Shuru
Apke Nagar Ki App…
पैठण गट विकास अधिकारी या प्रकरणावर कारवाई करतील का?
सुभाष मस्के पत्रकार
पैठण गट विकास अधिकारी या प्रकरणावर कारवाई करतील का?
More news from Nashik and nearby areas
- शिखाडे वणी येथे जंगम पेट्रोलपंपाजवळ गोरक्षकांनी वाचवले ६३ गायींचे जीव1
- अंदरसूलच्या एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन प्रतिनिधी सचिन वखारे येवला येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे (एम.एस.जी.एस.) इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शितल तुषार भागवत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक अमोल आहेर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी स्कूलच्या वतीने डॉ. शितल भागवत, संतोष घोडेराव, शब्बीर इनामदार, सागर पाठक, हितेश दाभाडे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सौम्या एंडाईत, देवांश देशमुख, प्राजक्ता सोमासे यांनी भाषणे केली, तर खदीजा खान, वैष्णवी पाराटे, स्तुती पांडे, जानवी देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी कविता सादर केल्या. प्रमुख पाहुण्या डॉ. शितल भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मुलींनी राजमाता जिजाऊंसारखे निडर व स्वावलंबी बनावे आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आणावा." अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक आकाश सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, डॉ. सुवर्णा कडलक यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.1
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- लंगर साहेब गुरुव्दारा, नांदेड येथील झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील ५ आरोपींचा थरारक पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखा अकोला ने ४ तासात घेतले ताब्यात ....1
- एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..1
- भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा विक्रम शिंदे /भोर दि.11 भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.1
- Post by Peoples News 241
- *चांदवड तालुका होणार पाणीदार; 'विशेष जलसमृद्धी अभियानाचा' आमदार राहुल आहेरांच्या उपस्थितीत दिमाखदार प्रारंभ* चांदवड: तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने आज तहसील कार्यालय, चांदवड येथे 'विशेष जलसमृद्धी अभियान' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुक्यातील विविध मान्यवरांच्या साक्षीने या अभियानाचे बिगुल वाजवण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे व संदीप काळे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांची विशेष उपस्थिती होती. या अभियानाद्वारे तालुक्यातील जलस्त्रोत बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसली आहे. कार्यक्रमाला प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे आणि कृषी अधिकारी निलेश मावळे उपस्थित होते. तसेच सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रमुख अधिकारी, ज्यात सुनंदा घुगे, सुभाष पगार, माधुरी वाडिले, वासंती बोरसे, प्रसाद सोनवणे आणि प्रतीक धुमारे यांचा समावेश होता, त्यांनी तांत्रिक नियोजनाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब माळी, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, निवृत्ती शिंदे, मोहन शर्मा, पंढरीनाथ खताळ यांसह अनेकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. या अभियानामुळे आगामी काळात तालुक्यातील धरणांमधील साठा वाढण्यास आणि शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. "तालुक्याचा शाश्वत विकास करायचा असेल, तर जलसमृद्धी हाच एकमेव मार्ग आहे. लोकसहभाग आणि प्रशासकीय नियोजन यांच्या जोरावर चांदवड तालुका पाणीदार करू." — *डॉ. राहुल दादा आहेर* (आमदार, चांदवड-देवळा)1
- सावधान ! नायलॉन मांजा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; येवल्यात शहर पोलिसांकडून १०४ रोलचा साठा जप्त. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1