेक्षा अधिक मुलींना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा असून, 350 पेक्षा अधिक फोटो आणि व्हिडिओ संदर्भात माहिती पुढे येत आहे. या आकडेवारीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केली असून, मोहम्मद जोयान हा सध्या फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, सत्य परिस्थिती काय आहे याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
    1
    कोचिंग सेंटरपासून ब्लॅकमेलपर्यंत? अमरावती प्रकरण गाजतंय 🚨
अमरावती येथे समोर आलेल्या एका गंभीर प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही मुलींना कोचिंग सेंटरच्या माध्यमातून टार्गेट करून त्यानंतर ब्लॅकमेल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह काही अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याची चर्चा असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित मुलींचे व्हिडिओ आणि फोटो तयार करून त्यांचा गैरवापर केल्याचे आरोप समोर येत आहेत. या माध्यमातून पैसे उकळणे आणि दबाव टाकण्याचे प्रकार घडल्याचेही बोलले जात आहे.
सुमारे 180 पेक्षा अधिक मुलींना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा असून, 350 पेक्षा अधिक फोटो आणि व्हिडिओ संदर्भात माहिती पुढे येत आहे. या आकडेवारीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केली असून, मोहम्मद जोयान हा सध्या फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, सत्य परिस्थिती काय आहे याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.