logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांवर नीट २०२६ पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ५ हजार ३८५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणार आहे. दिव्यांग प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी परीक्षा सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत चालणार आहे. परीक्षेचे सुरळीत, पारदर्शक व गैरप्रकारमुक्त आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था यांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १२ केंद्र अधीक्षक, १६ उपकेंद्र अधीक्षक, १६ निरीक्षक, २२५ कक्ष निरीक्षक, ३ एनटीए प्रतिनिधी तथा भरारी पथके, १२ कर्तव्य दंडाधिकारी, १०७ पोलीस कर्मचारी, २१ जिल्हा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी आणि १२ वाहनचालक यांचा समावेश आहे. परीक्षेच्या दिवशी सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, कर्तव्य दंडाधिकारी, निरीक्षक आणि भरारी पथकांमार्फत सातत्याने देखरेख ठेवली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रात अथवा परीक्षा कक्षात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, फिटनेस बँड, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर, पेन ड्राइव्ह, कॅमेरे, पेजर, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पर्स, हँडबॅग, पुस्तके, वह्या, नोट्स, छापील साहित्य, सैल कागदपत्रे, जिओमेट्री बॉक्स, लॉग टेबल, स्लाइड रूल, कोणतेही संप्रेषण साधन तसेच गैरप्रकारास मदत करणारे कोणतेही साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे. उमेदवारांनी केवळ एनटीएने परवानगी दिलेल्या वस्तू, प्रवेशपत्र आणि वैध छायाचित्रयुक्त ओळखपत्र सोबत आणावे. सर्व उमेदवार, पालक आणि नागरिकांनी परीक्षा शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

3 hrs ago
user_कर्जत लाईव्ह
कर्जत लाईव्ह
Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
3 hrs ago
101af25d-0e70-4a3b-8691-d93f8b512b75

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शरदचंद्रजी पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या खास प्रसंगी राजकारणातील दिग्गज, विविध क्षेत्रांतील उद्योगपती, तसेच बॉलीवूडमधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
    1
    शरदचंद्रजी पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या खास प्रसंगी राजकारणातील दिग्गज, विविध क्षेत्रांतील उद्योगपती, तसेच बॉलीवूडमधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी कोलकाता येथे हावडा ब्रिजजवळ एका विशेष ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले. या नेत्रदीपक प्रदर्शनामुळे कोलकाताचे आकाश उजळून निघाले. ड्रोन शोमध्ये विविध योग मुद्रा आणि सांस्कृतिक प्रतीके अतिशय सुंदरपणे सादर करण्यात आली, ज्याने हावडा ब्रिज परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण बनले.
    1
    आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी कोलकाता येथे हावडा ब्रिजजवळ एका विशेष ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले. या नेत्रदीपक प्रदर्शनामुळे कोलकाताचे आकाश उजळून निघाले. ड्रोन शोमध्ये विविध योग मुद्रा आणि सांस्कृतिक प्रतीके अतिशय सुंदरपणे सादर करण्यात आली, ज्याने हावडा ब्रिज परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण बनले.
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    3 hrs ago
  • बीड शहरातील मीरा हॉस्पिटल ते तहसील कार्यालय, क्रांतीनगर परिसरातील रस्त्याच्या कामासाठी ८९ लाख ९९ हजार ४३१ रुपयांचा निधी मंजूर होऊनही, गेल्या दोन महिन्यांपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या विलंबामुळे संतप्त झालेल्या प्रा. सनी वाघमारे यांनी रस्त्यावर प्रतिकात्मक आंदोलन करत प्रशासन आणि ठेकेदारांचे लक्ष वेधले. या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर एप्रिल महिन्यातच सीताई कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आली होती. मात्र, वर्क ऑर्डर जारी होऊन दोन महिने उलटले तरी कामाला सुरुवात झालेली नाही. प्रा. वाघमारे यांनी स्पष्ट केले की ते स्वतःसाठी नव्हे, तर या रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि विकासाची वाट पाहणाऱ्या प्रत्येक बीडकरासाठी आवाज उठवत आहेत. त्यांचा कोणत्याही व्यक्ती किंवा ठेकेदाराशी वैयक्तिक विरोध नसून, मंजूर झालेले काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. प्रा. वाघमारे यांनी ठेकेदार श्री. श्याम क्षीरसागर आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने काम सुरू करावे अशी मागणी केली आहे. "विकास केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे. नागरिकांना आश्वासन नव्हे, तर काम हवे आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले. आता या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार का, याकडे संपूर्ण बीडकरांचे लक्ष लागले आहे.
    1
    बीड शहरातील मीरा हॉस्पिटल ते तहसील कार्यालय, क्रांतीनगर परिसरातील रस्त्याच्या कामासाठी ८९ लाख ९९ हजार ४३१ रुपयांचा निधी मंजूर होऊनही, गेल्या दोन महिन्यांपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या विलंबामुळे संतप्त झालेल्या प्रा. सनी वाघमारे यांनी रस्त्यावर प्रतिकात्मक आंदोलन करत प्रशासन आणि ठेकेदारांचे लक्ष वेधले.

