logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेडचा मथुरा- लभान गोवंश महाराष्ट्राचे पशुवैभव पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रा. डॉ. पंडित नांदेडकर यांचा गौरव नांदेड दि. 18 एप्रिल :- पशुवैद्यक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पंडित नांदेडकर यांना हरियाणातील करनाल येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत 'मथुरा-लभान गोवंश: महाराष्ट्राचा अभिमान' या विषयावरील सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नुकतेच मिळाले. या यशाबद्दल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आज गौरव करण्यात आला. पालकमंत्री अतुल सावे यांनी पशुसंवर्धन विभाग, परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व पशुपालक यांना मथुरा लभान गोवंश संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डॉ.प्रवीणकुमार घुले व अधिकारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. नांदेडकर यांनी नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीद्वारे 'मथुरा लभान गोवंशास राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाची माहिती व त्यासंदर्भात किनवट तालुक्यात चालू असलेले कार्याचा आढावा सादर केला. डॉ.नांदेडकर यांनी मथुरा-लभान गोवंशाचे प्रजनन क्षेत्र हे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर तालुक्यांमध्ये तसेच लगतच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळून येते. मथुरा-लभान गोवंश हा मथुरा, लभानी व बंजारा समुदायाकडे 300 पेक्षा अधिक वर्षापासून असल्याचे समजते. या गायी बहुतांशी पांढऱ्या रंगाच्या असून क्वचितच हलक्या राखेरी रंगामध्ये पहावयास मिळतात. त्वचा चमकदार व शरीराला घट्ट चिटकलेली असते. डोळे काळे व पाणीदार असतात. कपाळ रुंद व सपाट असते. चेहरा निमुळत्या आकाराचा असतो. सदर गायी या मध्यम बांध्याच्या असून शिंगे बाहेरच्या दिशेने वर जाऊन पुन्हा आतल्या बाजूने वळलेले असतात. कान मध्यम आकाराचे असून बाहेरील पृष्ठभाग राखाडी रंगाचा असतो. दोन्ही पायांमधील छातीचा भाग अरुंद असतो. छाती पोळ मध्यम आकाराची लटकलेली असते. शेपटी पायाच्या घोट्यापर्यंत लांब असून शेपटीचा गोंडा काळा व झुपकेदार असतो. गायीमध्ये कास मध्यम आकाराची शरीरास घट्ट चिकटलेली असून दुधाची शीर ठळक व सरळ असते. स्तन हे दंडगोलाकार असतात. गायी साधारणतः दिवसाकाठी १.५ - २ लिटर दुध देतात. या गायीचे तुपास अतिउच्च मागणी असून रुपये 3 हजार प्रती किलो प्रमाणे चढ्या दराने विकल्या जाते. सर्व गायी वळूद्वारे नैसर्गिक पद्धतीने फळवल्या जातात व त्यामुळे या जातीचे शारीरिक गुणधर्म टिकून आहेत. या गोवंशाचे नर हे मादी पेक्षा आकाराने मोठे असतात. मथुरा लभान बैल हे प्रामुख्याने शेती व ओढकामासाठी वापरले जातात. हे गोवंश सूर्योदयापूर्वी जंगलात चराईसाठी एकत्र कळपाने सोडली जातात व सूर्यास्तापूर्वी वापस आणली जातात. चारा व पाणी यांच्या अभावामुळे उन्हाळ्यामध्ये हे गोवंश स्थलांतरित करून जून महिन्यात परत आणली जातात, असे सांगितले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत असलेल्या पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. नांदेडकर यांना 8 एप्रिल रोजी हरियाणा राज्यातील करनाल येथील भा.कृ.अ.प.-राष्ट्रीय प्राणी अनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित ‘राष्ट्रीय परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटी’ च्या XXIII व्या वार्षिक अधिवेशनामध्ये ‘मथुरा लभान गोवंश-महाराष्ट्राचा अभिमान या विषयावर मौखिक सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

on 18 April
user_राजुभाऊ गायकवाड
राजुभाऊ गायकवाड
मी 2021 पासून पत्रकार आहे हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
on 18 April
27bca17e-568c-4604-a7ff-3f9568c93fa3

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress
    1
    शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! 
नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला 
शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले 
शेतकरी सक्षम तर देश सक्षम! 
अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा!
#SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    1
    आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    1
    मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर :  शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार
डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे.
या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा   शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.
    1
    यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    14 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    1
    महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    14 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! #SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat
    1
    स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ 
नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला 
या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले 
या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 
महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला 
स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! 
#SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.