logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जल जीवन'च्या पाणी पुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश ' जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत विविध गावांमधून प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित गावांतील योजनांची कामे तात्काळ पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्रीमती समृद्धी दिवाणे, सर्व संबंधित उपअभियंता व कनिष्ठ अभियंते, सर्व उपविभागांचे अधिकारी, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी तसेच वॅपकॉस लि. या अंमलबजावणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. नळ पाणी पुरवठा योजनांसाठी महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा उपलब्ध करून घेणे आवश्यक असलेल्या गावांतील विद्युत जोडणीसाठी लागणाऱ्या कोटेशनची आवश्यक रक्कम संबंधित ग्रामपंचायतींनी भरणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी 15 व्या वित्त आयोग निधीतून कोटेशनची रक्कम भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे मंजूर करण्यात आली असल्यामुळे यावर्षी टंचाईच्या काळात एकाही गावात टँकरची आवश्यकता भासू नये, या दृष्टीने नियोजन करून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच योजनांच्या कामांबाबत प्रतिसाद न देणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करून त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक घरगुती नळ जोडणीची जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, ती तात्काळ सुरू करून त्याची नोंद शासनाच्या संकेतस्थळावर करण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

on 10 March
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
on 10 March

जल जीवन'च्या पाणी पुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश ' जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत विविध गावांमधून प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित गावांतील योजनांची कामे तात्काळ पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्रीमती समृद्धी दिवाणे, सर्व संबंधित उपअभियंता व कनिष्ठ अभियंते, सर्व उपविभागांचे अधिकारी, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी तसेच वॅपकॉस लि. या अंमलबजावणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. नळ पाणी पुरवठा योजनांसाठी महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा उपलब्ध करून घेणे आवश्यक असलेल्या गावांतील विद्युत जोडणीसाठी लागणाऱ्या कोटेशनची आवश्यक रक्कम संबंधित ग्रामपंचायतींनी भरणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी 15 व्या वित्त आयोग निधीतून कोटेशनची रक्कम भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे मंजूर करण्यात आली असल्यामुळे यावर्षी टंचाईच्या काळात एकाही गावात टँकरची आवश्यकता भासू नये, या दृष्टीने नियोजन करून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच योजनांच्या कामांबाबत प्रतिसाद न देणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करून त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक घरगुती नळ जोडणीची जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, ती तात्काळ सुरू करून त्याची नोंद शासनाच्या संकेतस्थळावर करण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. ​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. ​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. ​चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. ​शेतकरी न्यायापासून वंचित ​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. ​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. ​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच?
या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे.
​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली.
​चौकशी पत्रात अनियमितता
अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
​शेतकरी न्यायापासून वंचित
​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत.
​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.
​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच
"महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • "नारी शक्ती वंदन" विधेयकाच्या समर्थनासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आवाहन
    1
    "नारी शक्ती वंदन" विधेयकाच्या समर्थनासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आवाहन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. “परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
“परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे. दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.
    1
    शिवकुमार काळे 
सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल 
नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे.
दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले.
नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    54 min ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • बालविवाह लावणाऱ्यांसह सहभागी सर्वांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
    1
    बालविवाह लावणाऱ्यांसह सहभागी सर्वांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.