सोयगाव येथील पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक संपतराव गीते हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने, शुक्रवारी (२९ मे रोजी) पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना निरोप समारंभ आयोजित करून सत्कार करण्यात आला. पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात प्रभारी गट विकास अधिकारी अमोल जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी, सेवानिवृत्त सत्कारमूर्ती संपतराव गीते यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने भेटवस्तू, साडी-चोळी, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांच्या पत्नीसह सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्रसिंग पाटील, वरिष्ठ सहायक सचिन धुमाने, शोभा पवार, एमआरजीएसचे कटके आणि निकम, शोभा पवार, शितल सनांसे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश गवळी, शिवप्रसाद बिरारी, कनिष्ठ सहायक विकास भारती, काळे, एस आय पडघन, कनिष्ठ सहायक अमोल गायकवाड यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

- जळगाव जिल्ह्यातील वाघ नगर, कोल्हे परिसर आणि जाणता राजा स्कूल परिसरात गेल्या १२ ते १३ दिवसांपासून पाणी आलेले नाही, ज्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. सध्या या भागात दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, पण नागरिकांची तीव्र मागणी आहे की, हा कालावधी कमी करून दर तीन दिवसांनी पाणी सोडावे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने आणि बोरिंगलाही पाणी नसल्याने, नागरिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत, अन्यथा त्यांची नाराजी आणखी वाढेल असे म्हटले आहे.1
- बनावट शिक्का प्रकरणामध्ये जाफ्राबाद पोलिसांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तातडीने जामीन मंजूर केला, ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईला एक मोठा झटका लागल्याचे दिसून येत आहे.1
- संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तळपत्या उन्हात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भोकरदन तालुक्यातून तीव्र पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवकांच्या वतीने पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रा. अंकुश जाधव, सतीष जाधव, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, विलास पवार, अंगद सहाने, परमेश्वर पालोदे, श्रीकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, उमेश घोडके आदी मराठा सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.1
- जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती. या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.1
- मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण कडक उन्हात सुरू ठेवले आहे. त्यांनी मंडप सोडून, बाज वर बसून उपोषण सुरू केले आहे.1
- जालना जिल्ह्यातील गाढेगव्हाण येथे गाव गुंडांनी केलेल्या अतिक्रमणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयावर धरणे आणि निदर्शने आंदोलन केले.1
- मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी एक शिष्टमंडळ पोहोचले आहे.1
- तिरुप्पूर शहरात जोरदार वाऱ्यामुळे एक बॅनर कोसळले. या घटनेत एका दुचाकीस्वाराची गाडी घसरली, मात्र सुदैवाने दुचाकीचा चालक सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.1