logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिंडोरी-सुरगाणा परिसरात भूकंपाच्या सौम्य हालचाली; घाबरू नका, परिस्थितीवर २४x७ लक्ष नाशिक : प्रतिनिधी राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या परिसरात २५ जुलैपासून भूकंपाच्या सौम्य हालचाली नोंदविण्यात आल्या आहेत. सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये नागरिकांना काही धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण नऊ भूकंपांची नोंद झाली असून त्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर २.८ ते ३.९ इतकी होती. यापैकी सात धक्के ३.० किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे होते. सर्वाधिक तीव्रतेचा ३.९ रिश्टर स्केलचा धक्का २८ जुलै रोजी दुपारी ३.२७ वाजता नोंदविण्यात आला. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही घटना 'भूकंप समूह' (Earthquake Swarm) या प्रकारातील असून, कमी कालावधीत अनेक सौम्य धक्के जाणवतात; मात्र त्यामध्ये एक मोठा मुख्य भूकंप असतोच असे नाही. या धक्क्यांची खोली सुमारे १० किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असल्याने जमिनीखालून गडगडाटासारखा आवाजही ऐकू येऊ शकतो. भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) भूकंप विभागणी नकाशानुसार नाशिक जिल्हा भूकंप क्षेत्र-३ (Seismic Zone III) मध्ये येतो. सन १९०० ते २०२६ या कालावधीत या भागात ५.० रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप नोंदविण्यात आलेला नाही. या कालावधीतील सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप २६ फेब्रुवारी १९८६ रोजी ४.३ रिश्टर स्केलचा होता. भूकंपाचे नेमके ठिकाण, वेळ आणि तीव्रता याचा अचूक अंदाज सध्याच्या तंत्रज्ञानाद्वारे वर्तविणे शक्य नसल्याचे NCS ने स्पष्ट केले आहे. नाशिक वेधशाळेसह महाराष्ट्रातील सर्व भूकंप निरीक्षण केंद्रे या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी इमारती भारतीय मानक ब्युरोच्या निकषांनुसार बांधणे आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

19 hrs ago
user_Anil GUNJAL
Anil GUNJAL
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
19 hrs ago
1249b421-d43c-42bd-952b-494e43280962

दिंडोरी-सुरगाणा परिसरात भूकंपाच्या सौम्य हालचाली; घाबरू नका, परिस्थितीवर २४x७ लक्ष नाशिक : प्रतिनिधी राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या परिसरात २५ जुलैपासून भूकंपाच्या सौम्य हालचाली नोंदविण्यात आल्या आहेत. सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये नागरिकांना काही धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण नऊ भूकंपांची नोंद झाली असून त्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर २.८ ते ३.९ इतकी होती. यापैकी सात धक्के ३.० किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे होते. सर्वाधिक तीव्रतेचा ३.९ रिश्टर स्केलचा धक्का २८ जुलै रोजी दुपारी ३.२७ वाजता नोंदविण्यात आला. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही घटना 'भूकंप समूह' (Earthquake Swarm) या प्रकारातील असून, कमी कालावधीत अनेक सौम्य धक्के जाणवतात; मात्र त्यामध्ये एक मोठा मुख्य भूकंप असतोच असे नाही. या धक्क्यांची खोली सुमारे

