logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

म्हसावद येथील ब्राह्मण समाजाकडून आज भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी म्हसावद येथील ब्राह्मण समाजाकडून आज भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी अक्षयतृतीया व परशुराम जयंती निमित्त सर्व समाजबांधव यांनी राम मंदिर संस्थान येथे एकत्र जमून मोठ्या उत्साहात आणि आनंदात परशुराम जयंती साजरी केली . सर्व ब्राम्हण समाज बांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरण लाभले. समाजातील एकोपा, परंपरा, संस्कार आणि आपुलकीचे सुंदर दर्शन यावेळी घडले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आनंदाने सहभाग नोंदवत कार्यक्रम अधिक यशस्वी केला. चांगल्या प्रकारे मिळालेला प्रतिसाद पाहून समाजात समाधान, अभिमान आणि नवचैतन्याची भावना निर्माण झाली. सर्व प्रथम श्री मकरंद वैद्य यांनी प्रास्तविक केले त्यानंतर समाजातील जेष्ठ सदस्य यांच्या हातून भगवान परशुराम यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले.. त्या नंतर प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचे पूजन आणि महाआरती करण्यात आली.. महापूजनचा कार्यक्रम झाल्यानंतर ब्राम्हण समाज बांधव यांनी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले.. महिलांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले.. म्हसावद गावातील समाज बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी यावेळी चर्चा करण्यात आली.. तसेच श्री परशुराम ब्राह्मण समाज बहूउद्देशिय सेवा मंडळ यांची स्थापना करण्यात आली. सर्वानुमते पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. छोटू उर्फ राजेंद्र जोशी, भूषण वैद्य, मनीष भट, राजेश तिवारी, कृष्णा भट, सौरभ कुलकर्णी, विलास पाठक, सुनील पाठक, सतीश उपाध्ये, उपेंद्र कुलकर्णी, दिनेश पाठक यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.. यावेळी जेष्ठ सदस्य जनार्दन तात्या भट, संजय कुलकर्णी, अविनाश जोशी, सुरेश कुलकर्णी भास्कर जोशी यांनी मार्गदर्शन केले.. मा. गुलाबरावजी पाटील, पालक मंत्री, जळगाव यांनी म्हसावद गावातील ब्राम्हण समाजाला परशुराम जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या असून समाजाच्या प्रगती साठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.. तसेच मा. गुलाबरावजी देवकर यांनी देखील परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या असून आम्ही गावातील ब्राम्हण समाजाच्या सोबत असून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक भट, यश जोशी, योगेश पाठक, भावेश पाठक, भूषण भट, अतुल त्रिवेदी, शैलेश त्रिपाठी, मयूर पाठक व इतर समाज बांधव यांनी परिश्रम घेतले..

18 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
18 hrs ago
2320a3c4-7af9-4126-82b6-ae6cca1dfb97

म्हसावद येथील ब्राह्मण समाजाकडून आज भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी म्हसावद येथील ब्राह्मण समाजाकडून आज भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी अक्षयतृतीया व परशुराम जयंती निमित्त सर्व समाजबांधव यांनी राम मंदिर संस्थान येथे एकत्र जमून मोठ्या उत्साहात आणि आनंदात परशुराम जयंती साजरी केली . सर्व ब्राम्हण समाज बांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरण लाभले. समाजातील एकोपा, परंपरा, संस्कार आणि आपुलकीचे सुंदर दर्शन यावेळी घडले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आनंदाने सहभाग नोंदवत कार्यक्रम अधिक यशस्वी केला. चांगल्या प्रकारे मिळालेला प्रतिसाद पाहून समाजात समाधान, अभिमान आणि नवचैतन्याची भावना निर्माण झाली. सर्व प्रथम श्री मकरंद वैद्य यांनी प्रास्तविक केले त्यानंतर समाजातील जेष्ठ सदस्य यांच्या हातून भगवान परशुराम यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले.. त्या नंतर प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचे पूजन आणि महाआरती करण्यात आली.. महापूजनचा कार्यक्रम झाल्यानंतर ब्राम्हण समाज बांधव यांनी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले.. महिलांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले.. म्हसावद गावातील समाज बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी यावेळी चर्चा करण्यात आली.. तसेच श्री परशुराम ब्राह्मण समाज बहूउद्देशिय सेवा मंडळ यांची स्थापना करण्यात आली. सर्वानुमते पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. छोटू उर्फ राजेंद्र जोशी, भूषण वैद्य, मनीष भट, राजेश तिवारी, कृष्णा भट, सौरभ कुलकर्णी, विलास पाठक, सुनील पाठक, सतीश उपाध्ये, उपेंद्र कुलकर्णी, दिनेश पाठक यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.. यावेळी जेष्ठ सदस्य जनार्दन तात्या भट, संजय कुलकर्णी, अविनाश जोशी, सुरेश कुलकर्णी भास्कर जोशी यांनी मार्गदर्शन केले.. मा. गुलाबरावजी पाटील, पालक मंत्री, जळगाव यांनी म्हसावद गावातील ब्राम्हण समाजाला परशुराम जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या असून समाजाच्या प्रगती साठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.. तसेच मा. गुलाबरावजी देवकर यांनी देखील परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या असून आम्ही गावातील ब्राम्हण समाजाच्या सोबत असून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक भट, यश जोशी, योगेश पाठक, भावेश पाठक, भूषण भट, अतुल त्रिवेदी, शैलेश त्रिपाठी, मयूर पाठक व इतर समाज बांधव यांनी परिश्रम घेतले..

More news from Jalgaon and nearby areas
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    1
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    18 hrs ago
  • प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रतिनिधी D.M...
घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप
मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही.
कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    1
    संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद 
छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
🔹 घटनेचा तपशील:
माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही.
🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग:
घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण:
भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔹 पोलिसांचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    1
    👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, बैलांच्या झुंजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत राजधर गंभीर भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.
    1
    पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, बैलांच्या झुंजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत राजधर गंभीर भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल
    2
    माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल
    user_Samadhan More
    Samadhan More
    Dhule, Maharashtra•
    19 hrs ago
  • पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा अजमेर | १९ एप्रिल २०२६ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची थरारक माहिती: वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी) बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील) कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज) बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे. बचावकार्य आणि उपचार: घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाची हालचाल: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे. आनंदाचा क्षण दु:खात बदलला मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…
    1
    पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा
अजमेर | १९ एप्रिल २०२६
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली.
या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघाताची थरारक माहिती:
वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार
ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी)
बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील)
कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज)
बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे.
बचावकार्य आणि उपचार:
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रशासनाची हालचाल:
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे.
आनंदाचा क्षण दु:खात बदलला
मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.
अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.