Shuru
Apke Nagar Ki App…
शेतात नवरा बायकोची आत्महत्या दोन पोरं झाली पोरकी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथील घटना
चंद्रकला हेमंत वळवी
शेतात नवरा बायकोची आत्महत्या दोन पोरं झाली पोरकी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथील घटना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- धुळे शहरासह परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वलवाडी शिवार, कुसुंबे तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागात हलकी ते मध्यम गारपीट झाल्याने हवामानात अचानक बदल जाणवला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.1
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- *चांदवड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; काजी सांगवी, हिवरखेडे व निमगव्हाण परिसरात नुकसान* *बळीराजा पुन्हा एकदा संकटात;* चांदवड (प्रतिनिधी) :चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाने रौद्र रूप धारण केले. विशेषतः तालुक्यातील काजी सांगवी, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या गहू आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. दुपारपासूनच परिसरात उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता. चांदवड शहरातही धुळीचे लोट उसळून काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या तालुक्यात गव्हाची कापणी आणि कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काजीसांगवी व निमगव्हाण, हिवरखेडे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतातच ठेवला होता, तर काहींचा उभा गहू काढणीला आलेला होता. मात्र, वादळी पावसामुळे उभा गहू जमिनीदोस्त झाला असून कापून ठेवलेला गहू भिजल्याने त्याला मोड फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी कांदा काढून शेतातच साठवून ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांदा सडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मशागत, बी-बियाणे आणि खतांचा खर्चही निघणे आता कठीण झाल्याने शेतकरी डोळ्यात पाणी आणून उघड्यावर पडलेले आपले पीक पाहत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.4
- जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ1
- Post by गणेश मौर्य1
- Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2