logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे शहराच्या येवलेवाडी पोलिसांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल पान मसाल्याची आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री व वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून पांढऱ्या रंगाच्या बुलेरो कारसह एकूण ६,४५,२३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमेश हिरालाल प्रजापती (वय ३५ वर्षे, रा. कमल विला सोसायटी, गोकुळनगर, पुणे) असे आहे. येवलेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक कारंडे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पथके तयार करून पेट्रोलिंग आणि बातमीदारांकडून माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक आकाश विटे हे आपल्या टीमसह शोध घेत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश चिंचकर आणि विजय खेंगरे यांना १७/०६/२०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. टिळेकरनगर, जगताप गोठ्याच्या जवळ, रोडच्या आडबाजूला एम.एच.१२ आर.एफ.६२३४ क्रमांकाच्या पांढऱ्या बुलेरो कारमध्ये प्रतिबंधित गुटखा घेऊन एक इसम विक्रीसाठी थांबला असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक भगवान गुरव यांनी तपास पथकातील कर्मचाऱ्यांसह तात्काळ टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक (ता. हवेली, जि. पुणे) येथे छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी रमेश हिरालाल प्रजापती याला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातील बुलेरो कारची बारकाईने झडती घेतली. यामध्ये शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला आणि त्यात मिसळण्याची तंबाखू असा एकूण ६,४५,२३०/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल आणि गाडी जप्त केली असून, आरोपीविरुद्ध कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक आकाश विटे करत आहेत. मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-०५, पुणे शहर) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहायक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग, पुणे शहर) श्रीमती नम्रता देसाई, आणि कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक कारंडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या यशस्वी कामगिरीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक आकाश विटे, सहायक पोलीस निरीक्षक भगवान गुरव तसेच पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खेंगरे, अनिल बनकर, किशोर पवार, रुपेश पाटील, लक्ष्मण होळकर, मयुर मोरे, आणि सुजित मदन या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

12 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
12 hrs ago
56416e63-6b10-446a-8c1a-9a9897c2c3ad

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुण्यातील बिबवेवाडी येथे अनिकेत सोसायटीजवळ PMPML बसचा एक्सल तुटून त्याचे चाक बाहेर आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे PMPML प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बसकडे लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा आणि योग्य सेवा का मिळत नाही, तसेच त्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या प्रकारामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    1
    पुण्यातील बिबवेवाडी येथे अनिकेत सोसायटीजवळ PMPML बसचा एक्सल तुटून त्याचे चाक बाहेर आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे PMPML प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बसकडे लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा आणि योग्य सेवा का मिळत नाही, तसेच त्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या प्रकारामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    user_Vibhav Salkar
    Vibhav Salkar
    City Star पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुणे कमिशनर ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित अंतर सेनेने संयुक्तपणे ही धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीचा अड्डा उघडकीस आणला.
    1
    पुणे कमिशनर ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित अंतर सेनेने संयुक्तपणे ही धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीचा अड्डा उघडकीस आणला.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोडजवळच्या प्रसिद्ध घोरवडेश्वर डोंगरावर आज दिवसाढवळ्या एका पट्टेदार तरसाचे दर्शन झाले. काही पर्यटकांनी या वन्यप्राण्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये यशस्वीरित्या कैद केला असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. घोरवडेश्वर डोंगर हा ट्रेकर्स आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असलेला परिसर आहे. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या तरस दिसल्याने कुतूहलासोबतच नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, एकटे फिरणे टाळण्याचे आणि वन्यजीवांना कोणत्याही प्रकारे त्रास न देण्याचे आवाहन केले आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोडजवळच्या प्रसिद्ध घोरवडेश्वर डोंगरावर आज दिवसाढवळ्या एका पट्टेदार तरसाचे दर्शन झाले. काही पर्यटकांनी या वन्यप्राण्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये यशस्वीरित्या कैद केला असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घोरवडेश्वर डोंगर हा ट्रेकर्स आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असलेला परिसर आहे. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या तरस दिसल्याने कुतूहलासोबतच नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, एकटे फिरणे टाळण्याचे आणि वन्यजीवांना कोणत्याही प्रकारे त्रास न देण्याचे आवाहन केले आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मारुती जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ११ मध्ये प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
    1
    मारुती जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ११ मध्ये प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नाशिक विधान परिषद निवडणुकीतील विजयी अपक्ष आमदार गोपाळ गिते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ते एका विशेष खासगी विमानाने प्रवास करत असून, उद्योग मंत्री उदय सामंत हे या भेटीमध्ये मध्यस्थी करत आहेत. विशेष म्हणजे, गोपाळ गिते यांनी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. असे असूनही, पक्षाच्या उमेदवाराला हरवणाऱ्या याच अपक्ष उमेदवारासाठी शिवसेनेकडून पायघड्या घालण्यात आल्या आहेत, असे या वृत्तातून समोर आले आहे.
    1
    नाशिक विधान परिषद निवडणुकीतील विजयी अपक्ष आमदार गोपाळ गिते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ते एका विशेष खासगी विमानाने प्रवास करत असून, उद्योग मंत्री उदय सामंत हे या भेटीमध्ये मध्यस्थी करत आहेत.

विशेष म्हणजे, गोपाळ गिते यांनी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. असे असूनही, पक्षाच्या उमेदवाराला हरवणाऱ्या याच अपक्ष उमेदवारासाठी शिवसेनेकडून पायघड्या घालण्यात आल्या आहेत, असे या वृत्तातून समोर आले आहे.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, १८ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    1
    परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, १८ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    खेड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नाशिक फाटा पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसने मागून येऊन दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
    1
    पिंपरी-चिंचवडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नाशिक फाटा पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसने मागून येऊन दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
    user_जनता न्यूज
    जनता न्यूज
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.