logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महापालिका इंग्रजी माध्यम शाळेत आर्ट मेळावा उत्साहात पिंपरी ता.१८ पिपरी चिंचवड महापालिकेच्या पीसीएमसी पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम),बोपखेल येथे आर्ट मेळावा मोठ्या उत्साहात आणि कलात्मक वातावरणात संपन्न झाला. महापालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यम शाळेला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. महापालिकेच्या ४२ शाळांमधील एकूण १५३ विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला.विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा सुरू झाला.यावेळी प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती पाहून त्यांनी त्यामागील कल्पना आणि सादरीकरणाची माहिती विद्यार्थ्यांकडून घेतली.तसेच त्यांच्या कलाकृती व सादरीकरणांचे कौतुक केले.  यावेळी सहाय्यक प्रशासनाधिकारी रजिया खान , कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले,पर्यवेक्षिका प्रमिला होले,प्रमिला जाधव,जयमाला गावडे,खालेदा खान,सुनिता गिते,सरस्वती भेगडे,अंजली झगडे,सुजाता कर्जतकर,बालवाडी समन्वयक मंदाकिनी गोसावी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांच्या पारंपरिक आणि लोककलांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.आंध्रप्रदेशची कलमकारी,मध्यप्रदेशची गोंड कला,पंजाबची फुलकारी, महाराष्ट्राची वारली, बिहारची मधुबनी अशा विविध कलेचे प्रदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी संबंधित कलेचा इतिहास,वैशिष्ट्ये आणि त्यामागील सांस्कृतिक पार्श्वभूमीही मांडली.त्यामुळे हा मेळा केवळ प्रदर्शन न राहता एक शैक्षणिक अनुभव ठरला. यावेळी ‘विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी’ या संकल्पनेतून कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी पेपर बॅग तयार करणे, कागदी फुले बनविणे रांगोळी मंडल रचना,काचेच्या बाटल्यांची सजावट,लेहेरिया डिझाईन अशा विविध विषयांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.तसेच संगमरवर कला,मंडल कला,गोंदण कला,सुलेखन,मेहेंदी कला,दा व्हिन्सी पूल रचना आणि पुस्तकखूण निर्मिती यांसारख्या विविध कलेचे स्वतंत्र स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते.प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कोट महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेतही उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या दहाव्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा आर्ट मेळा विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ देणारा ठरला आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. – रवि लांडगे महापौर,पिंपरी चिंचवड महापालिका कोट कला शिक्षण विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देत आत्मविश्वास वाढवते. विविध राज्यांच्या लोककलेचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक विविधतेचा सुंदर संगम घडवला आहे. ‘विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी’ या संकल्पनेतून घेतलेल्या कार्यशाळा हा उपक्रम अधिक परिणामकारक बनवणारा ठरला. महापालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार आणि अनुभवाधारित शिक्षण देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. – ममता शिंदे, उपायुक्त,पिंपरी चिंचवड महापालिका

14 hrs ago
user_City Mirror News
City Mirror News
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
14 hrs ago
3838a2f1-5b52-4871-87e5-f424612ba1cf

महापालिका इंग्रजी माध्यम शाळेत आर्ट मेळावा उत्साहात पिंपरी ता.१८ पिपरी चिंचवड महापालिकेच्या पीसीएमसी पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम),बोपखेल येथे आर्ट मेळावा मोठ्या उत्साहात आणि कलात्मक वातावरणात संपन्न झाला. महापालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यम शाळेला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. महापालिकेच्या ४२ शाळांमधील एकूण १५३ विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला.विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा सुरू झाला.यावेळी प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती पाहून त्यांनी त्यामागील कल्पना आणि सादरीकरणाची माहिती विद्यार्थ्यांकडून घेतली.तसेच त्यांच्या कलाकृती व सादरीकरणांचे कौतुक केले.  यावेळी सहाय्यक प्रशासनाधिकारी रजिया खान , कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले,पर्यवेक्षिका प्रमिला होले,प्रमिला जाधव,जयमाला गावडे,खालेदा खान,सुनिता गिते,सरस्वती भेगडे,अंजली झगडे,सुजाता कर्जतकर,बालवाडी समन्वयक मंदाकिनी गोसावी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांच्या पारंपरिक आणि लोककलांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.आंध्रप्रदेशची कलमकारी,मध्यप्रदेशची गोंड कला,पंजाबची फुलकारी, महाराष्ट्राची वारली, बिहारची मधुबनी अशा विविध कलेचे प्रदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी संबंधित कलेचा इतिहास,वैशिष्ट्ये आणि त्यामागील