044fd400-a054-40d8-af32-7fbdc06f3e31

१० किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असल्याने जमिनीखालून गडगडाटासारखा आवाजही ऐकू येऊ शकतो. भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) भूकंप विभागणी नकाशानुसार नाशिक जिल्हा भूकंप क्षेत्र-३ (Seismic Zone III) मध्ये येतो. सन १९०० ते २०२६ या कालावधीत या भागात ५.० रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप नोंदविण्यात आलेला नाही. या कालावधीतील सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप २६ फेब्रुवारी १९८६ रोजी ४.३ रिश्टर स्केलचा होता. भूकंपाचे नेमके ठिकाण, वेळ आणि तीव्रता याचा अचूक अंदाज सध्याच्या तंत्रज्ञानाद्वारे वर्तविणे शक्य नसल्याचे NCS ने स्पष्ट केले आहे. नाशिक वेधशाळेसह महाराष्ट्रातील सर्व भूकंप निरीक्षण केंद्रे या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी इमारती भारतीय मानक ब्युरोच्या निकषांनुसार बांधणे आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
    2
    येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा
येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा
येडशी | प्रतिनिधी सुभान शेख 
धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे.
2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल.
ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत.
हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत.
ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • खड्ड्याच्या प्रश्नांवर"अधिकारी महापौर, आमदारांचेही ऐकत नाहीत"; खड्ड्यांवरून मंत्री भुजबळांचा संताप नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "एवढे खड्डे नाशिकमध्ये यापूर्वी कधीच नव्हते. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब होत असून वारंवार अपघात घडत आहेत आणि नागरिकांचा जीव जात आहे," असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी केली. तसेच महापालिका आयुक्तांनी या प्रश्नाची जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. "अधिकारी महापौर, आमदार आणि कुंभमेळा मंत्र्यांचेही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे," असा टोला लगावत भुजबळ यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
    1
    खड्ड्याच्या प्रश्नांवर"अधिकारी महापौर, आमदारांचेही ऐकत नाहीत"; खड्ड्यांवरून मंत्री भुजबळांचा संताप
नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "एवढे खड्डे नाशिकमध्ये यापूर्वी कधीच नव्हते. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब होत असून वारंवार अपघात घडत आहेत आणि नागरिकांचा जीव जात आहे," असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी केली. तसेच महापालिका आयुक्तांनी या प्रश्नाची जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. "अधिकारी महापौर, आमदार आणि कुंभमेळा मंत्र्यांचेही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे," असा टोला लगावत भुजबळ यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    1
    दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 
दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून   २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • आजचा दिवसच पिक विमा भरण्यासाठी आहे पिक विमा भरून घ्या जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
    1
    आजचा दिवसच पिक विमा भरण्यासाठी आहे पिक विमा भरून घ्या जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    4
    चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास 
नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया
    2
    🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया 
🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • खुमगाव गावाला पुराच्या पाण्याचा विळखा; गावाचा संपर्क तुटला, रात्रीपासून वीजपुरवठा खंडित ग्रामपंचायत खूमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा खुमगाव गावाला पुराच्या पाण्याचा विळखा; गावाचा संपर्क तुटला, रात्रीपासून वीजपुरवठा खंडित ग्रामपंचायत खूमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा नांदुरा तालुका सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खुमगाव गावाला पुराच्या पाण्याचा विळखा पडला असून गावाचा बाहेरील भागाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावाकडे जाणारे प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रात्रीपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून त्यामुळे मोबाईल नेटवर्कही बंद पडले शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकाचे नुकसान झाले तर गावातील गुरेढोरांना सुरक्षित जागेत हलविण्यात आले असुन सतत पावुस चालु राहिला तर घरात पुराचे पाणी शिरू शकते प्रतिनिधी निलेश शेकोकार नांदुरा
    2
    खुमगाव गावाला पुराच्या पाण्याचा विळखा; गावाचा संपर्क तुटला, रात्रीपासून वीजपुरवठा खंडित ग्रामपंचायत खूमगाव तालुका नांदुरा जिल्हा
बुलढाणा 
खुमगाव गावाला पुराच्या पाण्याचा विळखा; गावाचा संपर्क तुटला, रात्रीपासून वीजपुरवठा खंडित ग्रामपंचायत खूमगाव तालुका नांदुरा जिल्हा
बुलढाणा 
नांदुरा तालुका सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खुमगाव गावाला पुराच्या पाण्याचा विळखा पडला असून गावाचा बाहेरील भागाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावाकडे जाणारे प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, रात्रीपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून त्यामुळे मोबाईल नेटवर्कही बंद पडले शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकाचे नुकसान झाले तर गावातील गुरेढोरांना सुरक्षित जागेत हलविण्यात आले असुन सतत पावुस चालु राहिला तर घरात पुराचे पाणी शिरू शकते प्रतिनिधी निलेश शेकोकार नांदुरा
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.