डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात नागपूर : (ता.१७-२-२०२६) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनात संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मा. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यासन प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. रमेश राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केले. “कोई कोणी भजो मत, कोई कोणी पुजो मत; भजे-पुजेपेक्षा कर्म करेर शिको” या संदेशातून संत सेवालाल महाराजांनी अंधश्रद्धा व अंधभक्तीपासून दूर राहून स्वकर्मावर विश्वास ठेवण्याचा आणि विवेकनिष्ठ जीवन जगण्याचा उपदेश केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच “जाणजो, छाणजो आणि पछच मानजो” या शिकवणीद्वारे कुणावरही आंधळा विश्वास न ठेवता विचारपूर्वक निर्णय घेण्याचा संदेश दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरण संरक्षण, स्त्री-सन्मान, मानवता, बंधुभाव, संयमी जीवन आणि ज्ञानार्जन यांसारख्या मूल्यांचा प्रसार संतांनी आपल्या शिकवणीतून केला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अविनाश फुलझेले यांनी संत सेवालाल महाराजांनी समाजात नैतिक मूल्ये, सदाचार, नशाबंदी आणि पर्यावरण संवर्धन यांचा प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या विचारांची आजच्या समाजात विशेष गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन निशा वाहने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुशीला बागडे यांनी मानले. यावेळी डॉ. रमेश शंभरकर, डॉ. सरोज डांगे, डॉ. मोहन वानखडे, डॉ. सुनीता सावरकर, प्रा. मंगेश जुनघरे, डॉ. शिल्पा मेश्राम आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अभ्यासक्रमाचे बहुसंख्य विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- Post by The Indian Matrimony2
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- safety grill bacche ke liye1
- लोकेशन :- कांकेर(छ.ग.) *ब्यूरो चीफ पुनीत मरकाम कांकेर* स्लग :- खराब ट्रेक हार्वेस्टर बेचने का आरोप, लाखों के फाइनेंस के बाद भी मशीन ठप-डीलर पर धोखाधड़ी की शिकायत एंकर :- कांकेर जिले में ट्रेक हार्वेस्टर की खराब स्थिति को लेकर डीलर के खिलाफ शिकायत दर्ज कराई गई है। आवेदक गुरु शरण साहू, निवासी परसौदा, तहसील चारामा तथा राधा बाई, निवासी गितपहर, चारामा ने थाना प्रभारी को दिए आवेदन में बताया कि धान कटाई कार्य के लिए माकड़ी स्थित आई. वीर ट्रेक हार्वेस्टर शाखा (नित्यांश एग्रोटेक) के डीलर वेद प्रकाश साहू से मशीन खरीदी गई थी। शिकायत में उल्लेख है कि हार्वेस्टर की कुल कीमत लगभग 24 लाख 60 हजार रुपये तय हुई, जिसका फाइनेंस भारतीय स्टेट बैंक शाखा कोरर के माध्यम से कराया गया। मशीन खरीदने के मात्र चार दिन बाद से ही लगातार तकनीकी खराबियां आने लगीं। कई बार सूचना देने पर कंपनी कर्मचारियों द्वारा केवल अस्थायी मरम्मत की गई, लेकिन कुछ दिनों बाद फिर वही समस्या सामने आ जाती थी। पीड़ितों का आरोप है कि खराब मशीन के कारण कोई आर्थिक लाभ नहीं हो पा रहा, जबकि फाइनेंस की किश्तों का दबाव बढ़ रहा है, जिससे मानसिक और आर्थिक परेशानी हो रही है। साथ ही लगभग 2 लाख 40 हजार रुपये डाउन पेमेंट लेने के बावजूद रसीद और वारंटी कार्ड नहीं दिए गए। आवेदकों ने मामले में धोखाधड़ी का प्रकरण दर्ज कर राशि वापसी और कड़ी वैधानिक कार्रवाई की मांग की है।4
- बिहार बोर्ड: डर VS कॉन्फिडेंस! मैट्रिक एग्जाम का पहला दिन, छात्र बोले मन की बात #Muzaffarpur #BiharNews #short #virals #videos #viralshorts #aakashpriyadarshi #BiharBoard #worldmedianews1