2b97b1ad-591f-4a00-8247-0ceb730eb0bb

सांस्कृतिक पार्श्वभूमीही मांडली.त्यामुळे हा मेळा केवळ प्रदर्शन न राहता एक शैक्षणिक अनुभव ठरला. यावेळी ‘विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी’ या संकल्पनेतून कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी पेपर बॅग तयार करणे, कागदी फुले बनविणे रांगोळी मंडल रचना,काचेच्या बाटल्यांची सजावट,लेहेरिया डिझाईन अशा विविध विषयांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.तसेच संगमरवर कला,मंडल कला,गोंदण कला,सुलेखन,मेहेंदी कला,दा व्हिन्सी पूल रचना आणि पुस्तकखूण निर्मिती यांसारख्या विविध कलेचे स्वतंत्र स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते.प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कोट महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेतही उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या दहाव्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा आर्ट मेळा विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ देणारा ठरला आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. – रवि लांडगे महापौर,पिंपरी चिंचवड महापालिका कोट कला शिक्षण विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देत आत्मविश्वास वाढवते. विविध राज्यांच्या लोककलेचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक विविधतेचा सुंदर संगम घडवला आहे. ‘विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी’ या संकल्पनेतून घेतलेल्या कार्यशाळा हा उपक्रम अधिक परिणामकारक बनवणारा ठरला. महापालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार आणि अनुभवाधारित शिक्षण देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. – ममता शिंदे, उपायुक्त,पिंपरी चिंचवड महापालिका

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुण्यातील बिगवन परिसरातील
    1
    पुण्यातील बिगवन परिसरातील
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Photographer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • २२ महिलांची सुटका... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    1
    २२ महिलांची सुटका...
बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    user_Pimpri Chinchwad City News
    Pimpri Chinchwad City News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.
    1
    वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात  आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पुणे : मोहम्मदवाडी परिसरातील तीन गुंठा जागेच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. गणेश थोरात यांनी सदर जागेचे खरेदीखत बंद असतानाही विसर पावतीद्वारे व्यवहार सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधित जागेवर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात येत असून, मूळ मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्तींचे वर्चस्व सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सिव्हिल प्रकारे त्रास दिला जात असल्याचे सांगत अनेक तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी पुणे पोलीस आयुक्त अमितजी कुमार यांच्याकडे धाव घेतली असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरण गंभीर असून प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
    1
    पुणे : मोहम्मदवाडी परिसरातील तीन गुंठा जागेच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. गणेश थोरात यांनी सदर जागेचे खरेदीखत बंद असतानाही विसर पावतीद्वारे व्यवहार सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधित जागेवर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात येत असून, मूळ मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्तींचे वर्चस्व सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी सिव्हिल प्रकारे त्रास दिला जात असल्याचे सांगत अनेक तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी पुणे पोलीस आयुक्त अमितजी कुमार यांच्याकडे धाव घेतली असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रकरण गंभीर असून प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Prasad Panchal
    1
    Post by Prasad Panchal
    user_Prasad Panchal
    Prasad Panchal
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • साडीतील नृत्याने सोशल मीडियावर धूम अरुणिमा देवांसीस ठरल्या वायरल डान्स टीचर
    1
    साडीतील नृत्याने सोशल मीडियावर धूम अरुणिमा देवांसीस ठरल्या वायरल डान्स टीचर
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रोहित पवार यांच्या जीविताला धोका? Z+ सुरक्षा देण्याची मागणी... NCP (SP) प्रदेश सरचिटणीस - सुनील माने यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    1
    रोहित पवार यांच्या जीविताला धोका? Z+ सुरक्षा देण्याची मागणी...
NCP (SP) प्रदेश सरचिटणीस - सुनील माने यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    user_Pimpri Chinchwad City News
    Pimpri Chinchwad City News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.