दुर्गेच्या रूपातील महिलाच इतिहास घडवतात - पद्मश्री दादा लाड भारत विकास परिषदेच्या पंचसूत्री गौरव पुरस्कारांचे वितरण लातूर : एक स्त्री म्हणून महिला कुठेही कमी नाहीत. महिलांमध्ये संकल्प करून ते पूर्ण करण्याची जिद्द असते.अशी जिद्द ठेवणाऱ्या दुर्गांच्या रूपातील महिलाच इतिहास घडवतात,असे प्रतिपादन पद्मश्री श्रीरंग (दादा) देवबा लाड यांनी केले. भारत विकास परिषदेच्या वतीने पंचसूत्री गौरव पुरस्कार 2026 चे वितरण पद्मश्री दादा लाड यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार वितरणानंतर मार्गदर्शन करताना दादा लाड बोलत होते. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा, समर्पण या पंचसूत्रीवर आधारित पुरस्कारांचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी श्रीमती अन्नपूर्णा हनुमंत लादे, श्रीमती कविता सुरेश गोबाडे, सौ.दीपा सुरेश पाटील, श्रीमती सरोजाताई बोधनकर, सौ. रुपाली श्रीपाद देशपांडे यांना पंचसूत्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.शाल,श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन दादा लाड यांच्या हस्ते आपापल्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना दादा लाड यांनी सांगितले की, राष्ट्रहित आणि राष्ट्रभक्तीसाठी वेगळे काही करावे लागत नाही.आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात राष्ट्राचे हित पाहणे हीच राष्ट्रभक्ती आहे. ज्याला आपल्या कामात राष्ट्र दिसते तो खरा राष्ट्रभक्त होय,असे ते म्हणाले.कापूस, ज्वारी, गहू या क्षेत्रात केलेल्या विविध संशोधनांची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच भारत विकास परिषदेच्या दोन्ही शाखांच्या वतीनेही पद्मश्री लाड यांना सन्मानित करण्यात आले. सौ. डॉ. आरती संदिकर, सौ.उमा देशपांडे, सौ.स्मिता मलवाडे, सौ.श्वेता अयाचित, सौ.अनुराधा बेळंबे यांनी पुरस्कारार्थी चा परिचय करून दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.धन्वंतर देशपांडे यांनी वंदे मातरम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित पाटील व जयदीप कोरे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

- Post by अखंड भारत1
- भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तात्काळ भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी, पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. #CMOMaharashtra #abhimanyupawar #sambhajinagarkar #bavnkule #pankajmunde1
- प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात. प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.2
- माननीय मोहदय आमदार साहेब यांनी भूकंपग्रस्त विभाग याचे प्रश्न अधिवेशन मध्ये खूप चागल्या प्रकारे विषय घेऊन या गरीब 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्याचे सतत कर्यस्थ ब प्रयत्न करीत आहेत कारण आज भूकंप होऊन दुसरी पीडी चालू आहे प्रत्तेक घरात तीन चार वारस आहेत त्यांना घर नको का याचा पण या आमदार साहेबानो विचार करून मुद्दा अधिवेशन मध्ये उचलूम धरले आहेत या बद्दल मी महादेव शिंदे 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याच्या वतीने आमदार साहेब याचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे1
- पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 95610623693
- *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*1
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4