logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शाळांचा ‘दुकानधंदा’ सुरूच? पालकांवर जबरदस्तीचा आरोप, प्रशासन झोपेत!” “ नगरसेविका,ऐश्वर्या तरस दि.१७ एप्रिल २०२६, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काही खाजगी शाळांकडून पालकांची उघडपणे आर्थिक पिळवणूक होत असल्याचे गंभीर आरोप पुन्हा समोर आले आहेत. गणवेश, पुस्तके, बूट, दप्तर यांसारख्या शैक्षणिक साहित्याची खरेदी विशिष्ट दुकानांतूनच करण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असल्याची तक्रारी वाढत आहेत. विशेष म्हणजे, शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही या प्रकारांकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप केला जात आहे. नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी याबाबत थेट महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र देत संताप व्यक्त केला आहे. “शासनाचे आदेश धाब्यावर बसवून काही शाळांनी ‘कमिशन संस्कृती’ सुरू ठेवली आहे. यामुळं पालकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत,” असा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तक्रारीनुसार, अनेक शाळा ठराविक दुकानदारांशी संगनमत करून साहित्य विक्री करत असून, पालकांना पर्याय नाकारला जात आहे. इतकेच नव्हे तर काही शाळांकडून विशिष्ट खाजगी प्रकाशनांची पुस्तके सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, पालकांमध्ये प्रचंड नाराजी असून “शाळा शिक्षण देतात की व्यवसाय करतात?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या सर्व प्रकारावर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी महानगरपालिका प्रशासन जागे होणार का? दोषी शाळांवर कारवाई होणार का? की पालकांची पिळवणूक अशीच सुरू राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

20 hrs ago
user_विशेष पोलीस न्यूज pvk
विशेष पोलीस न्यूज pvk
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
20 hrs ago
747a8ec7-8063-4da5-808e-918dcf5c95d6

शाळांचा ‘दुकानधंदा’ सुरूच? पालकांवर जबरदस्तीचा आरोप, प्रशासन झोपेत!” “ नगरसेविका,ऐश्वर्या तरस दि.१७ एप्रिल २०२६, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काही खाजगी शाळांकडून पालकांची उघडपणे आर्थिक पिळवणूक होत असल्याचे गंभीर आरोप पुन्हा समोर आले आहेत. गणवेश, पुस्तके, बूट, दप्तर यांसारख्या शैक्षणिक साहित्याची खरेदी विशिष्ट दुकानांतूनच करण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असल्याची तक्रारी वाढत आहेत. विशेष म्हणजे, शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही या प्रकारांकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप केला जात आहे. नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी याबाबत थेट महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र देत संताप व्यक्त केला आहे. “शासनाचे आदेश धाब्यावर बसवून काही शाळांनी ‘कमिशन संस्कृती’ सुरू ठेवली आहे. यामुळं पालकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत,” असा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तक्रारीनुसार, अनेक शाळा ठराविक दुकानदारांशी संगनमत करून साहित्य विक्री करत असून, पालकांना पर्याय नाकारला जात आहे. इतकेच नव्हे तर काही शाळांकडून विशिष्ट खाजगी प्रकाशनांची पुस्तके सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, पालकांमध्ये प्रचंड नाराजी असून “शाळा शिक्षण देतात की व्यवसाय करतात?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या सर्व प्रकारावर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी महानगरपालिका प्रशासन जागे होणार का? दोषी शाळांवर कारवाई होणार का? की पालकांची पिळवणूक अशीच सुरू राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी
    1
    : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे.
अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे.
ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे.
दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे.
राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
दरांची माहिती :
* सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम
* सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम
* चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो
* सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा
* महिलांचा विशेष सहभाग
* दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी
    user_R A News
    R A News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • यवतमाळ मध्ये मटणाने हिरावला संसाराचा घास! पतीने मित्रासमोर केला अपमान, चेतना ने, संपविले जीवन; पतीवर गुन्हा दाखल!
    1
    यवतमाळ मध्ये मटणाने हिरावला संसाराचा घास! पतीने मित्रासमोर केला अपमान, 
चेतना ने, संपविले जीवन; पतीवर गुन्हा दाखल!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Durgeshbhau khade Sarkar
    1
    Post by Durgeshbhau khade Sarkar
    user_Durgeshbhau khade Sarkar
    Durgeshbhau khade Sarkar
    Political party office Pimpri Chanchwad, Pune•
    22 hrs ago
  • पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering
    1
    पिंपरी चिंचव्हडं :-
नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला....
भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला.
केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले....
#नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी
#NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    19 min ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.