या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर एप्रिल महिन्यातच सीताई कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आली होती. मात्र, वर्क ऑर्डर जारी होऊन दोन महिने उलटले तरी कामाला सुरुवात झालेली नाही. प्रा. वाघमारे यांनी स्पष्ट केले की ते स्वतःसाठी नव्हे, तर या रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि विकासाची वाट पाहणाऱ्या प्रत्येक बीडकरासाठी आवाज उठवत आहेत. त्यांचा कोणत्याही व्यक्ती किंवा ठेकेदाराशी वैयक्तिक विरोध नसून, मंजूर झालेले काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

प्रा. वाघमारे यांनी ठेकेदार श्री. श्याम क्षीरसागर आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने काम सुरू करावे अशी मागणी केली आहे. "विकास केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे. नागरिकांना आश्वासन नव्हे, तर काम हवे आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले. आता या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार का, याकडे संपूर्ण बीडकरांचे लक्ष लागले आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील विश्रांतवाडी येथे २० लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या स्थितीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या गंभीर समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत, पुणे पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. भोसले यांनी स्पष्ट केले की, जर लवकरात लवकर सुरक्षा व्यवस्था करून टाकीला झाकण बसवले नाही, तर नागरिकांसोबत 'शोले स्टाईल' आंदोलन छेडण्यात येईल.
    1
    पुणे जिल्ह्यातील विश्रांतवाडी येथे २० लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या स्थितीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या गंभीर समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत, पुणे पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. भोसले यांनी स्पष्ट केले की, जर लवकरात लवकर सुरक्षा व्यवस्था करून टाकीला झाकण बसवले नाही, तर नागरिकांसोबत 'शोले स्टाईल' आंदोलन छेडण्यात येईल.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • खासदार ज्योती वाघमारे यांनी सणसणीत टीका करताना म्हटले आहे की, संबंधित व्यक्तींमध्ये कलेजा (हिंमत) आणि भेजा (बुद्धी) दोन्हीही नाहीत. त्यांच्या या कमतरतेमुळेच त्यांची सध्याची अवस्था अशी झाली असल्याचे खासदार वाघमारे यांनी नमूद केले.
    1
    खासदार ज्योती वाघमारे यांनी सणसणीत टीका करताना म्हटले आहे की, संबंधित व्यक्तींमध्ये कलेजा (हिंमत) आणि भेजा (बुद्धी) दोन्हीही नाहीत. त्यांच्या या कमतरतेमुळेच त्यांची सध्याची अवस्था अशी झाली असल्याचे खासदार वाघमारे यांनी नमूद केले.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये, धडाडीचे नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकाराने "शासन आपल्या दारी" हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत नागरिकांना मोफत उत्पन्नाचा दाखला, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड आणि पॅनकार्ड वाटप करण्यात आले.
    1
    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये, धडाडीचे नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकाराने "शासन आपल्या दारी" हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत नागरिकांना मोफत उत्पन्नाचा दाखला, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड आणि पॅनकार्ड वाटप करण्यात आले.
    user_न्यूज पीसीएमसी
    न्यूज पीसीएमसी
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • परभणी येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे, जिथे हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला. या दुर्दैवी घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला असून, अन्य ३० जण जखमी झाले आहेत.
    1
    परभणी येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे, जिथे हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला. या दुर्दैवी घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला असून, अन्य ३० जण जखमी झाले आहेत.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.