logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिद्धार्थ जाजूंचा बँकांविरोधात ५५ कोटींचा कायदेशीर हल्ला छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दि. २१: अभिनेता-निर्माता सिद्धार्थ बी. जाजू यांनी Piramal Housing Finance आणि ICICI Home Finance या वित्त संस्थांविरोधात मोठा कायदेशीर लढा उभारला असून, एकूण ५५ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पिरामल बँकेविरुद्ध ५० कोटी रुपयांची नुकसानभरपाई, तर आयसीआयसीआय होम फायनान्सविरुद्ध ५ कोटी रुपयांची वसुली मागितली जाणार आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जाजू यांनी सांगितले की, त्यांच्या मालमत्तेबाबत बँकांनी बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, आयसीआयसीआय होम फायनान्सने मालमत्ता व्यवहारात पूर्ण रक्कम न देता सुमारे १ कोटी रुपये थकवले, तसेच मूळ कागदपत्रे आणि ‘NOC’ देण्यास टाळाटाळ केली. यामुळे त्यांनी अनेकदा नोटीस देऊनही न्याय मिळाला नाही. दरम्यान, कोविड-१९ काळात आर्थिक अडचणी असतानाही त्यांचा सिबिल स्कोअर चांगला होता आणि मोठ्या गुंतवणुकीची संधी होती. मात्र, १ जानेवारी २०२१ रोजी पिरामल बँकेने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या दोन बंगल्यांवर ताबा घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कारवाईमुळे त्यांची आर्थिक योजना कोलमडली. या प्रकरणात Debt Recovery Tribunal (DRT) छत्रपती संभाजीनगर यांनी १३ मे २०२२ रोजी जाजू यांच्या बाजूने निर्णय देत बँकेला मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर Debt Recovery Appellate Tribunal (DRAT) मुंबईत केलेले अपीलही फेटाळण्यात आले. अखेरीस जानेवारी २०२६ मध्ये पिरामल बँकेने मालमत्तेचा ताबा परत केला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, बांधकामातील विलंब आणि ताबा न मिळाल्याबाबत बिल्डरविरुद्ध ग्राहक न्यायालयातही प्रकरण प्रलंबित आहे. सिद्धार्थ जाजू यांनी बँकांच्या कथित दादागिरीविरोधात आक्रमक भूमिका घेत न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे

2 hrs ago
user_देविदास कोळेकर
देविदास कोळेकर
पत्रकार Aurangabad, Maharashtra•
2 hrs ago
a4c024c1-d8b7-4e90-8e2a-1f43db24a12c

सिद्धार्थ जाजूंचा बँकांविरोधात ५५ कोटींचा कायदेशीर हल्ला छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दि. २१: अभिनेता-निर्माता सिद्धार्थ बी. जाजू यांनी Piramal Housing Finance आणि ICICI Home Finance या वित्त संस्थांविरोधात मोठा कायदेशीर लढा उभारला असून, एकूण ५५ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पिरामल बँकेविरुद्ध ५० कोटी रुपयांची नुकसानभरपाई, तर आयसीआयसीआय होम फायनान्सविरुद्ध ५ कोटी रुपयांची वसुली मागितली जाणार आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जाजू यांनी सांगितले की, त्यांच्या मालमत्तेबाबत बँकांनी बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, आयसीआयसीआय होम फायनान्सने मालमत्ता व्यवहारात पूर्ण रक्कम न देता सुमारे १ कोटी रुपये थकवले, तसेच मूळ कागदपत्रे आणि ‘NOC’ देण्यास टाळाटाळ केली. यामुळे त्यांनी अनेकदा नोटीस देऊनही न्याय मिळाला नाही. दरम्यान, कोविड-१९ काळात आर्थिक अडचणी असतानाही त्यांचा सिबिल स्कोअर चांगला होता आणि मोठ्या गुंतवणुकीची संधी होती. मात्र, १ जानेवारी २०२१ रोजी पिरामल बँकेने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या दोन बंगल्यांवर ताबा घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कारवाईमुळे त्यांची आर्थिक योजना कोलमडली. या प्रकरणात Debt Recovery Tribunal (DRT) छत्रपती संभाजीनगर यांनी १३ मे २०२२ रोजी जाजू यांच्या बाजूने निर्णय देत बँकेला मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर Debt Recovery Appellate Tribunal (DRAT) मुंबईत केलेले अपीलही फेटाळण्यात आले. अखेरीस जानेवारी २०२६ मध्ये पिरामल बँकेने मालमत्तेचा ताबा परत केला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, बांधकामातील विलंब आणि ताबा न मिळाल्याबाबत बिल्डरविरुद्ध ग्राहक न्यायालयातही प्रकरण प्रलंबित आहे. सिद्धार्थ जाजू यांनी बँकांच्या कथित दादागिरीविरोधात आक्रमक भूमिका घेत न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    1
    सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • शेतकऱ्यांनो मक्का ८०० रुपये क्विंटल दराने देण्यास तयार रहा असा इशारा राहुल देशमुख युवा काँग्रेस यांनी केला नाहीतर भारत अमेरिकेतील कृषी कराड रद्द करा
    1
    शेतकऱ्यांनो मक्का ८०० रुपये क्विंटल दराने देण्यास तयार रहा असा इशारा राहुल देशमुख युवा काँग्रेस यांनी केला नाहीतर भारत अमेरिकेतील कृषी कराड रद्द करा
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून १५ ठार, अनेक जखमी; बघा भयानक व्हिडिओ ! उधमपूर जिल्ह्यात सोमवारी (दि. २० एप्रिल २०२६) सकाळी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
    1
    काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून १५ ठार, अनेक जखमी; बघा भयानक व्हिडिओ !
उधमपूर जिल्ह्यात सोमवारी (दि. २० एप्रिल २०२६) सकाळी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रतिनिधी D.M...
घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप
मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही.
कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    1
    संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद 
छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
🔹 घटनेचा तपशील:
माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही.
🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग:
घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण:
भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔹 पोलिसांचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    1
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    23 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.