Shuru
Apke Nagar Ki App…
आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू ! आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू ! आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली1
- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- आज गुरुवार 2 एप्रिल रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरात काही जणांनी एका तरुणाला क्रिकेटच्या लाकडी बॅटने बेदम मारहाण केली आहे सदरील घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून मात्र सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- राजनगाव येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एक जनास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे1
- महिला व बालकल्याण समिती सभापतीपती ऐश्वर्या अजय चव्हाण तर समाज कल्याण सभापतीपदी पार्वती मुंढे बिनविरोध1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- अनोख्या परंपरेने हनुमान जयंती उत्सव १०० वर्षांची परंपरा, सर्वधर्म समभावाचा सुंदर संगम! जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथे हनुमान जयंती एक आगळी-वेगळी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा जपत साजरी केली जाते. तब्बल १०० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात कायम आहे. हनुमान जयंतीनिमित्त गावातील प्रत्येक घरातून ‘शिदा’ गोळा करण्याची अनोखी प्रथा येथे पाहायला मिळते. हरभरा, डाळी, भाजीपाला, मसाले अशा विविध साहित्याचा संग्रह करून संध्याकाळी मारोती मंदिरात मोठ्या प्रमाणावर चविष्ट भाजी तयार केली जाते. यानंतर ग्रामस्थ आपल्या घरातून आणलेल्या भाकऱ्यांसह मंदिरात एकत्र बसून महाप्रसादाचा आनंद घेतात. विविध घरांमधून आलेल्या साहित्यामुळे या भाजीची चवही खास आणि आगळीवेगळी लागते, ज्याची सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. या परंपरेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्म समभाव. धर्म, जात, वय किंवा आर्थिक स्थिती याचा कोणताही भेदभाव न ठेवता संपूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सहकार्याची भावना दृढ करणारा ठरतो. बानेगावची ही परंपरा आजच्या काळातही सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरत असून इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.1
- पक्षविरोधी कारवाई; काँग्रेसकडून जालन्यात 7 नगरसेवक निलंबित स्वीकृत सदस्य निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा ठपका; पक्षाची कडक कारवाई1
- आज गुरुवार 2 एप्रिल रोजी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली की महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून 71 लाख लाडक्या बहिणीचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे अशी माहिती अंबादास दानवे यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत सदरील माहिती दिली आहे.1