मुदगल येथील दुसऱ्या नवीन शिलालेखाचे वाचन पुणे येथील वीरगळ अभ्यासक व शिलालेख वाचक अनिल दुधाणे यांनी केले वाचन विलास बारहाते मानवत : गेल्या भागात आपण पहिल्या शिलालेख बद्दल माहिती जाणून घेतली आहे. आता दुसऱ्या शिलालेख हा परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेले मौजे मुदगल येथील मुदगलेश्वर महादेव मंदिराच्या (नदी पात्रात) मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला खाली भिंतीवर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून सहा ओळीचा देवनागरी लिपीतील संस्कृत भाषेत कोरलेला आहे. शिलालेखावर वातावरणाचा व तसेच पुरातील पाण्याचा परिणाम झाला असून बराचसा भाग पुसट झाला आहे. छाप घेतल्या नंतर लेखाची अक्षरे सहज ठळकपणे वाचता येतात. *शिलालेखाचे वाचन* १. श्री गणेशाय नमः । श्री मुदगली विजयते । २. स्वस्ति श्री नृप-शालिवाहन शके षड्-अमिष-पौष ३. वि १७१६ संख्याते विधि-विशाखी-प्रथमम् आनंद ४. संवत्सरे तंत्रे श्री-मुनि-मुद्गलस्य बहुशः कोणा- ५. दीप्ति-हितः प्रासादः खलु गोहा-या परिवृत्तः सिद्धि- ६. मनो-वज्रवत् ॥ १॥ शुभं भवतु सर्वेषां जनानाम् ॥ *संहिता* श्रीगणेशाय नमः। श्रीमुद्गली विजयते। स्वस्ति। श्रीनृप-शालिवाहन शके षोडश-शत-सप्तदशाधिक-एक (१७१६) संख्याते, विधि-विषये, प्रथमम् आनंद-नाम संवत्सरे। तत्र श्रीमुनि-मुद्गलस्य बहुशः कोणादि-दीप्ति-हितः प्रासादः खलु लोके परिवृत्तः, सिद्धि-मनो-वज्रवत्॥ १॥ शुभं भवतु सर्वेषां जनानाम्॥ * शिलालेख अर्थ* श्री गणेशाला नमस्कार, श्री मुदगलांचा विजय असो.शुभ होवो. श्री नृप शालिवाहन शके १७१६ मध्ये, 'आनंद' नामक संवत्सरात, म्हणजेच सन १७९४ साली विधिपूर्वक त्या वेळी श्री मुनी मुदगलांचा, अनेक कोनांनी तेजस्वी व लोकहितकारी असा प्रासाद (मंदिर) बांधून तो जगात प्रसिद्ध झाला; तो सिद्धीसाठी मनाच्या वज्रासारखा दृढ असो सर्व लोकांचे मंगल होवो. *शिलालेखाचे महत्व* शालिवाहन शके १७१६ (इ.स. १७९४-९५) असा स्पष्ट दिनांक दिलेला आहे. हा काळ मराठा साम्राज्याच्या उत्तर मराठेशाहीचा असून छत्रपती शाहू दुसरे यांच्या कालखंडाशी सुसंगत आहे. त्यामुळे हा लेख मराठेशाही कालीन देवस्थान-विकासाचा थेट पुरावा ठरतो. "श्रीगणेशाय नमः" व "श्रीमुदगली विजयते" या वाक्यांमधून गणेशाच्या मुदुल रूपाची उपासना स्पष्ट होते. मुदुल परंपरेचा आधार मुद्दल पुराण मध्ये आढळतो. त्यामुळे हा शिलालेख गाणपत्य तांत्रिक-पुराणपर परंपरेचा स्थानिक पुरावा आहे. "बहुशः कोणादि-दीमि-हितः प्रासादः या उल्लेखावरून मंदिर बहुकोनी (बहुभुज) रचनेचे असावे. 'प्रासाद' शब्द शास्त्रीय मंदिर-रचनेसाठी वापरला जातो (गर्भगृह, शिखर, मंडपयुक्त रचना) यामुळे मराठे कालीन मंदिर स्थापत्याचा एक नमुना नोंदविला जातो, "विधि-विपये" व "सिद्धिमनोवजवत्" हे शब्द तांत्रिक विधी, प्रतिष्ठा व सिद्धी-संकल्पना दर्शवतात. हे केवळ वास्तू-नोंद नसून आध्यात्मिक साधना व सिद्धीभाव व्यक्त करणारा लेख आहे. शेवटी "शुभं भवतु सर्वेषां जनानाम्" सर्व जनांचे मंगल होवो. धार्मिक बांधकामाचे अंतिम उद्दिष्ट समाजकल्याण असल्याचे सूचित होते. इतिहास, धर्मपरंपरा आणि स्थापत्यशास्त्र या तिन्ही दृष्टिकोनांत अत्यंत महत्वाचा असून तो मराठाकालीन समाजाच्या सांस्कृतिक मानसाचे द्योतक आहे. शिलालेखाचे वाचक :- परभणी जिल्हा गॅझेट १९८८ पान ६३४ कि .का. चौधरी तर सदर शिलालेख संशोधन कार्यात नागेश जोशी यांनी अनिल दुधाणे यांना सहकार्य केले.

- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- Post by AapTak Hindi News Channel1
- Post by वैजनाथ पावडे1
- शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.3
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1