logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातील अमराळे येथून शिंदखेड्याकडे निघालेल्या बसच्या छताला गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. धावत्या बसच्या छतातून सतत पाणी टपकल्याने बसमधील विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले असून ते पूर्णपणे भिजले आहेत. एसटी बसच्या गळतीचा हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. छतातून पाणी गळत असताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने, या प्रकारामुळे परिवहन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

15 hrs ago
user_DHULE CRIME NEWS
DHULE CRIME NEWS
धुळे, धुळे, महाराष्ट्र•
15 hrs ago

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातील अमराळे येथून शिंदखेड्याकडे निघालेल्या बसच्या छताला गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. धावत्या बसच्या छतातून सतत पाणी टपकल्याने बसमधील विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले असून ते पूर्णपणे भिजले आहेत. एसटी बसच्या गळतीचा हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. छतातून पाणी गळत असताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने, या प्रकारामुळे परिवहन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथील मुख्य कॅज्युअल्टीसमोर वाहनांच्या अस्ताव्यस्त आणि बेशिस्त पार्किंगमुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मोटरसायकली उभ्या केल्या जात आहेत की, आपत्कालीन परिस्थितीत ॲम्बुलन्स पोहोचणेसुद्धा अत्यंत कठीण झाले आहे. या अव्यवस्थेमुळे रुग्णाचा जीव वाचवणे कठीण होण्यासारखा गंभीर प्रकार घडत आहे. याशिवाय, कॅज्युअल्टीच्या बाजूला उभारलेला टीव्ही गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत तसाच उभा आहे. शासनाने यावर झालेल्या खर्चाची आणि ठेकेदाराची सखोल चौकशी करून हा भ्रष्टाचार बाहेर काढावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पार्किंगसाठी स्वतंत्र नियोजित जागा उपलब्ध करून या बेशिस्त वाहनांचे त्या ठिकाणी स्थलांतर करावे. या अव्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले असून एमएसएफ (MSF) मात्र मस्त असल्याची टीका केली जात आहे.
    1
    भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथील मुख्य कॅज्युअल्टीसमोर वाहनांच्या अस्ताव्यस्त आणि बेशिस्त पार्किंगमुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मोटरसायकली उभ्या केल्या जात आहेत की, आपत्कालीन परिस्थितीत ॲम्बुलन्स पोहोचणेसुद्धा अत्यंत कठीण झाले आहे. या अव्यवस्थेमुळे रुग्णाचा जीव वाचवणे कठीण होण्यासारखा गंभीर प्रकार घडत आहे.

याशिवाय, कॅज्युअल्टीच्या बाजूला उभारलेला टीव्ही गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत तसाच उभा आहे. शासनाने यावर झालेल्या खर्चाची आणि ठेकेदाराची सखोल चौकशी करून हा भ्रष्टाचार बाहेर काढावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पार्किंगसाठी स्वतंत्र नियोजित जागा उपलब्ध करून या बेशिस्त वाहनांचे त्या ठिकाणी स्थलांतर करावे. या अव्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले असून एमएसएफ (MSF) मात्र मस्त असल्याची टीका केली जात आहे.
    user_जनहित लोक कल्याण संस्थ धु
    जनहित लोक कल्याण संस्थ धु
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर पूर्णपणे विठ्ठलमय झाले आहे. या विशेष प्रसंगी मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
    1
    आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर पूर्णपणे विठ्ठलमय झाले आहे. या विशेष प्रसंगी मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरच थांबणे पसंत केले. वाघ परिसरातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत हे कर्मचारी सुमारे एक तास विद्युत खांबावरच अडकून राहिले. वन विभाग आणि स्थानिकांकडून परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरच थांबणे पसंत केले. वाघ परिसरातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत हे कर्मचारी सुमारे एक तास विद्युत खांबावरच अडकून राहिले.

वन विभाग आणि स्थानिकांकडून परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तोरणमाळ येथे अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या विकासकामांतर्गत यशवंत तलाव रिंग रोडचे डांबरीकरण करणे, एमटीडीसी (MTDC) रेस्ट हाऊस आवाराची संरक्षक भिंत बांधणे, पर्यटन स्थळावर डेकोरेटिव्ह लाईट बसविणे आणि पर्यटकांना बसण्यासाठी ओटे बांधणे यासारख्या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजयसिंह पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश दादा पराडके, प्रा. दिनेश खरात, रविदादा पराडके, संदीप वळवी, पंचायत समिती बांधकाम उपअभियंता बबन पावरा, राकेश पावरा आणि हुजेफा बलोच हे मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रसंगी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    4
    नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तोरणमाळ येथे अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या विकासकामांतर्गत यशवंत तलाव रिंग रोडचे डांबरीकरण करणे, एमटीडीसी (MTDC) रेस्ट हाऊस आवाराची संरक्षक भिंत बांधणे, पर्यटन स्थळावर डेकोरेटिव्ह लाईट बसविणे आणि पर्यटकांना बसण्यासाठी ओटे बांधणे यासारख्या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजयसिंह पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश दादा पराडके, प्रा. दिनेश खरात, रविदादा पराडके, संदीप वळवी, पंचायत समिती बांधकाम उपअभियंता बबन पावरा, राकेश पावरा आणि हुजेफा बलोच हे मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रसंगी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने 'जीवनदायी' उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत गुलमंडी येथे आयोजित कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रक्तदान केले.
    1
    देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने 'जीवनदायी' उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत गुलमंडी येथे आयोजित कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रक्तदान केले.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • राज्यभरात गाजत असलेल्या १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान नाशिक गुन्हे शाखेने जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना धुळे शहरातून अटक केली आहे. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून ही अत्यंत मोठी कारवाई मानली जात आहे.
    1
    राज्यभरात गाजत असलेल्या १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान नाशिक गुन्हे शाखेने जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना धुळे शहरातून अटक केली आहे.

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून ही अत्यंत मोठी कारवाई मानली जात आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Photographer धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.